जालना : अंतरवाली सराटीला निघालेल्या हाकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात…मराठा आरक्षण मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा सक्रिय झाले असून त्यांनी सध्या आमरण उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा 6 वा दिवस आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठा आरक्षण विषयावर मिळालेल्या सकारात्मक आश्वासनानंतर जरांगे यांनी उपचार घेणे सुरू केले आहे. दरम्यान, अंतरवाली सराटी मध्ये ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध म्हणून अंतरवाली सराटी मध्येच आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. उपोषणासाठी अंतरवाली सराटी येथे जात आसताना त्यांना पोलीसांनी त्याब्यात घेतलं होतं. प्रा. लक्ष्मण हाके हे अंतरवाली सराटीमध्ये जाऊन उपोषणाला बसणार होते पण पोलिसांनी त्यांना आधीच बार्शी पोलीस स्टेशनला बोलावून थांबवून ठेवलं आहे.
मराठा-ओबीसी संघर्ष पेटणार? मध्यरात्री मोठी घडामोड, अंतरवाली सराटीला निघालेल्या हाकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात
ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांना बार्शी पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतलं होतं. लक्ष्मण हाके यांना रात्री एक वाजता नोटीस देऊन पोलिसांनी सोडल्यानंतर ते रात्री एक वाजता अंबड येथील बैठकीसाठी बीडकडे रवाना झाले. अंबड मधिल ओबीसी समाज लक्ष्मण हाकेंच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे. ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके हे अंतरवाली सराटी येथे प्राणांतिक उपोषण करण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले. मराठा अरक्षणच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषण स्थळाजवळ ओबीसी नेते लक्ष्मण हाके उपोषण सुरू करणार होते.
ओबीसी आरक्षणामध्ये इतर कुणालाही प्रवेश देऊ नये यासंदर्भात राज्य सरकारनेही कृती करू नये अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केलेली आहे.
तसेच ओबीसी बांधवांच्या मनात एक सुरक्षितेची भावना निर्माण व्हावी यासाठी आंतरवाली सराटी येथे
प्राणांतिक उपोषण सुरू करण्यासाठी हाके जात होते. असं त्यांनी म्हटलं असून,
अंतरवाली सराटी येथे जात असताना बार्शी पोलिसांनी त्यांच्यासह तीन जणांना ताब्यात घेतलं.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 13,2024 | 09:25 AM
WebTitle – Maratha-OBC conflict : Laxman Hake, who was leaving for the Antarwali Sarati, was taken into custody by the police