नवी दिल्ली 05-12-2025 : बिहारच्या मोतिहारी येथील भाजपा आमदार प्रमोद कुमार यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस खासदार रेणुका चौधरी संसदेत एक कुत्र्याचे पिल्लू घेऊन गेल्याप्रकरणी माध्यमांनी भाजपा आमदार प्रमोद कुमार यांच्याकडे प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी “बर्याच महिला समाधानासाठी कुत्र्यांसोबत झोपतात, मोबाइलवर पाहा, सगळं मिळेल” असे अपमानजनक वक्तव्य केले. या वादग्रस्त वक्तव्यामुळे विरोधकांसह नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

यानंतर माध्यमांनी भाजपा आमदार प्रमोद कुमार यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कॉल स्वीकारला नाही. यानंतर राजद आणि काँग्रेसने हा मुद्दा उचलत भाजपकडून तातडीने कारवाईची मागणी केली आहे. राजद प्रवक्त्या प्रियंका भारती यांनी प्रश्न उपस्थित केला की, “भाजप नेतृत्व महिलांबद्दल अशा अवमानकारक टिप्पणी करणाऱ्या नेत्यांवर मौन का बाळगत आहे?” सोशल मीडियावरही या वक्तव्याची मोठ्या प्रमाणावर निंदा होत आहे.
पिल्लू घेऊन संसदेत जाणे ठरले वादाचे कारण
१ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी कुत्र्याचे एक छोटं पिल्लू घेऊन संसदेत प्रवेश केला. भाजप खासदारांनी याला संसद नियमांचे उल्लंघन मानत आक्षेप घेतला. यावर उत्तर देताना चौधरी यांनी म्हटलं की रस्त्यावर ते पिल्लू जखमी होण्याची शक्यता होती, त्यामुळे त्यांनी ते तात्पुरते उचलले. त्यांनी पुढे टोला लगावला की “चावणारे आणि डसणारे संसदेत बसलेले आहेत, कुत्रे नाही.”
चौधरी यांनी स्पष्ट केले की त्यांनी पिल्लू गाडीत ठेवून नंतर परत पाठवले. भाजप खासदार जगदंबिका पाल यांनी या कृत्यावर कारवाईची मागणी केली होती.
संसदीय नियम काय सांगतात?
संसद परिसरात पाळीव प्राणी आणण्यास स्पष्ट मनाई आहे. संसद भवन परिसराच्या आचारसंहितेनुसार फक्त अधिकृत व्यक्ति, वाहन आणि आवश्यक सामग्रीलाच परवानगी आहे. लोकसभा हँडबुकमध्येही नमूद आहे की कोणताही प्राणी किंवा वस्तू, ज्यामुळे सुरक्षा किंवा शिष्टाचारात अडथळा निर्माण होईल, ती घेऊन जाण्यास मनाई आहे.
भाजप आमदारावर वाढता दबाव
काँग्रेस आणि राजदने या विधानाला “महिलांचा अपमान” ठरवत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस प्रवक्ता स्नेहाशीष वर्धन यांनी म्हटले की हे वक्तव्य भाजप–आरएसएसच्या मानसिकतेचे उदाहरण आहे आणि आमदारांनी तात्काळ माफी मागावी.
राजद नेत्यांनी भाजपच्या महिला नेत्या या मुद्द्यावर शांत असल्याबद्दलही प्रश्न उपस्थित केले आहेत.
वाद आणखी गडद झाला आहे कारण रेणुका चौधरी अलीकडेच तेलंगणातून पुन्हा राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत
आणि महिला हक्कांसाठी सतत आवाज उठवत असतात.
त्यामुळे हा मुद्दा फक्त एका विधानापुरता मर्यादित न राहता संसद मर्यादा आणि महिला सन्मानाचा प्रश्न बनला आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 05,2025 | 10:15 AM
WebTitle – Political uproar after BJP MLA’s remark on women and Renuka Chowdhury’s dog incident























































