रसमलाई
साहित्य
दूध
2 लिटर ( छेना बनवण्यासाठी)
(गाईचं उत्तम)
1.5 लिटर बासुंदी साठी( हे म्हशीचं असलेलं चांगलं)
1 मोठा लिंबू
साखर 1 वाटी( कमी जास्त आवडीनुसार)
रंग किंवा केसर
पिस्ता बदाम काप ( optional)
कृती
सर्वप्रथम मिडीयम गॅस वर दूध बासुंदी करणार आहोत ते दीड लिटर दुध उकळत ठेवायचं,
यांच्याकडे खाली लागू नये म्हणून सतत लक्ष द्यावे लागेल.तसेच ढवळत राहावे लागेल.
उकळी नंतर slow गॅस वर आटत ठेवायचं.
दुसरीकडे 2 लिटर दुधाला ही छान उकळी आणायची,
मग त्यात एका लिंबाचा रस( गाळून घेतलेला) घालून ते दूध फाडून घ्यायचं
(एक चमचा व्हिनेगर थोड्या पाण्यात टाकून हे मिश्रण ही वापरू शकतो)
व्यवस्थित द्रव सेपरेट झाल्यावर पातळ सुतीच्या कापडाने गाळून घ्यायचं, जो घट्ट चोथा राहील त्याला छेना म्हणतात,
हा छेना 2,3 पाण्याने धुवून घ्यायचा.आणि त्याच कापडात घट्ट पिळून छान कोरडा करून घ्यायचा.
15,20 मिन तसाच कापडात पाणी पूर्णपणे निथळत ठेवायचा.वर वजन ही ठेवू शकता
नंतर थंड झाल्यावर छेना मोठ्या ताटात घेऊन खूप घासून मळून घ्यायचा.
(ही मळण्याची प्रक्रिया किमान 15 मिनिटं करावी तरच छेना मऊ आणि गोळे बनवण्यास योग्य होईल)
मग याचे लहान लहान गोळे/ चपटे गोळे बनवून घ्यायचे, ( दुधात सोडल्यावर हे तिप्पट होणार त्या नुसार size ठेवायचा)
नंतर आटत आलेल्या दुधात 1 वाटी ( कमीजास्त आवडीने) साखर घालायची.
किंचित पिवळा रंग, किंवा केसर घालायचं,
हे दूध फार घट्ट आठवायचं नाही.
मग या दुधात वर बनवलेले गोळे हळुवार सोडायचे,
भांडे थोडे मोठेच घ्यावे, कारण गोळे तिप्पट होतात,
15 मिन slow, medium flame वर हे गोळे त्या दुधात उकळावे,
चेक करावा.
नीट शिजला ,फुलून तिप्पट झाला म्हणजे रसमलाई तयार.
वरून पिस्त्याचे काप घालायचे.
थंड करून,फ्रिज करून सर्व्ह करायचे.
By – Amita
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)