पायरेटस् ऑफ कॅरेबीयन मध्ये कॅप्टन जॅक स्पॅरो ची भूमिका साकारणारा जॉनी डेप्प कुणाला माहीत नसेल असे शक्यच नाही. जॉनी डेप्प आणि अंबर हर्ड यांचे लग्न २०१५ आणि ७ मिलीयन डॉलर किंमतीचा घटस्पोट २०१७ ला झाला. आणि ती रक्कम तिने दान केली.
घटस्फोटानंतर अंबरने जॉनी वर अनेक आरोप केले आणि त्यात जॉनी तिला सतत मारायचा असा एक मोठ आरोप केला आणि त्या बरोबर तीने आपला जखमी फोटो ही प्रसिद्ध केला त्यात तिच्या तोंडावर मार लागल्याचे निशाण होते, जॉनी दारू व ड्रगच्या आहारी गेलेल्याचे फोटोही तीने शेयर केले होते.
त्यांनतर तिने एक मॅगझीनमधे स्त्रीयांवर होणाऱ्या घरगुती हिंसेवर लेख लिहीला आणि जगातील सगळ्या फेमीनीस्ट लोकांची आवडती झाली आणि तिला भरपूर सहानुभुती मिळाली लोक तिच्या बाजूने उभे राहीले, तोच काळ metoo चा होता, त्यामुळे अंबर खुपच मोठी ब्राँड बनली, तीचे करियर खुपच मोठे झाले, ॲक्वामॅन सिनेमानेतर तिला जागातीक स्टर बनविले…. वगैरे वगैरे
पायरेटस् ऑफ कॅरेबीयन कॅप्टन जॅक स्पॅरो
पण इकडे जॉनी डेप्पचे आयुष्य मात्र उद्धवस्त झाले, त्याला लोक बायकोला मारणारा (wife-beater) म्हणून हिणवू लागले, त्याचा पायरेटस् ऑफ कॅरेबीयन मधला कॅप्टन जॅक स्पॅरोचा आयकॉनीक पात्र डिस्नेने त्याच्याकडून काढून घेतला, अनेक सिनेमे हातातून गेले, लोकांनी संबंध तोडले, स्टुडीयोंनी प्रोजेक्टस काढून घेतले… हा जागतीक किर्तीचा अभिनेता धुळीस मिळाला, अर्थिक तोटा तर प्रचंड झाला.
तुम्ही प्रसिद्ध व्यक्ती असाल आणि बायकोला मारत असेल किंवा स्त्रीयांवर अत्याचार करित असेल तर वरिल सगळं पश्चिमी देशात होवू शकतं, त्यात नवल नाही… आणि त्याने खरंच बायकोला मारले असेल तर त्याचे त्या समाजातले परिणाम म्हणून त्याच्यावर जी पाळी आळी ते बरोबरच आहे.
पण इथेच गोष्टीत वळण येतं…अंबर जर खोटं बोलत असेल तर? मग हा जॉनी वर झालेला अन्याय आहे…नाही का?
जॉनीने सगळं सहन केलं…आणि सगळे आरोप धुडकावून लावले…पण अंबरच्या त्या लेखानंतर आणि तिच्या जखमी फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर…त्याला सहन झाले नाही…त्यांनी तीच्यावर $50 मीलीयनचा बदनामीचा दावा ठोकला आणि कोर्टात खेचलं… ती केस बोर्डावर यायला ५-६ वर्षे गेली…आणि सध्या या केसचे लाईव प्रेक्षेपण चालू आहे.
आणि त्यात जॉनीने अनेक पुरावे देवून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे की त्याने आयुष्यात कोणावरही हात उचलेला नाही, उलट अंबरच त्याला मारायची आणि तो गपचुप मार खायचा, त्याच्या डॉक्टरने ही पुस्टी दिली आहे, जॉनीचे अनेक जखमी फोटो सादर करण्यात आले.
आणि अंबरचा जखमी फोटो हा फोटोशॉप आहे हेही सिद्ध करण्याचे प्रयत्न चालू आहे… वरून अंबर ही अतिशय घाणेरड्या स्वभावाची बाई आहे हे तीच्याकडे काम केलेल्या तिच्या personal assistance ने ही साक्ष देवून सांगीतले आहे.
ह्या कोर्टाच्या कारवाईत अंबरचे विक्षिप्त वागणे, हिंसक होणे, अगदी जॉनीच्या बेडवर संडास करण्याचे ही फोटो बाहेर येत आहे.
ऑस्ट्रेलियाला असतांना तीने जॉनीवर दारूची बाटली फेकून मारली आणि त्याच्या बोटाचे हाड तुटले असल्याचेही सिद्ध झालेले आहे.
वरून त्यांच्या वयात फरक असल्यामुळे ती जॉनीला सतत जाडा म्हातारा म्हणून हिणवायची सतत अपमान करायची, आणि तेही कोणाही समोर… त्याचे मित्र बहिण, डॉक्टर, अंगरक्षक आणि अंबरच्या साईडचे काही लोक आपली साक्ष देवून जॉनीवर अन्याय झाल्याचे सांगितले आहे.
