सिद्धिविनायक मंदिरांच्या प्रसादात उंदीर? Viral Video मुळं खळबळ मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादावर वाद निर्माण झाला आहे, कारण समोर आलेल्या व्हिडिओमध्ये प्रसादाच्या पाकिटांवर आणि लाडूच्या टोपलीत उंदराची पिल्ले आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये, लाडूंचे प्रसाद उंदरांनी कुरतडल्याचे देखील दिसत आहे, ज्यामुळे प्रसादाच्या शुद्धतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे.
सिद्धिविनायक मंदिरांच्या प्रसादात उंदीर? Viral Video मुळं खळबळ
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने मात्र या सर्व आरोपांना फेटाळून लावले आहे. ट्रस्टचे सचिव वीणा पाटील यांनी सांगितले की, मंदिर परिसर नेहमीच स्वच्छ ठेवला जातो आणि अशा घटना घडण्याची शक्यता नाही. व्हिडिओ आणि फोटोची सखोल तपासणी केली जाईल, असा दावा त्यांनी केला.
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने आरोप फेटाळले
मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी देखील या आरोपांना उत्तर देताना हा व्हिडिओ मंदिराचा नसून, हे मंदिराला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे सांगितले. त्यांच्यानुसार, कोणीतरी प्लॅस्टिकमध्ये उंदीर ठेवून प्रसादाच्या टोपलीत ठेवला आणि त्याचा व्हिडिओ बनवला असावा. त्यांनी यावर जोर देऊन सांगितले की, मंदिर परिसरात नेहमीच स्वच्छता राखली जाते आणि या प्रकारामागे कुणीतरी मंदिराची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. दोषींवर कठोर कारवाई होण्याची गरज असल्याचेही सरवणकर यांनी स्पष्ट केले.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 24,2024 | 10:05 AM
WebTitle – Rat in Siddhivinayak Temple Prasad? Viral Video Sparks Outrage