प्रतिनिधी- नाशिक मधील नारायण लोखंडे सभागृहात नुकताच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला,यावेळी धम्मलिपि व बुद्ध लेणींच्या जनजागृतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या सुनील खरे यांचाही समाजरत्न पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ डी एल कराड हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले,
प्रमुख पाहुणे म्हणून शशिकांत पगारे, डॉ अविनाश धर्माधिकारी, संजय साबळे, संतोष निकम, आत्माराम धाबे,
दिपचंद दोंदे, मयूर पाटील, श्रीकांत सोनवणे, अण्णासाहेब कटारे, चंदूलाल शहा, सचिन जाधव ,
प्रकाश पगारे हे उपस्थित होते,सर्व प्रमुख आथितींचा सन्मान शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला,
यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून पुरस्कारार्थी आलेले होते,सुनील खरे ह्यांनी व त्यांच्या दान पारमिता फाउंडेशन मार्फत धम्मलिपिचे वर्ग ते निशुल्क रित्या घेत असल्याचे बघून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार त्यांना रिपब्लिकन न्यूज वार्ता तर्फे देण्यात आला,
दान पारमिता फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आत्तापर्यंत 6 ते 7 हजार विद्यार्थ्यांना निशुल्क धम्मलिपि शिकवली असून एक महिन्याच्या वर्गात परिपूर्ण झाल्यावर त्यांना प्रत्यक्षात लेणींवर नेऊन त्यांच्या कडून शिलालेखांचे वाचन करून घेतले जाते सर्टिफिकेटचे वितरण केले जाते व त्यांना शिल्पकलेचे धडे दिले जाते, लेणी संवर्धन करण्यासाठी प्रेरित केले जाते, धम्मलिपिचे लेखी पेपर सोडवून घेतले जाते,
ह्या उपक्रमामुळे धम्मलिपि विदेशात पोहचली असून सिंगापूर, अबू धाबी, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, बंगलोर, हिमाचल प्रदेश इत्यादी भागातील विद्यार्थी धम्मलिपि शिकून प्राचीन इतिहास जाणून घेत आहे,
“हा पुरस्कार माझा नसून माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांचा आहे,
त्यांच्या मुळे हा सन्मान मला प्राप्त झाला असून धम्मलिपि हे त्याचे माध्यम आहे ”
असं मत यावेळी दान पारमिता फाउंडेशन चे अध्यक्ष सुनील उषा खरे यांनी जागल्याभारत शी बोलताना व्यक्त केलं.
बुद्धम शरणम गच्छामी चा नाद कान्हेरी बुद्ध लेणीत घुमला
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 16,2022, 14:14 PM
WebTitle – Samaj Ratna Award to Sunil Khare, who is always ready to create awareness about Dhamlipi and Buddha Caves