Nikki Yadav Murder दिल्लीच्या नजफगढ भागात एका २४ वर्षीय तरुणाने आपल्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केल्याची घटना समोर आलीय. साहिल गेहलोत Sahil Gehlot असं आरोपीचं नाव आहे. हे प्रकरण दिल्लीतील प्रसिद्ध श्रद्धा खून प्रकरणासारखे आहे. साहिल गेहलोत ने गर्लफ्रेंड निक्की यादव हिची हत्या करून तिचा मृतदेह त्याच्या ढाब्यावरील फ्रीजमध्ये ठेवला होता. पोलिसांनी ढाब्याची झडती घेतली असता ही धक्कादायक बाब उघडकीस आली.
निक्की यादव ची हत्या केली त्याच दिवशी साहिल गेहलोत ने दुसरे लग्न केले
आता या प्रकरणाशी संबंधित अनेक खुलासे होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, साहिल गेहलोतने प्रेयसी निक्की यादवची हत्या केली त्याच दिवशी त्याने दुसरे लग्न केले होते. पोलिसांनी सांगितले की, आरोपीच्या कुटुंबीयांनी 9-10 फेब्रुवारी रोजी त्याचे लग्न निश्चित केले होते, जे त्याने आपल्या मैत्रिणीला सांगितले नाही आणि यावरून त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर आरोपी साहिल गेहलोतने निक्की यादवची हत्या केली.
हरियाणातील झज्जरमधील खेडी खुम्मर गावात राहणाऱ्या निक्की यादव चा मृतदेह गावात पोहोचण्याची वाट तिचे नातेवाईक आणि गावकरी पाहत आहे. दिल्लीत तीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत मृतदेह गावात पोहोचण्याची शक्यता आहे. मृत निक्की यादव ही तीन भावंडांमध्ये मोठी होती. त्याचे वडील सुनील यांनी सुमारे दहा वर्षांपूर्वी आपले कुटुंब दिल्ली नजफगड येथे स्थलांतरित केले होते.
नातेवाइकांनी सांगितले की, तीन भावंडांमध्ये निक्की सर्वात मोठी असून निधी धाकटी तर शुभम सर्वात लहान आहे.
शुभमचा जन्म दिल्लीतच झाला. दुसरीकडे सुनीलने मुलांचे काम आणि शिक्षण लक्षात घेऊन तिथेच राहण्याचा निर्णय घेतला होता.
सध्या निक्की आणि निधी दोघीही दिल्लीत राहत होत्या. त्यांचे वडील आठवड्यातून एक-दोन दिवस गॅरेज सांभाळायला जायचे.
शुभम हा परिसरातील एका खासगी शाळेत पाचव्या वर्गात शिकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत निक्की हे दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते.
आरोपी साहिल हा कॉलेजमधून फार्मसीचा अभ्यासक्रम करत होता तर निक्की इंग्रजी ऑनर्स शिकत होती.
लॉकडाऊननंतर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता.
निक्की अभ्यासात हुशार होती
मृत तरुणी निक्की अभ्यासात हुशार होती. निकीने सहावीपर्यंत गावातच शिक्षण घेतले होते. त्यानंतर वडील त्यांना शिक्षणासाठी दिल्लीला घेऊन गेले. निकीचे आजोबा रामकिशन यांनी सांगितले की, 23 डिसेंबर 2022 रोजी त्यांच्या दोन्ही नाती घरी आल्या होत्या आणि दोघी 4 दिवस गावात राहिल्या होत्या. जाताना दोघांनाही पॉकेटमनीसाठी प्रत्येकी तीन हजार रुपये दिल्याचे त्यांनी सांगितले.दुसरीकडे ती गावी परतली की घरी येताच ती मला आधी भेटायची. दुसरीकडे, 12 फेब्रुवारी रोजी निकची धाकटी बहीण निधी कॉलेजच्या काही कागदपत्रांवर सह्या घेण्यासाठी घरी आली. एक दिवस घरी राहिल्यानंतर ती 13 फेब्रुवारीला पुन्हा कॉलेजमध्ये अभ्यासासाठी गेली. दरवेळी प्रमाणे यावेळीही आजोबा रामकिशन यांनी दोघांच्या खिपॉकेटमनी खर्चासाठी पैसे दिले होते.
निधी तिच्या कॉलेजमध्ये पोहोचली आणि निकीला पॉकेटमनी देण्यासाठी बोलावले. दिल्लीत निक्की लिव इन मध्ये राहत असल्याने आता दोघी बहिणी वेगळ्या राहत होत्या. निधीने निक्कीला वारंवार फोन करूनही फोन न आल्याने संबंधितांना याबाबत माहिती देण्यात आली.
यादव निक्की चार-पाच दिवसांत घरच्यांशी बोलण्यासाठी फोन करायची.निक्की दर चार-पाच दिवसांनी फोन करून घरच्यांशी बोलायची.
पण यावेळी निकीने अनेक दिवस आजोबांना फोन केला नव्हता.
गावात अस्वस्थता
या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच गावात आगीसारखी पसरली. या विषयावर ग्रामस्थ सर्वत्र चर्चा करताना दिसत होते.
गावात एक जीवघेणी अस्वस्थता पाहायला मिळत होती.कुणीही सुनीलच्या कुटुंबाची माहिती देत नव्हते.
सुनीलचे दिल्लीहून गावी येण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याच्या धाकट्या भावाने सैन्यात असताना लढाईत दोन्ही हात गमावले होते.
