बौद्ध आणि मातंग समाजात तेढ निर्माण करण्याचे काम संघ आणि त्यांच्याशी संबंधित संघटनाकडून सातत्याने होत आहे.या संदर्भात जेष्ठ पत्रकार साहित्यिक Shahu Patole सरांची आजची मांडणी दोन्हीकडील लोकांनी नीटपणे समजून घेण्याची गरज आहे.
सोशल मिडियावर ही फोटोपोस्ट शेअर करत मातंग समाज इतिहास सांगण्याच्या नावाखालली बुद्धीभेद केला जात आहे,त्यामुळे जेष्ठ पत्रकार साहित्यिक शाहू पाटोळे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत,शाहू स्वत: त्याच समाजातून असल्याने त्यांची ही मांडणी अन प्रश्न जास्त महत्वाचे ठरतात.
मातंग समाज इतिहास सांगण्याच्या नावाखालली बुद्धीभेद केला जात आहे
#मातंगांचा_अनैतिहास : ‘मातंगांचा इतिहास’ या चोपड्याच्या अंतर्गत मातंग लोकांची भलामण करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि ती भलामण पसरविण्याचे कारस्थान योजनाबद्ध रीतीने केले जात आहे. शिकलेले मांग गेल्या काही वर्षांपासून स्वतःला ‘मातंग’ म्हणवून घेत आहेत, शिवाय मातंग ऋषींचा आश्रम कुंटे होता याचे हंपी परिसरात ‘संशोधन’ करताहेत. कोणत्याही जातीला स्वतःची मुळं शोधण्याची उत्सुकता असते, ती मातंग जातीतील लोकांनाही असणे अनैसर्गिक कसं म्हणता येईल? असो
इतिहासाच्या नावाखाली भाकडकथा सांगत असताना,त्यांचे इतिहासातील संदर्भ देणे महत्वाचे असते ना की, पोथ्या-पुराणातील. म्हणे, ‘मातंग ही जमात नाही.’ मग मातंग आणि मांग वेगवेगळे आहेत का? ‘मातंगांचे राज्य चीन पासून श्रीलंकेपर्यंत पसरलेले असेल,’ तर, मातंग दिसायला मंगोलवंशीय दिसायला हवे होते? महाराष्ट्र,तेलंगण,आंध्रप्रदेश आणि कर्नाटकात इतक्या कमी संख्येने मांग का आढळतात? बाकी राज्यांतील मातंग कुठे गायब झाले? की त्यांचा कुणी वंशसंहार केला?
१)भ.श्रीकृष्णाचे गुरू सांदीपनी मातंग होते. तर मग आजही मातंग लोकांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी का आहे? ब्रिटिशांचे राज्य येईपर्यंत मातंग लोक कोणत्या आश्रमात शिक्षण घेत होते?
२)मातंगेश्वर महादेव मंदिर जर मातंग वंशाच्या लोकांचे असेल, तर मग आज त्या मंदिराची मालकी कुणाकडे आहे? ASI कडे असेल तर ती आता मातंग लोकांकडे द्यायला हवी. बरं त्या मंदिराचे पुजारी मातंग होते की अन्य कुण्या जातीचे होते?त्या मंदिरात मातंग लोकांना प्रवेश दिला जात होता का? महाराष्ट्रातील कोणत्या कोणत्या गावातील महादेवाच्या मंदिरात मातंगांना ‘मुक्त प्रवेश’ आहे? मी गावं म्हणजे खेडी म्हणतोय.
३)कुबेराची देवी जर मातंगी असेल आणि इतर जाती म्हणजे कोणत्या जाती? मातंग स्त्री ला लक्ष्मी म्हणून पूजतात? हा ‘ऐतिहासिक’ मुद्दा सविस्तरपणे मांडला असता, तर आमच्यासारख्या अडाणी लोकांच्या ज्ञानात भर पडली असती. तसं असेल तर मग शतकानुशतके मांग गिऱ्हाण का मागत होते? दफडी का वाजवीत होते?
४)शबरीचे गुरू मातंग वंशाचे असतील, त्या शबरीची उष्टी बोरं, श्रीरामांनी खाल्ली असतील, तर मातंग लोकांना वाड्यावरील इटकं चिटकं खाण्याची वेळ का आली होती?मेलेल्या ढोरांचं मांस का खावं लागत असेल? मांग जर क्षत्रिय असतील तर, मग पूर्वीच्या काळचे क्षत्रिय मोठ्याचं मांस खात होते का?
५)इंद्रावर स्वारी करणारा त्रिशंकू मातंग असेल, तर तो का ‘लटकलेला’ आहे?
६)भ.बुद्धाचे समकालीन महागुरू जगदीश कश्यप मातंग नसते तरी कुणाला काय फरक पडला असता?
७)कौशल सम्राट प्रसेनजीत हा मातंग असूनही बुद्ध धर्माचा अनुयायी होता, हे सांगायला नवइतिहासकार विसरले वाटतं.
८)हनुमानाची आई ‘अंजनी’ मातंग होती, तरी गावोगावचे तथाकथित उच्चवर्णीय जातीचे लोक मातंग भावाभावांची भेट का होऊ देत नाहीत? भाऊ भेटायला गेल्यावर का बदडतात? हनुमंताला भावाला मारताहेत हे बघून राग का येत नसेल?
९)डक्कलवार जे वाद्य वाजवितात तो ‘रावणतारा’ नसतो तर ती किंगरी असते. डक्कलवार मातंगांना राजे मानत नाहीत तर, पाटील किंवा मालक म्हणतात. या नवइतिहासकारांना ‘बसवपुराण’ माहीत नाही का? एखाद्या डक्कलवाराकडून बसवपुराण ऐकलं, तर यांचा हा सगळा ‘इतिहास’ नव्याने लिहावा लागेल. नेमकं त्यांना हेच होऊ द्यायचे नाही.
मुळात महाराष्ट्रातील बौद्ध आणि मांगांमध्ये जी सुप्त तेढ आहे त्याचा फायदा उठवून त्यांना एकमेकांच्या विरोधात उभे करण्याचे हे षडयंत्र आहे. दोन जातीतील ती तेढ अगदी गावगाड्यातील होती. खरं तर आता मूळ कारण खिळखिळं झालं असलं, तरी काही ‘शक्तींना’ त्यांनी एकत्र यावं अस वाटत नाही. त्या शक्ती पूर्वी भूमिगत होत्या, त्यांनी आता मुखवटे फेकून दिलेले आहेत.
शरजील इमाम अन्य लोकांची देशद्रोह आरोपातून मुक्तता
लंडनच्या एडवर्ड चा औरंगाबादच्या सांची सोबत बौद्ध पद्धतीने विवाह
अदानी यांच्या अडचणीत वाढ NDTV सोडतायत पत्रकार
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 05,2023 13:10 PM
WebTitle – Matang community History