Patna Crime News: जनता दल युनायटेड (जेडीयू) चे युवा नेते सौरभ कुमार यांची पटना येथील पुनपुन येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पुनपुन येथील कारपेंटर्स कॉर्नर येथे लग्न समारंभ आटोपून परतत असताना रात्री उशिरा सौरभची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर संतप्त लोकांनी पाटणा-गया रस्ता रोखून धरला. मारेकऱ्यांची ओळख पटवण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
बिहारमधील जनता दल युनायटेड (जेडीयू) च्या सौरभ कुमार या तरुण नेत्याची बुधवारी रात्री पटना येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार,सौरभ कुमार हे रात्री उशिरा आपल्या मित्र आणि कुटुंबासह लग्न समारंभातून परतत होते, त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
जेडीयू नेते सौरभ कुमार यांची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी मसौरीचे एसडीपीओ कन्हैया सिंह म्हणतात, “सौरभ कुमार आपल्या मित्रांसोबत एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आला होता. तेथून परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुनमुन कुमार या आणखी एका व्यक्तीला कंकरबाग उमा रुग्णालयात नेण्यात आले, जिथे जेडीयू नेते सौरभ कुमार यांचा मृत्यू झाला.
जखमी सहकारी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले
एसपी भरत सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “लग्न समारंभातून परत येताच मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी सौरभ कुमार यांच्यावर गोळीबार केला.
या गोळीबारात आणखी एकजण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमी व्यक्तीची प्रकृती धोक्याबाहेर आहे. .”
जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डोक्यात आणि मानेला गोळी लागली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जीवघेण्या हल्ल्यात जेडीयू नेते सौरभ कुमार यांच्या डोक्यात आणि मानेला गोळी लागली आहे.
गोळी लागल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोरांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहेत.
यासंदर्भात स्थानिक पोलिस स्टेशनचे एसपी भारत सोनी म्हणाले की, या घटनेत राजकीय वैमनस्यासह व्यावसायिक संबंधांबाबत सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
सौरभ कुमार हे राजकारणात सक्रिय होते सोबतच प्रॉपर्टी डीलिंगमध्येही काम करत होते. त्यांच्या लोकप्रियतेची पातळी यावरून लक्षात येते की,
विरोधी पक्षाच्या आरजेडी नेत्या मीसा भारती यांनीही हत्येचे वृत्त समजताच घटनास्थळी पोहोचून त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.
गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. सौरभच्या समर्थकांनी मृतदेहासह रस्त्यावर निदर्शनेही केली.
हल्ला झाल्यानंतर जनता दल युनायटेड चे संतप्त समर्थक मोठ्याप्रमाणात घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी सौरभ कुमार यांच्या हत्येप्रकरणी प्रशासनाकडून कठोर आणि त्वरित कारवाईची मागणी जेडीयू कार्यकर्त्यांनी केली. पोलिसांनी लवकरात लवकर मारेकऱ्यांना अटक करून हे प्रकरण उघडकीस आणावे, असेही सांगण्यात आले आहे.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 25,2024 | 13:48 PM
WebTitle –Patna JDU leader Saurabh Kumar shot dead