मुंबई : प्रतिनिधी/ पाणी प्यायला देणं हे पुण्याचं काम असं म्हटलं जातं.याच भावनेतून स. गो. बर्वेनगर शाळा क्र.२ भटवाडी घाटकोपर पश्चिम येथील ब्लु पँथर ग्रुप ह्या संघटने तर्फे नागरिकांच्या सोयीसाठी नुकतीच पाणपोई बांधण्यात आली. परंतु स्थानिक मनसे कार्यकर्ता संतोष धुरी हे पाणपोई,संघटनेचा फलक आणि निळ्या झेंड्याला गेल्या १५ दिवसापासून जातीयवादी मानसिकतेतून सतत विरोध करत असून हे सगळं खपवून घेतलं जाणार नाही अशी धमकी संबंधीत संघटनेला देत असल्याचा आरोप संघटनेच्या सदस्यांनी केला.चर्चेतून हा वाद सोडण्याचा प्रयत्न करूनही वाद शमण्याचे नाव घेत नसल्याने अखेर धुरी यांच्या विरोधात पोलिस तक्रार करण्यात आली आहे.
![जातीयवादी मानसिकतेतून मनसे कार्यकर्त्याचा निळ्या झेंड्याला विरोध](https://jaaglyabharat.com/wp-content/uploads/2024/02/MNS-Activist-Santosh-Dhuri-Opposes-Blue-Flag-and-Drinking-Water-Tank-1.webp)
नगरसेवक निधीतून बांधली पाणपोयी
गेली ४ वर्ष ब्लु पँथर ग्रुप ही सामाजिक संघटना या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवत आहेत.
अशाच सामाजिक दृष्टीकोनातून ब्लु पँथर संघटनेने डोंगर वस्तीतील येणाऱ्या जाणाऱ्या आबालवृद्ध नागरिक व शाळकरी मुले यांना
पाणी पिण्यासाठीच्या गरजेतून पाणपोई स्थानिक शिवसेना नगरसेवक हांडे यांच्या नगरसेवक निधीतून बांधण्यात आली.
सदर पाणपोई चे बांधकाम चालू असताना मनसे कार्यकर्ता संतोष धुरी ह्यांनी आक्षेप घेत ह्याठिकाणी संघटनेच्या वतीने पाणपोई,निळा झेंडा लावून जागा बळकावण्याचे काम असल्या संघटना करतात अश्या प्रकराचे भाष्य करत पाणपोई झेंडे फलक हि इथून काढून टाका अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई घडवून आणेल अशी धमकी देत इतर लोकांचा जमाव एकत्रित करून सामाजिक दुही निर्माण करून विषमतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न मनसे कार्यकर्ता संतोष धुरी करत आहेत.
![जातीयवादी मानसिकतेतून मनसे कार्यकर्त्याचा निळ्या झेंड्याला विरोध](https://jaaglyabharat.com/wp-content/uploads/2024/02/MNS-Activist-Santosh-Dhuri-Opposes-Blue-Flag-and-Drinking-Water-Tank-2.png)
मनसे कार्यकर्त्याचा जातीयवादी मानसिकतेतून विरोध
ब्लु पँथर संघटनेने सदर विषयी मनसे कार्यकर्ता संतोष धुरी ह्यांची समजूत काढण्यासाठी चर्चेतून वाद मिटावा म्हणून भेट घेतली असता ते विरोधावर ठाम राहिले आणि ब्लु पँथर संघटनेचे संस्थापक श्री. वसंत डुंबरे ह्यांना म्हणाले की, तु क्षत्रिय मराठा असून ह्या लोकांना साथ देतोस मी तुमचे काही ऐकणार नाही तो निळा झेंडा, फलक, आणि पाणपोई हे सर्व हटविल्याशिवाय मी शांत बसणार नाही.
![जातीयवादी मानसिकतेतून मनसे कार्यकर्त्याचा निळ्या झेंड्याला विरोध](https://jaaglyabharat.com/wp-content/uploads/2024/02/MNS-Activist-Santosh-Dhuri-Opposes-Blue-Flag-and-Drinking-Water-Tank-3.webp)
सततच्या धमकीवजा अरेरावी आणि विरोधाला कंटाळून ब्लु पँथर संघटनेने
आज दिनांक ११ फेब्रुवारी दुपारी ३.०० वाजता मनसे कार्यकर्ता संतोष धुरी ह्यांच्या विरोधात चिराग नगर पोलीस ठाणे येथे
वंचित बहुजन आघाडी भीम आर्मी च्या सहकार्याने बहुसंख्य लोकांसोबत तक्रार नोंदविण्यात आली आहे.
निखिल वागळे हल्ला प्रकरण: पुणे पोलीस आयुक्तांनी ताबडतोब राजीनामा द्यावा -वंचित ची मागणी
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 11,2024 | 22:40 PM
WebTitle – MNS Activist Santosh Dhuri Opposes Blue Flag and Drinking Water Tank, Sparks Controversy with Alleged Communal Mentality