Sambhaji Bhide News: शिवप्रतिष्ठान संघटना संस्थापक संभाजी भिडे यांचे पुणे जिल्ह्यातील दौंड येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मात्र,या कार्यक्रमाला स्थानिक भीम सैनिकांकडून विरोध करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी भिडे समर्थकांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी २५ जणांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.यामुळे आता वातावरण तापू लागलं आहे.
पुण्यातील दौंड येथे शिव प्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला भीम सैनिकांकडून विरोध करण्यात आल्यामुळे
त्यांच्याविरुध्द पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आलीय.
याप्रकऱणी पोलिसांनी २५ जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहितीही समोर आलीय.
दरम्यान, दौंड पोलिसांकडून करण्यात आलेली सदरची कारवाई ही चुकीची असल्याचा आरोप
आंबेडकरी चळवळीतील पदाधिकार्यांनी केला असून आता या कारावाई विरोधात भीमसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहे.
तसेच भीमसैनिकांवर कारवाई करणाऱ्या संबंधित पोलिसांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणीही या भीमसैनिकांनी केली आहे.
दरम्यान,शिवप्रतिष्ठान संघटना संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide bhim sainik) यांचे पुणे जिल्ह्यातील दौंड येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मात्र,संभाजी भिडे हे या नियोजित कार्यक्रमाला उपस्थिती न लावताच पुढील नियोजित कार्यक्रमाला रवाना झाल्याचे कळते. मात्र,यावेळी भिडे समर्थक आणि भीम सैनिक समोरासमोर उभे ठाकले आणि दोन्ही बाजूने दौंड शहरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याचे समजते. यामुळे परिसरात काहीवेळ तणावाचे वातावरणात देखील निर्माण झाले होते.
अन्यथा हा कार्यक्रम उधळून लावला जाईल
या संदर्भात अधिक माहिती देताना भीम सैनिक अश्विन वाघमारे म्हणाले की, दौंड पोलिसांनी भीमसैनिकांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले आहेत. चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यामुळे संबंधित दौंड पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी भाऊसाहेब पाटील यांच्याविरोधात एट्रोसिटी एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही भीमसैनिकांच्या वतीने करण्यात आली आहे. संभाजी भिडे हे दोन समाजात जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप या भीम सैनिकांनी केला होता,त्यामुळे त्यांची सभा होऊ दिली जाणार नसल्याचा पवित्रा भीम सैनिकांनी घेतला होता.त्यामुळे पोलिसांनी संभाजी भिडे यांचा हा कार्यक्रम रद्द करावा, अन्यथा हा कार्यक्रम उधळून लावला जाईल. असा इशाराही यावेळी भीम सैनिकांनी पोलीस प्रशासनाला दिला होता. त्यामुळे संभाजी भिडे यांनी नियोजित दौंड चा दौरा रद्द करत पुण्यातील कार्यक्रमाला हजेरी लावली अशी माहिती समोर आलीय.मात्र,पोलिसांनी भीम सैनिकांवरच कारवाई केल्याने आंबेडकरी समाजात संतापाची लाट उसळली आहे.
सिमी ला भारत मुस्लिम राष्ट्र बनवायचंय,म्हणून बंदी -केंद्र
भारतातील मुस्लिमांना घाबरण्याची गरज नाही – मोहन भागवत
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 20,2023 12:10 PM
WebTitle – Sambhaji Bhide’s program protest; case registered against 25 Bhim Sainik