वाराणसी : आयआयटी बीएचयूमध्ये एका विद्यार्थ्यासोबत घडलेल्या भीषण घटनेनंतर पुन्हा एकदा खळबळजनक घटना घडली आहे. उपचाराच्या बहाण्याने एका डॉक्टरला BHU बनारस हिंदू विद्यापीठ बीएचयूच्या वसतिगृहात (Banaras Hindu University rape case) बोलावून त्याचे कपडे जबरदस्तीने काढण्यात आले.त्याच्यावर अनैसर्गिक बलात्कार करण्यात आला आणि त्याचा व्हिडिओही बनवण्यात आला. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन डॉक्टरकडून खंडणीही वसूल करण्यात आलीय.बीएचयूच्या संस्कृत धार्मिक विज्ञान शाखेच्या नारायण शुक्ल , सूरज दुबे या लिंगपिसाट विद्यार्थ्यांनी ही घटना घडवली. डॉक्टरांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपी विद्यार्थ्यांना अटक केली आहे. इतर काही विद्यार्थ्यांचाही यात सहभाग होता. त्यांचा शोध सुरू आहे.
या दोघांना कारागृहात पाठवण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी आणले असता तेथेही नारायण शुक्ल सूरज दुबे यांनी गुंडगिरी करत वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांना धमकावले. याआधी तीन तरुणांनी आयआयटी BHU बीएचयूच्या विद्यार्थ्यावर अशाच प्रकारे अत्याचार केले होते.महिला विद्यार्थिनीचे कपडे काढून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा व्हिडिओ बनवण्यात आला होता. या घटनेच्या तपासात भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नावे समोर आली होती.त्यावेळी मोठे आंदोलन केले गेले,मात्र बऱ्याच प्रयत्नानंतर तिन्ही आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवण्यात पोलिसांना यश आले.
मात्र शिक्षा काय झाली हे बाहेर आलेलं नाही.मात्र, हे प्रकरण भाजपशी संबंधित असल्याने पोलिसांनी पत्रकार परिषदही घेतली नाही.
या वेळी मात्र डॉक्टर आरोपींना माध्यमांसमोर हजर करून त्यांच्या कृतीचा खुलासा करण्यात आला आहे.
दोन्ही आरोपी संस्कृत धार्मिक विज्ञान शाखेचे पदवीधर विद्यार्थी
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरला बीएचयूच्या वसतिगृहात बोलावून अनैसर्गिक बलात्कार करणारे नारायण शुक्ल सूरज दुबे हे दोघेही संस्कृत धर्म विज्ञान शाखेचे विद्यार्थी आहेत. नारायण शुक्ल सूरज दुबे हे दोन्ही आरोपी पदवीचे शिक्षण घेत आहेत. त्यापैकी एक, प्रतापगड जिल्ह्यातील पूर्व सहोदरपूर येथील रहिवासी नारायण शुक्ला.तर दुसरा सूरज दुबे हा गाझीपूर जिल्ह्यातील सादियााबादचा रहिवासी आहे. दोघांच्या अटकेसोबतच पीडित डॉक्टरकडून हिसकावण्यात आलेली अंगठी, चेन आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. काशी झोनचे डीसीपी आरएस गौतम यांनी दोघांनाही मीडियासमोर हजर करताना सांगितले की, ही घटना बीएचयूच्या रुईया हॉस्टेलमध्ये घडली होती. आरोपींच्या इतर साथीदारांच्या शोधासाठी छापे टाकण्यात येत आहेत.
गे डेटिंग ॲपद्वारे इतर अनेकांना फसवण्याची भीती
डीसीपी म्हणाले की, ज्या विद्यार्थ्यांनी पीडित डॉक्टरांना येथे बोलावून हे क्रूर कृत्य केले ते गे डेटिंग ॲपद्वारे डॉक्टरांशी चॅट करायचे. हा विद्यार्थी अनेकांशी गप्पा मारत असे. गप्पा मारता मारता त्याने डॉक्टरांना सांगितले की त्याचा मित्र आजारी आहे.यानंतर 11 जानेवारीची भेट निश्चित करण्यात आली.पीडित डॉक्टरांना लंकेच्या रविदास गेटजवळील विद्यार्थ्यांनी बोलावले होते. डॉक्टर वेळेवर तेथे पोहोचले आणि विद्यार्थ्यांनी त्यांना त्यांच्या गाडीत बसवले आणि रुईया वसतिगृहात नेले.
खोलीत आधीच इतर काही विद्यार्थी होते. विद्यार्थ्यांनी डॉक्टरचे कपडे जबरदस्तीने काढून खोलीत नेले आणि अनैसर्गिक बलात्कार केल्याचा व्हिडिओ बनवला. कृत्याचा विरोध केल्याने डॉक्टरला मारहाण करण्यात आली. न्यूड व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून 60 हजार रुपये हिसकावले. सोनसाखळी आणि अंगठीही काढून घेतली. काही तासांनंतर डॉक्टरांना सोडण्यात आले. घटनेनंतरही आरोपी पीडित डॉक्टरवर खंडणीसाठी दबाव टाकत होते. यावर डॉक्टरांनी लंका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला, त्यानंतर आरोपी विद्यार्थ्यांना पकडण्यात आले आणि प्रकरण उघडकीस आले.
वैद्यकीय तपासणी करणाऱ्या व्यक्तीशी हाणामारी, तिसऱ्या आरोपीलाही अटक
पोलिसांनी मंगळवारी दोन्ही विद्यार्थ्यांची भेलूपूर येथील स्वामी विवेकानंद शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली.
अटक केलेल्या आरोपींची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांशी हाणामारी झाल्याची माहिती समोर आलीय.
सुटून आल्यानंतर वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरला ‘बघून घेऊ’ अशी धमकी या दोन्ही आरोपींनी दिली आहे.
डॉक्टरांच्या पॅनेलने दोघांची कसून वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले.
न्यायालयाने दोन्ही आरोपींची कारागृहात रवानगी केली.
या प्रकरणातील तीन फरार आरोपींपैकी एका आरोपीला पोलिसांनी मंगळवारी सकाळी ताब्यात घेतले आहे.
एसीपी भेलुपूर डॉ. अतुल अंजन त्रिपाठी यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या तिसऱ्या आरोपीचीही पोलीस चौकशी करत आहेत.
पाकिस्तान च्या ISI साठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेल्या भारतीय दूतावासातील सत्येंद्र सिवाल ला अटक
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 07,2024 | 10:25 AM
WebTitle – Narayan Shukla, Suraj Dubey arrested for raping doctor in Banaras Hindu University hostel