महाराष्ट्राची संस्कृती उदारमतवादी राहिली आहे.महाराष्ट्राची राजभाषा मराठी असली तरी इथं अनेक भाषांचा स्विकार केला जातो.महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीच्या राज्यसरकारने महाराष्ट्रात पहिली पासून हिंदी भाषा सक्ती चे धोरण राबवण्याचा जीआर काढला आहे.यामुळे महाराष्ट्रात एकच गदारोळ झाला असून अनेक मराठी भाषिक यामुळे नाराज झाल्याचे चित्र दिसत आहे.या निर्णयाला राजकीय पक्षाकडून विरोध सुद्धा होत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यसरकारला थेट आव्हान दिले आहे की आम्ही हे खपवून घेणार नाही.या पार्श्वभूमीवर आज मुंबई पुणे या ठिकाणी मनसेकडून आंदोलन करण्यात आले.यासोबत जीआरची होळी करण्यात आली.सोशल मिडियावर सुद्धा मोठ्याप्रमाणात विरोध पाहायला मिळाला.

भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नसून समाजाच्या आत्म्याचं प्रतिबिंब असतं. तीच त्यांची विचारधारा, श्रद्धा, परंपरा, संस्कृती आणि जगण्याची शैली घडवते.
म्हणूनच जेव्हा एखादी भाषा लोप पावते, तेव्हा ती फक्त काही शब्दांचं नव्हे, तर संपूर्ण संस्कृतीचं आणि ओळखीचं अवसान घेऊन जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एके ठिकाणी म्हटलं होतं –
“A bitter truth is better than a sweet lie.” (कडवट सत्य गोड खोटेपणापेक्षा केव्हाही चांगलं असतं.)
भाषा नष्ट होत असतील तर आपण हे कडवट सत्य स्वीकारून उपाय शोधायला हवा, अन्यथा भविष्यात फक्त पश्चात्ताप करावा लागेल.
त्यामुळे मराठी भाषेवर होणारी इतर भाषिक आक्रमणे थोपवणे गरजेचे झाले आहे.
भारतातील बोलीभाषांचा मृत्यू
आज भारतात सुमारे 700 पेक्षा अधिक भाषांपैकी 200 पेक्षा जास्त बोलीभाषा “लुप्तप्राय” या श्रेणीत आहेत. कोटा, टोडा, मुंडा, गोंड, कोरकू अशा आदिवासी जमातींच्या भाषा काळाच्या प्रवाहात हरवत चालल्या आहेत. या भाषांमध्ये स्थानिक संस्कृती औषधशास्त्र, पर्यावरणाविषयीचे ज्ञान, लोककथा, सण-उत्सव यांचं मूळ दडलेलं असतं. त्या भाषा हरवल्या, की हे सारे मौल्यवान ज्ञानही हरवतं.
कोटा आणि टोडा जमातींच्या भाषा आज UNESCO च्या “Critically Endangered” यादीत आहेत. याचा अर्थ, त्या भाषा बोलणारी नव्या पिढीतली कुणीच व्यक्ती शिल्लक नाही. यासोबत, अंदमानातील बो भाषा 2010 मध्ये लुप्त झाली – ही भाषा बोलणारी शेवटची व्यक्ती ‘बोआ सीनिओर’ जेव्हा मरण पावली, तेव्हा तिच्यासोबतच एक हजार वर्षांची संस्कृतीही मरण पावली.
इतर देशांत काय घडलं?
Eyak भाषा (अलास्का): 2008 मध्ये शेवटची व्यक्ती मरण पावली. आज ती भाषा फक्त अभिलेखात आहे.
Ubykh भाषा (तुर्की/रशिया): तिच्याकडे 80+ उपप्रकर होते, पण 1992 मध्ये तिचा अखेरचा भाषिक मरण पावला.
Manx भाषा (Isle of Man): 1974 पर्यंत लोप पावली होती, पण स्थानिक प्रयत्नांनी तिला पुन्हा शिकवायला सुरुवात झाली आहे.
या देशांनी काही गोष्टी शिकल्यानंतर नव्याने प्रयत्न सुरू केले – भाषा संग्रह, शाळांमध्ये स्थानिक भाषांचं शिक्षण, आणि डिजिटल माध्यमांतून त्या भाषा पुन्हा वापरात आणणं. आपल्यालाही हेच करावं लागेल, पण आपल्याकडे अजून वेळ आहे तोवर.
भाषिक विषमता आणि राज्यरचनेचं संकट
भारतामध्ये मोठ्या राज्यांची सत्ता, लोकसंख्या आणि संसाधने जास्त असताना छोट्या राज्यांची भूमिका झपाट्याने दुय्यम ठरत आहे.
राजकीय सत्तेच्या असमतोलामुळे भाषिक आणि सांस्कृतिक अस्मिता दाबल्या जातात.
हीच बाब डॉ. आंबेडकर यांनी भाषिक राज्यांच्या वेळी मांडली होती. त्यांनी सांगितलं की:
“Too great a disparity between units is dangerous to national unity.”
संघराज्य टिकवायचं असेल, तर सर्व भाषांना न्याय द्यावा लागेल.
भाषा वाचली, तरच संस्कृती टिकेल
बोली भाषा मरणं ही नैसर्गिक प्रक्रिया नाही, ती मानवनिर्मित आहे – उपेक्षा, सत्तेचे केंद्रीकरण, आणि विकासाच्या चुकीच्या व्याख्या यामुळे ती घडते. म्हणूनच ही प्रक्रिया उलटवणं मानवी हातात आहे. शैक्षणिक पाठ्यपुस्तकांत स्थानिक भाषा, शासनाच्या धोरणांमध्ये भाषेचा आदर, आणि तरुण पिढीने भाषेच्या गर्वाने त्या वापरणं – हे सगळं आवश्यक आहे.
भाषा मेली की शब्द मरतात, पण त्याहून मोठं म्हणजे – माणसाची ओळख मरते.

मिलिंद धुमाळे
संपादक जागल्याभारत
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 18,2024 | 20:20 PM
WebTitle – marathi bhasha marathi culture