फक्त प्रेमाखातर किंवा चांगुलपणामुळे म्हणा… काहीही चुक न करता जॉनीने मेहनतीने कमावलेले करियर, मानमरातब, संपत्ती
आणि आपलं आयुष्य घलवून बसला.आणि अंबरने सरळ सरळ खोटं बोलून त्याला संपवून टाकले.असे उलटे चित्र आता समोर येवू लागले आहे.
तरी जॉनी अंबरला कोर्टात खेचण्याचे कारण काय दिले असेल तर..तो म्हणतो…माझी मुले (आधीच्या लग्नातून झालेली) जेव्हा शाळेत जातात
त्यांने इतर मुलांनी बायकोला मारणाऱ्या बापाची मुले म्हणून हिणवतात आणि अंबरचा तो जखमी फोटो दाखवतात…
तेव्हा आपल्या मुलांसमोर मानाने उभे राहण्यासाठी आणि आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यासाठीच त्यांने ही केस केली आहे..असे त्यांने कोर्टात सांगितले.
या सगळ्या प्रकारामुळे इंटरनेट वर धुमाकुळ चालू आहे… जे लोक अंबरच्या बाजूने होते आणि जॉनी विरूद्ध २०१५-१७ला रेंड चालत होते… त्यातील काही लोकांना पश्चाताप होतों आहें… वरून #justiceforjohnnydepp हा ट्रेंड सुरू झाला आहे.
कालच्या एक फ़ोन क्लिपमधे जॉनी आणि अंबरचे संभाषण आले आहे, त्यांना तिला आरोपाचा जाब विचारला… तीन उडवून लावेल… तो म्हणाला तुच मला मारत होतीस…ती म्हणाली हे तु जगाला सांगितलेस तर कोणही विश्वास ठेवणार नाही… ह्या क्लिप मुळे अंबरची बाजू कम कुवत झाली आहे.. हे नक्की.
या केस मधे पुढे काय होईल याचा अंदाज येत असला तरी.जॉनी डेप्पला परत कॅप्टन जॅक स्पॅरो म्हणून बघायला मला आवडेल.
त्याच्यावर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय जरूर मिळायला हवा.
मुद्दा हा आहे की.. कितीही प्रेमात असाल तरी स्वताच्या हक्कांबाबत जागरूक रहा, एकादी व्यक्ती.
व्यक्ती नशा करते म्हणून वाईट नाही किंवा दान करतो म्हणून चांगली नाही.इगोचा मुद्दा सतत लक्षात ठेवा.सत्याच्या बाजूनेच उभे रहा.
दोघांनाही या प्रकरणातून मुक्ती मिळो..
पण या केस नंतर मी कोणत्याही बातमीकडे फक्त स्त्रीवर अन्याय झाला आहे म्हणून बघणार नाही..
तर दुसरी बाजूही जाणूण घेण्याचा प्रयत्न करेन आणि मते बनवीन.
माझ्या वैयक्तीक आयुष्यात मी सतत स्त्रीयांची बाजू घेतली आहे… पण अशा स्त्रीयाही पाहील्या आहेत की ज्या सतत खोट्या बोलतात… तरी या एका केसमुळे माझी भुमिका बदलणार नाही.
असो… ह्या केस मुळे… जॉन डेप्प हा बायकोचा सतत मार खाणारा तरीही त्यालाच बायकोवर अन्याय करणारा म्हणून मिडीयाने तुफान प्रसिद्धी दिली… त्यांचा ब्राँड, आत्मविश्वास, मानसीक आरोग्य, करियर सगळं गेलं… तरी त्यांनी अंबरवर एकही अपशब्द नाही वापरला… कि आरोप केले नाहीत.
जॉनीने आपली बाजू मांडण्यासाठी PR न करता कोर्टात गेला… तेही मुलांच्या प्रेमाखातर… कायमचे निर्दोष साबित होण्यासाठी… किती ही सहनशक्ती.
मला मात्र तिकडेचे कोर्टही कसे चालातात यावर बरेच शिकायला मिळाले… असो..जॉनीवर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय मिळालेच पाहीजे.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
संभाजी भिडे सायकल वरून पडल्याने गंभीर जखमी; उपचार सुरू
..तर राज ठाकरे यांच्यावर UAPA लावा वंचितची बैठकीत मागणी
आसाम : काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी यांची सुटका होताच पुन्हा अटक
नमाजच्या वेळी मशिदीत मोठा स्फोट,लहान मुलांसह 33 ठार
१४ एप्रिल:डॉ.आंबेडकर समता दिन,कॅनडा नंतर या देशात होणार साजरा
पुण्यात ब्राह्मण महासंघाचे आंदोलन; अंगावर आलात तर..-रूपाली पाटील
First Published by Team Jaaglya Bharat on APR 30, 2022 11:57 AM
WebTitle – Pirates of the Caribbean Captain Jack Sparrow is beaten by his wife