अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेश दिले होते.केंद्र सरकारने श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट स्थापन केला. नंतर या ट्रस्टच्या देखरेखीखाली मंदिरांच्या कामाला सुरूवातही झाली आहे. दरम्यान, राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीवरून आता ( राम मंदिर घोटाला ) ट्रस्ट भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. १० मिनिटांपूर्वी दोन कोटींना घेतलेली जमीन ट्रस्टने १८.५ कोटींना विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला असून, याची सीबीआय आणि ईडीकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
समाजवादी पक्षाचे नेते व माजी आमदार तेजनारायण पांडे उर्फ पवन पांडे यांनी आरोप केला आहे की,
‘दोन कोटी रुपयांना खरेदी केलेली जमीन काही मिनिटांनी 18. 5 कोटी रुपयांना विकली गेली.’
काही मिनिटांत जमिनीचा भाव दोन कोटींहून १८.५ कोटी
सपाचे नेते पवन पांडे म्हणाले,”बाबा हरिदास यांनी ही जमीन सुलतान अन्सारी आणि रवि मोहन तिवारी यांना विकली. त्यानंतर त्यांनी ही जमीन राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट विकली. काही मिनिटांत जमिनीचा भाव दोन कोटींहून १८.५ कोटी कसा होऊ शकतो. अयोध्येचे महापौर ऋषिकेश उपाध्याय आणि ट्रस्ट विश्वस्त अनिल मिश्रांच्या उपस्थितीत हा व्यवहार झाला. १७ कोटी तत्काळ खात्यावर जमा करण्यात आले. हे पैसे कुणी दिले आणि ते कुणाच्या खात्यात जमा करण्यात आले, याची सीबीआयने चौकशी करावी,” अशी मागणी पांडे यांनी केली आहे.
तसेच आम आदमी पार्टीचे राज्यसभा सदस्य आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह यांनी देखील अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराचं काम पाहणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप (राम मंदिर घोटाला) केले आहेत. त्यांनी सीबीआय आणि ईडीकडून याप्रकरणी चौकशी केली जावी, अशी मागणीही केली आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी संस्थेचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या मदतीने २ कोटी किंमत असणारी जमीन १८ कोटी रुपयांना खरेदी केली. हे सरळ भ्रष्टाचाराचं प्रकरण असून सरकारने याची चौकशी सीबीआय आणि ईडीमार्फत करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. तर दुसरीकडे समाजवादी पार्टी सरकारमधील मंत्री आणि अयोध्येचे माजी आमदार पवन पांडे यांनीही भ्रष्टाचाराचे असेच आरोप केले आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पत्रकार परिषदेत सिंह यांनी काही कागदपत्रे दाखवली. सिंह म्हणाले, ‘भगवान श्री राम यांच्या नावाने कोणताही घोटाळा आणि भ्रष्टाचार करण्याची कोणी हिंमत करेल याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. पण मी तुम्हाला जी कागदपत्रे दाखवणार आहे ती सरळ सरळ हेच सांगतील, की रामजन्मभूमी ट्रस्टच्या नावावर चंपत राय जी यांनी कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे,”
रामजन्मभूमी ट्रस्टने निवेदन दिले
रामजन्मभूमी ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी हे आरोप निराधार आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटले आहे.
रविवारी सायंकाळी उशिरा प्रसिद्ध झालेल्या एका निवेदनात चंपत राय म्हणाले की, “श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने खुल्या बाजारभावापेक्षा कितीतरी कमी किंमतीत खरेदी केली आहे. त्यांनी किंमतीवर करार केला होता, तो मिळाला 18 मार्च 2021 रोजी जमीन विकली गेली, त्यानंतर त्याने ट्रस्टबरोबर करार केला.
चंपत राय यांचे खोटे बोल पकडले गेले
चंपत राय यांचे खोटे बोल पकडले गेले असे म्हणत आम आदमी पार्टीचे राज्यसभा सदस्य आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह यांनी नवीन ट्विट करून असे म्हणले आहे की, “अन्सारी आणि तिवारी यांनी हरीश पाठक यांच्याबरोबर स्वस्त नोंदणीकृत करार केला होता आणि महागड्याने विकले गेले होते” डिबेंचर पेपरमध्ये असे स्पष्टपणे लिहिलेले आहे की “विकलेली जमीन सर्व प्रकारच्या अडचणींपासून मुक्त आहे” तर चंपात जी कोणतेही बनावट कागद बनवित आहेत का?
या संपूर्ण प्रकरणावर बोलताना ट्रस्टचे महासचिव चंपत राय म्हणाले, “अशा प्रकारच्या आरोपांना आपण घाबरत नाहीत.
मी काही बोलणार नाही. आपल्यावर झालेल्या आरोपांचा अभ्यास करू.माध्यमांना प्रसिद्ध केलेल्या संक्षिप्त निवेदनात राय म्हणाले,
“आमच्यावर महात्मा गांधींची हत्या केल्याचा आरोपही करण्यात आला.
आम्हाला आरोपांची भीती वाटत नाही. मी या आरोपांचा अभ्यास करुन चौकशी करीन,” असं राय यांनी म्हटलं आहे.
विश्व हिंदू परिषदेने यासंदर्भात भाष्य करण्यास नकार दिला आहे.
विश्व हिंदू संघटनेशी संबंधित अधिकाऱ्यांचे एकच उत्तर आहे की ते आरोपाचे सर्व कागदपत्रे पाहून आरोपाचे सत्य शोधतील.
कालचा अतुल्य भारत आज कुठे आहे?
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)