मुंबई दि.28 – मराठा आरक्षण आंदोलन च्या बाबतीत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सरकार कडक शब्दात इशारा दिला आहे. ‘जर ६ जूनपर्यंत निकाल लागला नाही तर कोविड-बिविड बघणार नाही. मी आंदोलनात सर्वात पुढे असेल.’ असा इशारा त्यांनी दिला आहे.
आता लोकांची जबाबदारी नाही तर आमदार खासदार यांची जबाबदारी आहे.
मराठा आरक्षण आंदोलन समाजाच्या प्रश्नावर दोन दिवसांचे अधिवेशन व्हावे.
हा चुकला तो चुकला यासाठी नाही तर समाजासाठी काय करणार हे सांगण्यासाठी.
नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन आहे त्या दिवशी किंवा इतर चांगल्या दिवशी खासदार मंत्री यांची गोलमेज परिषद दिल्लीत घेणार.
असल्याचं देखील संभाजीराजे यांनी सांगितलं.
ओबीसी प्रमाणे मराठा समाजातील लोकांना सवलती द्या. ६ जून हा राज्याभिषेक सोहळा आहे.
शिवाजी महाराज या दिवशी छत्रपती झाले. सहा जून पर्यंत या पाच गोष्टी वर निकाल लागला नाही.
तर आंदोलनाची भूमिका रायगडायवर जाहीर करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
सगळ्यांना शांत ठेवलं. नाहीतर महाराष्ट्र पेटला असता
“मुख्यमंत्र्यांना मला आज स्पष्ट सांगायचं आहे. ६ जून हा राज्याभिषेक सोहळा आहे. त्या दिवशी शिवाजी महाराज छत्रपती झाले. जर ६ जूनपर्यंत यावर काही कारवाई केली नाही. तर आमची आंदोलनाची भूमिका रायगडावरून जाहीर करू. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना असं टाकलं असतं का? त्यामुळे ६ जूनआधी आम्हाला बोलावून निश्चित असा काही कार्यक्रम तुम्ही दिला नाही, तर नंतर आम्ही कोविड-बिविड बघणार नाही. मी स्वत: ५ मे रोजी निकाल लागला तेव्हा सगळ्यांना शांत ठेवलं. नाहीतर महाराष्ट्र पेटला असता. पण आम्ही किती शांत बसायचं?” असं ते म्हणाले.
शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येणार का या प्रश्नावर खासदार संभाजीराजे म्हणाले “ती पूर्वीपासूनच एकत्र आहे. छत्रपती शाहूमहाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.आणि म्हणूनच मीही एड. प्रकाश आंबेडकर यांना भेटणार आहे. त्यांचच सहकार्य आपल्याला लागणार आहे.आणि हे सोशल इक्वेशन नसून सोशल स्टॅबिलिटी साठी आणायची आहे.कारण सोशल इक्वेशन हा राजकीय शब्द झाला आम्ही सामाजिकदृष्ट्या म्हणत आहोत. आणि म्हणून मी त्यांना भेटणार आहे.
एड. प्रकाश आंबेडकर आणि संभाजीराजे भोसले भेट
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचक हो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)
First Published on MAY 28, 2021 19: 52 PM
WebTitle – Maratha Reservation sambhaji raje bhosale press conference 2021-05-28