कर्नाटक: कर्नाटक मधिल बेळगावी येथील चिक्कोडी तालुक्यात दिगंबर जैन साधू कामकुमार नंदी महाराज यांची हत्या करण्यात आली. आरोपींनी जैन मुनी यांच्या मृतदेहाचे तुकडे करून गावातील बंद बोअरवेलमध्ये टाकले. पोलिसांनी या हत्येप्रकरणी नारायण बसप्पा माडी आणि हसन दलायथ या दोघांना ताब्यात घेतलं.हत्येचे कारण आर्थिक व्यवहार. 6 लाख रुपयांच्या आर्थिक व्यवहार वादातून ही हत्या झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
कर्नाटक जैन मुनी ची हत्या,काय आहे संपूर्ण प्रकरण?
जैन मुनी कामकुमार हे आपल्या राहत्या खोलीतून ६ जुलै रोजी बेपत्ता झाल्याची बातमी आली. नंदी पर्वत आश्रमातील त्यांच्या खोलीत ते सापडले नाहीत, मात्र त्यांची पिच्छिका आणि कमंडल तिथेच होते. 5 जुलै रोजी रात्री 10 वाजेपर्यंत ते आपल्या खोलीत दिसल्याचे समजते. जैन मुनी बेपत्ता झाल्याने आश्रमातील त्यांच्या शिष्यांनी चिंता व्यक्त केली. बराच शोध घेऊनही ते सापडले नाहीत तेव्हा आचार्य कामकुमार नंदी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भीमाप्पा उगरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
संशयाच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी जैन मुनि ची हत्या केल्याची कबुली दिली.
मात्र, खून कोणत्या ठिकाणी केला आणि मृतदेह कोठे फेकून दिला याबाबत दोन्ही आरोपी पोलिसांची दिशाभूल करत होते.
रविवारी अंत्यसंस्कार
८ जुलै रोजी, पोलिसांनी काटकभावी गावातील बोअरवेलमधून साडीत बांधलेल्या जैन मुनी च्या शरीराचे अवयव जप्त करण्यात आले,
त्यानंतर शवविच्छेदनानंतर मृतदेहाचे तुकडे जैन समाजाच्या ताब्यात देण्यात आले.मुनिश्री यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
2009-10 मध्ये आचार्य कामकुमार मुंबईत चातुर्मास आटोपल्यानंतर हिरेकोडी आश्रमात राहत होते.
आचार्य कामकुमार यांचा जन्म 6 जून 1967 रोजी बेळगाव जिल्ह्यात झाला होता,त्यांना लहानपणापासून ‘भ्रमप्पा’ म्हणून ओळखलं जायचं.
जैन आचार्य श्री कुंथुसागर यांनी त्यांना दीक्षा दिली होती.
या हत्येबद्दल समाज, सरकार आणि भाजप या सर्वांनी काय म्हटले?
निदर्शने- धरणावर बसलेले संत, समाजाची सीबीआय चौकशीची मागणी
जैन संत वरुरु गुणधर नंदी महाराज यांनी कामकुमार यांच्या हत्येनंतर हुबळीत आंदोलन सुरू केले आहे. तर दुसरीकडे या हत्येची सीबीआयकडून चौकशी व्हायला हवी, अशी मागणी जैन समाजाच्या वतीने केली जात आहे.
भाजपचा आरोप
जैन समाज ही एक छोटी व्होटबँक आहे, त्यामुळेच तपासात मोठी गडबड आहे, जैन साधूच्या हत्येनंतर सरकारवर आरोप केले जात आहेत की, या प्रकरणी बरीच गडबड सुरू आहे, कारण जैन समाज एक छोटी व्होट बँक आहे.कर्नाटक भाजपचे प्रमुख नलिन कुमार कटील यांनी सरकारला जैन मुनींना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.
गृहराज्यमंत्री परमेश्वरा म्हणाले की, पोलीस सक्षम आहेत, त्यांनी आरोपींना तत्काळ पकडले. या हत्येच्या संदर्भात पुढील तपास सुरू आहे, त्यामुळे हे प्रकरण दुसऱ्या कोणत्या एजन्सीला सोपवलं जावं,असं मला वाटत नाहीये.अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याबाबत सरकारकडून काळजी घेण्यात येत आहे.
जैनांनो,निदान आता तरी जागे व्हा,जैन समाज अमेरिकेत संघटित
या हत्येच्या पार्श्वभूमीवर आचार्य लोकेश मुनी यांनी भारतातील जैन समाजाला आवाहन केलं आहे.
ते म्हणाले,” जैनांनो, जागे व्हा, निदान आता तरी जागे व्हा! श्वेतांबर किती दिवस दिगंबरात विभागणार?”
“स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच जैनाचार्य कामकुमार नंदी यांची कर्नाटकात हत्या करण्यात आली,
त्यांच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करून फेकण्यात आले.
अमेरिकेत उपोषण करून, जैन आणि भारतीय समाजाच्यावतीने मी कर्नाटकचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, दोषींना कठोर शिक्षा करून संतांच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावले उचलावीत.”
ते पुढे म्हणाले,”अमेरिकेतील सर्व जैन समाज संघटित आहे.तब्बल 70 सेंटर एका छताखाली आहेत, तसेच आम्ही संघटीत असल्याने आमचा आवाज व्हाईट हाऊसपर्यंत ऐकला जातो असेही त्यांनी व्हिडिओ मध्ये म्हटले आहे.
पैशाच्या व्यवहारातून हा खून
या हत्येच्या संदर्भात,आचार्य लोकेश मुनी यांच्या व्हिडिओ खाली आयुष जैन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात
“हे मारेकरी आश्रमात काम करत होते.
कामकुमार महाराज त्यांना उधार पैसे देत असत, पैशाच्या व्यवहारातून हा खून झाला आहे.
मोदींच्या सत्तेच्या नशेत येऊन या हत्येला धार्मिक आणि जातीय रंग देण्याचा प्रयत्नही करू नका.
मारेकऱ्यांना अटक झाली असून, कायदेशीर कारवाई सुरू आहे!
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 10,2023 15:46 PM
WebTitle – Murder of Karnataka Jain Muni Kamakumar Nandi Maharaj