शुद्राना शूद्र म्हणल्याने वाईट का वाटते ? – हा प्रश्न बॉम्बस्फोटाचा गंभीर आरोप असणारी प्रज्ञासिंग ठाकूर (Pragya Singh Thakur) हिने विचारला आहे. हिंदू धर्मात चार वर्ण आहेत.चार वर्ण एकमेकापेक्षा हलके आहेत.म्हणजे यात वर्ण उतरंडीत सर्वश्रेष्ठ ब्राह्मण असं मनुस्मृतीत लिहिलं गेलं हे जगातील पहिलं आरक्षण होतं.जे धर्मधिष्ठित होतं त्यानंतर हलके वैश्य त्यानंतर हलके क्षत्रिय आणि सर्वात हलके शूद्र श्रेष्ठत्व आणि हलका कमी दर्जा असे असतानाही हे लोक अभिमान स्वाभिमान बाळगून आहेत.वर्ण व्यवस्थेतून पुढे जात व्यवस्था निर्माण झाली.ज्याना जी कामे वर्ण व्यवस्थेने विहित करून दिली. तीच कामे त्यांनी करावी अशी धर्मज्ञा देण्यात आली हा नियम बनला आणि त्यावरून या जाती सुद्धा बनल्या.लोक उलट सांगतात मांडतात की व्यवसायावरून जाती निर्माण झाल्या,ते अर्धसत्य मानावं.सत्य हे आहे की वर्ण व्यवस्थेने त्यांना दिलेली कामे,व्यवसाय यातून जात व्यवस्था जन्माला आली.
स्त्रिया गुलाम का जाणून घ्या
या सामाजिक विषम व्यवस्थेत अर्धी लोकसंख्या असणाऱ्या स्त्रियांचे स्थान काय हा मुद्दा महत्वाचा ठरतो.धर्मशास्त्रे आणि धर्म मार्तंड यांनी स्त्रियांना स्वातंत्र्य नाकारले.‘न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हति’ (स्त्री ही स्वातंत्र्याला प्राप्त नाही) किंवा ‘न भजेत् स्त्री स्वतंत्रताम्’ (स्त्रीने स्वातंत्र्य घेऊ नये) स्त्रियांनी – मुलीने, तरुणीने वा वृद्धेने आपल्या घरात स्वेच्छेने काहीही करू नये.
बाल्यावस्थेत पिता, तारुण्यात पती आणि वार्धक्यात मुलगा असे स्त्रीचे तीन आश्रय असतात,त्यांच्यावरच तीने अवलंबून राहावे.
अशाप्रकारे स्त्रियांचे स्थान शूद्र वर्णात राहिले आहे.तुलसीदास त्यापुढे जाऊन रामचरित मानस च्या सुन्दरकांड मध्ये म्हणतात “ढोल, गंवार , शूद्र ,पशु ,नारी सकल ताड़ना के अधिकारी” स्त्रियांची तुलना ढोल,गंवार, शूद्र आणि पशू सोबत करण्याचा अर्थ समजून घ्या ढोल,पशू म्हणजे प्राणी गंवार म्हणजे मूर्ख अनपढ,आणि शूद्र यांना बडवणे,ढोल बडवला की त्याचा मोठा आवाज होतो,तसेच कुणाला बडवलं की मोठा आवाज होतोच.इतरांना उल्लेखिताना शारीरिक पीडा दिली की त्याला अत्याचार म्हणायचं.आज हे जाणून घेताना आश्चर्य वाटू शकेल.कारण आज असं काही असू शकतं यावर कुणाचा विश्वास बसणार नाही.स्त्रियांना शूद्र कसं काय समजलं जाईल ना? असा प्रश्न पडेल.मग त्यावर कसोटी लावायची प्रश्न विचारायचे,विचार करायचा.
स्त्री कोणत्याही धर्माची जातीची अगदी तथाकथित श्रेष्ठ जातीची का असेना ती या व्यवस्थेत शुद्रच मानली गेलीय.
हे आजही दिसून येतं की नाही? आजही स्त्रियांना काही गोष्टी नाकारल्या जातात.
