जेष्ठ साहित्यिक,विचारवंत,दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांनी साहित्यिक,लेखिका दुर्गाबाई भागवत यांची “गोलपिठा” या नामदेव ढसाळ यांच्या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात हुर्ये उडवली होती.तो किस्सा त्यावेळी वर्तमानपत्रातून खूप गाजला होता,आणि महाराष्ट्रातील साहित्यिक सामाजिक परिप्रेक्षात देखिल तो दीर्घकाळ चर्चिला गेला.पुढे दुर्गाबाई भागवत यांनी या घटनेचा बदला घेतला.
“काळा स्वातंत्र्यदिन” या लेखावरून दुर्गाबाई भागवत चिडल्या
15 ऑगस्ट 1972 रोजी मुंबईतील पुरोगामी,आंबेडकरी तरुणांनी ‘स्वातंत्र्यदिन’ हा “काळा स्वातंत्र्यदिन” म्हणून पाळला होता.हा दिवस काळा दिवस पाळण्याचे आवाहन अन महाराष्ट्रातील वस्त्यावस्त्यांमध्ये अंमलबजावणी.15 ऑगस्ट रोजी अनेक वस्त्यांमध्ये काळे झेंडे फडकविले गेले होते.जनमानसांत सरकारविरोधी वातावरण होतं.या पार्श्वभूमीवर राजा ढाले यांचा बहुचर्चित “काळा स्वातंत्र्यदिन” हा लेख साधना या साप्ताहिकात प्रसिद्ध झाला होता.
राजा ढाले यांच्यावर दुर्गाबाई भागवत यांचा रोष होता.दुर्गाबाई भागवत या साधनसुचिता मानणाऱ्या ‘साधना’ परिवारातील होत्या.हा लेख प्रसिद्ध होताच दुर्गाबाई भागवत यांनी राजा ढाले यांच्यावर सूड उगविण्यासाठी त्या लेखाच्या संदर्भात 24.08.1972 रोजी दैनिक महाराष्ट्र टाइम्स मध्ये ‘साधना’चा निषेध करणारे एक पत्र लिहिले.त्या पत्रात त्यांनी ‘काळा स्वातंत्र्य दिन’ या लेखात राजा ढाले यांनी उल्लेख केलेल्या राष्ट्रध्वजाच्या मुद्यावर भाष्य केले नाही.त्यांनी केवळ साधनसुचितेबद्दल हळहळ व्यक्त करत ‘साधना’ शी असलेले त्यांचे संबंध तोडून टाकले.तसे जाहीर केले.
पुण्यात आग लागली.दुर्गाबाई चिडल्या म्हणून पुण्याचे मसापवाले चिडले आणि हां हां म्हणता संपूर्ण पुणे “साधना” साप्ताहिकाच्या ट्रस्टींवर आणि संपादकांवर तुटून पडले..पुण्याच्या नगरपालिकेत संपादक डॉ.अनिल अवचट आणि लेखक राजा ढाले यांच्यावर खटला भरावा असा 18 विरुद्ध 2 मतांनी ठराव पास करून घेण्यात आला होता.शिवसेनेचे नेते श्रीकांत शिरोळे यांनी साधना च्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चाला सामोरे जात एसेम जोशी यांनी माफी मागितली होती.मात्र त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात आली.यावेळी यदुनाथ थत्ते यदुनाथ यांची प्रेतयात्रा काढून तिरडी जाळण्यात आली होती.पुण्यातील कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वातावरण तंग केले होते.
आपणांविषयी घाणेरडा उल्लेख करणाऱ्या राज ढालेंना चांगलंच फैलावर घ्यावं असं दुर्गा भागवत यांना वाटणं अगदी स्वाभाविकच होतं.
परंतु स्वत:च्या नावासंबंधीच्या मजकुराबद्दल त्यांनी वर्तमान पत्रांतून ओरड केली असती तर त्यांची अधिकच गोची झाली असती.
ती त्यांनी शहाजोगपणे टाळली आणि राष्ट्र ध्वजाच्या अपमानाचं कोलीत पुढं करून ढालेंच्या आणि “साधना” साप्ताहिकाच्या विरोधात बोलायला सुरुवात केली.
