मुंबई, दि. 25 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका वरिष्ठ सेवा, गट-अ व अधिष्ठाता (महापालिका वैद्यक संस्था), गट-अ या संवर्गातील पद भरतीकरीता दिनांक २४ जून, २०२१ रोजी वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदर परीक्षेस अनुसरुन अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक २६ जुलै, २०२१ असा आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत खालील संवर्ग पदावरील पात्र उमेदवारांच्या भरतीकरीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सहायक आयुक्त, बृहन्मुंबई, महानगरपालिका, महापालिका वरिष्ठ सेवा, अधिष्ठाता (महापालिका वैद्यक संस्था), गट-अ पदसंख्या- 16 असून एकूण पदांपैकी एक पद कर्णबधीरता अथवा दिव्यांग प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये भरती प्रक्रिये संदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे.
अर्ज स्वीकारण्याची पद्धत आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया इत्यादीबाबतच्या सविस्तर तपशीलासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळाद्वारे उमेदवारांना सर्वसाधारण सूचना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.
जाहिरात आयोगाच्या https://mpsc.gov.in तसेच https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे दिनांक २५ जून, २०२१ ते २६ जुलै, २०२१ रोजीपर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे,
असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उपसचिव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
येत्या रविवारी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा एकमताने निर्णय
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUN 25 , 2021 20: 55 PM
WebTitle – Recruitment for Assistant Commissioner, Incumbent Cadre in BMC through Maharashtra Public Service Commission 2021-06-25