अमुक तमुक करू नका.अमुक तमुक कपडे घालू नका. अमुक तमुक वेळी अमुक तमुक ठिकाणी प्रवेश करू नका.
हे सगळे नियम स्त्रियांना का लावले आहेत? संपत्तित वाटा मिळण्यासाठी झगडावं का लागत आहे?
घरातील सर्व कामे रांधा वाढा उष्टी काढा ही तीलाच का करयाची आहेत?
गेल्या काही वर्षात तीला शिक्षण मिळावं म्हणून महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना
समाजाकडून शिव्या शाप दगड धोंडे का खावे लागले?
आजही नोकरीच्या ठिकाणी समान वेतन,नोकर भर्ती ,राजकारणात महिला धोरण 33% आरक्षण या गोष्टी का आहेत?
याचा शांतपणे विचार केल्यास समजतं स्त्री कोणत्याही धर्माची जातीची अगदी तथाकथित श्रेष्ठ जातीची का असेना
ती या व्यवस्थेत शुद्रच मानली गेलीय.
आज हे सांगण्याचे प्रयोजन काय ? तर आज एका स्त्रीनेच अकलेचे तारे तोडले आहेत.आणि अपेक्षेप्रमाणे ती स्त्रि हिंदुत्ववादी असून भाजपशी संबंधित आहे.शुद्राना शूद्र म्हणल्याने वाईट का वाटते ? – हा प्रश्न बॉम्बस्फोटाचा गंभीर आरोप असणारी प्रज्ञासिंग ठाकूर (Pragya Singh Thakur) हिने विचारला आहे.प्रज्ञासिंग ठाकूर सध्या प्रकृती आस्वास्थ्य असं कारण न्यायालयात सांगून जामिनावर आहेत.
स्त्रिया या देखिल धर्मासाठी धर्म व्यवस्था = पुरुषसत्ताक व्यवस्थेसाठी धडपडत असतात
गंमत आहे ना,हिंदू धर्म रचने नुसार ही प्रज्ञासिंग ठाकूर देखिल शूद्र गणली जातेय मात्र ती इतरांची सुद्धा अशीच हेटाळणी करते आहे.कदाचित तीला हे वास्तव माहीतच नाही.ही व्यवस्था पुरुषांनी बनवली आहे.आणि स्त्रियांनी गुलामीत राहावं अशी व्यवस्था पुरुषांनी निर्माण करून ठेवली आहे.परंतु असेही म्हणता येते की काही स्त्रिया या देखिल धर्मासाठी धर्म व्यवस्था = पुरुषसत्ताक व्यवस्थेसाठी धडपडत असतात,त्यांना मदत करत असतात.नुकत्याच निधन झालेल्या अपर्णा रामतीर्थ कर यांची भाषणे, भाषा,आणि विचार जर ऐकले तर तुम्हाला वरील विधान पटू शकेल,तेच काम या अशा स्त्रिया करताना दिसतात.
आणि या राजकारणात आहेत,फिल्म ,चित्रपट क्षेत्रात आहेत शिक्षण क्षेत्रात आहेत समाजकारणात आहेत आणि सोशल मिडियात सुद्धा आहेत.त्याचा प्रत्यय तुम्हालाही आलाच असेल.तर हे असं आहे. एवढंच नाही. प्रज्ञासिंग ठाकूर ने पुढे आणखी मनाचे श्लोक म्हटले आहेत आणि त्यात क्षत्रिय स्त्रियांनी मोठ्या संख्येने मुलं जन्माला घातली पाहिजेत अशा सूचना दिल्या आहेत.स्त्रियांनी चूल आणि मुलच सांभाळावे अशी धर्म धिष्ठित व्यवस्था आहेच.ती राबवण्याची धडपड स्त्रिया सुद्धा करताना दिसतात.विवेकी विचारी स्वातंत्र्य जपणाऱ्या आणि त्याचं महत्व जाणणाऱ्या स्त्रियांनी ठरवलं पाहिजे नेमकी भूमिका काय घ्यायची..!
कॉर्पोरेट्स शेती : कॉर्पोरेट्स कंपन्या चा भारतीय शेती वर डोळा
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)