दुर्गाबाई भागवत चिडण्याचे कारण गोलपीठा प्रकाशन समारंभातील अपमान
दुर्गाबाई भागवत यांना “साहित्य अकादमी” पुरस्कार मिळाल्याबद्दल एक सत्कार समारंभ कुलाबा येथे एका महिला संघटनेने आयोजित केला होता.या कार्यक्रमात त्यांनी एक अजब वक्तव्य केले होते.”मी तमाशा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले ते केवळ मानसन्मानासाठी नव्हे तर तमासगिरांचे ,आणि विशेषत: त्यातील स्त्रियांचे जीवन कळावे म्हणून,त्यांचे दु:ख समजावे म्हणून,वेश्यांना आपण बदनाम समजतो,मात्र वेश्या हा समाजाचा एक अत्यावश्यक भाग आहे.सांसारिक जीवन जराही खिळखिळे झाले तर पुरुष अतृप्तीच्या मोकळ्या वाटांवर मोकाट सुटतो. त्याच्या वासनांची पूर्तता करून वेश्या एक प्रकारे समाजाचा तोल सांभाळत असतात.वेश्या व्यवसाय अशा रीतीने समाजाचे रक्षण करतो.डॉक्टर इंजिनिअर प्रमाणे त्याला प्रतिष्ठा आणि सामाजिक मान्यता मिळाली पाहिजे.
गोलपीठा या पुस्तक प्रकाशन सोहळ्यातील तो प्रसंग
“गोलपीठा” या प्रकाशन सोहळ्यात दुर्गाबाई भागवत प्रमुख पाहुण्या होत्या.भाषण करताना त्यावेळी त्या म्हणाल्या की,
“घराला जशी संडासबाथरूमची गरज असते,त्याचप्रमाणे समाजस्वास्थ्यासाठी समाजाला वेश्या व्यवसायाची गरज आहे.
परंतु वेश्यांना समाजाने सामाजिक प्रतिष्ठा द्यायला पाहिजे,कारण ती समाजाची गरज भागवते.”
दुर्गाबाई भागवत यांच्या उपरोक्त भाषणांचा राजा ढाले यांनी त्यांच्या भाषणात खरपूस समाचार घेतला होता.
‘वेश्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून द्या,कारण ती समाजाची गरज भागवते,
असं म्हणणाऱ्या भागवत बाईंना वेश्यांना वेश्याच ठेवायचं आहे.
हा त्यांचा पतितोद्धार असं ज्यांना वाटतं त्यांनी स्वत: हा धंदा का करू नये?’
हे त्यांनी भाषणात म्हणले अन पुन्हा भाऊ पाध्ये यांनी लेखात देखिल छापून आणलं.
या प्रकाशन सोहळ्यात राजे ढाले यांनी संपूर्ण भाषण दुर्गाबाई भागवत यांच्याकडे हातवारे करत केले.
त्यामुळे रूसी मेहता ह्या सभागृहात हशा आणि टाळ्यांच्या पावसात दुर्गाबाई भागवत यांचा एकमेव चेहरा मात्र रडवेला दिसत होता.
त्यामुळे त्या चिडल्या होत्या.तिथून राजा ढाले यांच्यावर त्यांचा प्रचंड रोष होता.त्यांना धडा शिकवायचा मोका त्या शोधत होत्या.
या गोष्टीवरून अनेक समजुती अन संभ्रम आहेत म्हणून हे इथं आवर्जून द्यावसं वाटलं.
प्रस्थापितांना टक्कर देण्याची ताकद ही असते ती राजा ढाले अन अशा अनेक आंबेडकरी विचारवंतांच्यामध्ये असलेली दिसते.
आज राजा ढाले यांचा जन्मदिन विनम्र अभिवादन
आंबेडकरी चळवळीतील एक वैचारिक बुरुज,राजा ढाले यांच्या काही आठवणी
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 30, 2021 21:30 PM
WebTitle – Raja Dhale, who took news of Durgabai Bhagwat’s views on prostitution