दोन हजार Rs 2000 दोन हजारांची नोट बंदी करण्याची बातमी आल्याने पुन्हा एकदा नागरिकांच्या मनात धडकी भरली,मागीलवेळी सुद्धा रुपये 500 आणि रुपये हजारच्या नोट अचानकपणे चलनातून रद्द केल्याने सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते,आपल्याकडील नोट बदलण्यासाठी उन्हा तान्हात रांगेत उभे राहून अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.8 नोव्हेंबर 2016 यादिवशी रात्री 8 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी टीव्हीवरून जनतेला संबोधित करत अचानक जाहीर केलं की दुसऱ्या दिवसापासून चलनात असणाऱ्या 500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द होणार आहेत.
याचा अर्थ या नोटा चलनातून बाद झाल्या,म्हणजे त्यांचा वापर बंद झाला. यालाच नोटबंदी किंवा निश्चलनीकरण असं म्हणतात. परंतु, सदर निर्णय जाहीर करत असताना त्यांनी सांगितलं की, या नोटा बदल्यात रिझर्व्ह बँकेकडून ५०० व २००० मूल्य असणाऱ्या नविन नोटा बाजारात आणल्या जातील.
त्याप्रमाणे नवीन दोन हजार Rs 2000 रुपये मूल्य असणारी नोट एक महिन्यातच चलनात आली.
तसेच 500 रुपयांची नविन नोटही चलनात आली. मात्र, मागच्या दोन वर्षांत 2000 रुपयांची नोट मात्र
आधी बँकांच्या एटीएममधून गायब झाली आणि मग बँकांतूनही मिळेनाशी झाली.
अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत बोलताना सांगितलं की,”रिझर्व्ह बँकेने 2019 आणि 2020 मध्ये दोन हजारच्या नोटा छपाईसाठी दिलेल्या नाहीत.”
याचा अर्थ दोन हजार मूल्य असणारी नोट छापली जात नव्हती.आरटीआय मधूनही याचा खुलासा झाला आहे.
आजच्या बातमीने लोकांच्या मनात मात्र संभ्रम
आजच्या बातमीने लोकांच्या मनात मात्र संभ्रम निर्माण झाला.अगोदरच्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांचे जसे निश्चलनीकरण झाले,त्याप्रमाणे या नोटेचे ही होणार आहे काय? आणि जर नोट रद्द करायची होती तर छापली का? असे प्रश्न लोक विचारत आहेत.
त्यामुळे सर्वात अगोदर हे समजून घेतलं पाहिजे की दोन हजारांची नोट चलनातून एकदम रद्द झालेली नाहीये. म्हणजे तुमच्याकडं जर आताही दोन हजारची नोट असेल तर ती तुम्हाला वापरता येणार आहे,बातमीचा अर्थ केवळ केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्या अंडरस्टँडिंगचा आहे. त्यांनी संगनमत करत अशा नोटांचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतलाय आणि हा सरकारच्या आर्थिक धोरणाचा एक भाग आहे.
मात्र दोन हजाराच्या या नोटा तुम्हाला 23 मे 2023 पासून आपल्या बँकेत जमा करता येणार आहेत,
जमा करताना एकावेळी एका नागरिकास 20 हजार रुपयांपर्यंत 2 हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळणार आहेत.
त्याचप्रमाणे सर्व बँकांनी आतापासून 2 हजार रुपये मूल्य असणाऱ्या नोटा ग्राहकांना देणे बंद करावे,असे आदेश आरबीआय ने दिलेले आहेत.
सुधा मूर्ती अन त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप
‘सच्चे मुस्लिम-अच्छे मुस्लिम’ ; निवडणूक 2024: RSS चा नवा प्लॅन
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on 19, MAY 2023, 22:22 PM
WebTitle – Rs 2000 note withdraw by RBI