फ्रीजमध्ये निक्कीचा मृतदेह सापडला
23 वर्षीय निक्की यादव चा मृतदेह मंगळवारी (14 फेब्रुवारी) तिचा प्रियकर साहिल गेहलोतच्या कुटुंबाच्या मालकीच्या रेस्टॉरंटमध्ये फ्रिजमध्ये सापडला होता. हत्येचा आरोपी 24 वर्षीय साहिल गेहलोत याला अटक करण्यात आली आहे. 9 फेब्रुवारी रोजी निक्की यादवचे सीसीटीव्ही फुटेज देखील सापडले आहे, ज्यामध्ये ती शेवटची दक्षिण-पश्चिम दिल्लीतील तिच्या घरी जाताना दिसली होती. व्हिडिओमध्ये मुलगी एकटी दिसत आहे. काही तासांनी साहिल गेहलोतने तीची हत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
दुसऱ्या महिलेशी लग्न करण्यावरून भांडण
साहिलने दुसऱ्या महिलेशी लग्न करावे यासाठी कारमध्ये दोघांमध्ये सुमारे तीन तास भांडण झाले.
पोलिसांनी सांगितले की, भांडण वाढत असताना साहिलने कारमधील चार्जिंग केबल वापरून निकीचा गळा दाबला.
तो घाबरला आणि त्याने आपल्या कुटुंबाच्या ढाब्यावर मृतदेह फ्रीझरमध्ये लपविण्याचा निर्णय घेतला.
लग्नाच्या एक दिवस आधी कळलं त्याचा साखरपुडा झालाय
आपला लिव्ह-इन पार्टनर साहिल दुसर्या महिलेसोबत साखरपुडा उरकून बसलाय याची पुसटशी कल्पनाही निक्कीला नव्हती. पोलिस सूत्रांनी सांगितले की, साहिलच्या लग्नाच्या एक दिवस आधी निकीला हा प्रकार कळला, त्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी ही हत्या झाल्याचा खुलासा झाला आहे. हे प्रकरण गेल्या वर्षी उघड झालेल्या दिल्लीतील श्रद्धा वालकर खून प्रकरणासारखे आहे. श्रद्धा वालकर चा तिचा प्रियकर आफताब पूनावालाने खून केला आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते.
पोलिसांनी सांगितले की, वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करत असताना निक्की आणि साहिल यांची भेट झाली
आणि ते अनेक वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते.
निक्की यादवच्या वडिलांनी साहिल गेहलोतला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
सोशल मिडियात हिंदुत्ववादी चिडीचूप
एरव्ही लव जिहाद कायदे करा,आंतर धर्मीय आंतर जातीय विवाह रोखा असे कंठषोश करत मोर्चे काढणारे सोशल मिडियात ट्रेंड करत पुरोगामी लोकांना शिव्याशाप देत ट्रोल करणारे हिंदुत्ववादी या घटनेनंतर चिडीचूप असल्याचे पाहायला मिळत आहे.या पार्श्वभूमीवर कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक अध्यक्ष श्री. राज असरोंडकर यांनी जागल्या भारतशी बोलताना आपली प्रतिक्रिया खालील शब्दांत दिली.
हिंदू मुलींवर अन्यायअत्याचार झाला की हिंदुत्ववादी चिडून उठतात. त्यांचा संताप होतो.
अन्याय करणाऱ्याचं काय करावं, असा प्रश्न त्यांना पडतो. मुठी आवळतात.
मग ते जेहाद जेहाद ओरडत रस्त्यावर उतरतात. घोषणाबाजी करतात. स्वतःचा धर्मद्वेषाचा कंडही शमवून घेतात.
निक्की यादवचीही हत्या झाली. तिचं आपल्या प्रियकरावर प्रेम होतं. दोघं लिव ईन रिलेशनमध्ये राहत होते.
पण प्रियकराच्या कुटुंबियांनी त्याचं लग्न दुसरीकडे ठरवलं. प्रियकरांने ही गोष्ट निक्कीपासून लपवून ठेवली.अगदी त्याचं लग्न होईपर्यंत !
प्रियकर इतका थंड रक्ताचा की त्याने निक्कीची हत्या केली व तिचं शव फ्रीजमध्ये ठेवलं. शांतपणे तिथून निघून त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं.
या घटनेवर हिंदुत्ववाद्यांमध्ये सन्नाटा आहे.त्यांची वाचा बसलीय.त्यांच्या तोंडातून जेहादच्या घोषणा निघेनाशा झाल्यात.
तोंड दाबून बुक्क्यांचा मार पडावा तशी अवस्था झालीय.
हे पहिल्यांदा घडलेलं नाही. हे अनेकदा घडतं. मरणाऱ्या मुली हिंदूच असतात,
पण हे शूरवीर काही प्रकरणात अंगठा चोखत गप्प बसून राहतात तर काही प्रकरणात धर्मसंकटात असल्याचा बोभाटा करतात !
निक्कीबाबतही तेच झालं. निक्कीचा प्रियकर साहिल गेहलोत हा हिंदू आहे ; म्हणजे हिंदू मुलानेच हिंदू मुलीची हत्या केलीय आणि वर दुसऱ्या हिंदू मुलीशी लग्न करून तिलाही अंधार ठेवून तिचं आयुष्यही उध्वस्त केलंय. पण अशा घटनांनी हिंदू धर्म संकटात येत नसतो, असं हिंदुत्ववाद्यांनीच गृहित धरलेलं आहे.
यांच्याइतके नीच निर्लज्ज लबाड सडेलमेंदू लोक जगात नसतील. असला कसला हिंदुत्ववाद , ज्याने तुमच्यातला माणूस संपवून टाकलाय !!!
रकारवर टीका करणारे लक्ष्य …’ BBC रेड वर एडिटर्स गिल्ड चं विधान
डॉ.आंबेडकर जीवंत असते तर गोळ्या घातल्या असत्या – हमारा प्रसाद ला अटक
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 15,2023 19:53 PM
WebTitle – Nikki Yadav Murder Case Sahil Gehlot