गुजरात : एका बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीच्या खटल्याच्या संदर्भात तिचे वय आणि बलात्कार सारखा मुद्दा लक्षात घेऊन तिच्या पालकांनी गर्भपात करण्याची अनुमती न्यायालयाकडे मागितली असता गुजरात हायकोर्ट मधिल सिंगल जज असणाऱ्या बेंच ने एका प्रकरणात सुनावणी करताना अवांतर चर्चेदरम्यान न्यायाधीश दवे यांनी चक्क मनुस्मृती चा उल्लेख करत बलात्कार पीडित मुलीचा गर्भपात संदर्भात निर्णय राखून ठेवला.इतकच नाहीतर बचावपक्षाच्या वकिलाला मनुस्मृती वाचण्याचा सल्ला देत,त्यावेळी मुली कशा अल्पवयीन असतानाच मुलांना जन्म देत होत्या याचीही भलामण गुजरात हायकोर्ट कडून केली गेली,यामुळे सोशल मिडियात टीकेची झोड उठली होती.अनेकांनी हे गंभीर आणि चिंताजनक असल्याचं म्हटलं होतं.
भगवद्गीतेनुसार एखाद्या टीकेकडे किंवा स्तुतीकडे दुर्लक्ष केले पाहिजे.
आता या प्रकरणी टीका गदारोळ झाल्यानंतर खुद्द न्यायाधीशांनी पुन्हा एकदा त्या संदर्भात वक्तव्य करत मोठं विधान केलंय.
बलात्कार पीडित व्यक्तीच्या गर्भपात संदर्भातील याचिकेवर सुनावणी घेताना मनुस्मृती चा उल्लेख करणारे गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश समीर दवे यांनी गुरुवारी म्हटलं की,न्यायाधीश “स्थितप्रज्ञ” सारखा असला पाहिजे. असं म्हणताना त्यांनी आता गीतेचा संदर्भ दिला आहे. भगवद्गीतेनुसार एखाद्या टीकेकडे किंवा स्तुतीकडे दुर्लक्ष केले पाहिजे.
गुजरात हायकोर्ट चे न्यायाधीश समीर दवे यांनी नुकतेच वयाच्या संदर्भात तोंडी विधान केलं होतं की
पूर्वीच्या काळी 14-16 व्या वर्षी मुलींची लग्न होत आणि वयाच्या 17 व्या वर्षी त्या मुलांना जन्म देत.
‘पूर्वी मुलींचे वय 14-15 व्या वर्षी लग्न होत असे आणि मुली 17व्या वर्षी आई बनत होत्या’, यावेळी त्यांनी मनुस्मृती चा दाखला दिला होता.
मुलीच्या अल्पवयीन वयाचा मानसिकेतचा विचार करून गर्भपात करण्यास परवानगी द्यावी या वडिलांच्या विनंतीला उत्तर देताना न्यायाधीशांनी ही टिप्पणी केली होती.
गुरुवारी, जेव्हा हे प्रकरण पुन्हा सुनावणीसाठी समोर आले तेव्हा सरकारी वकील यांनी जे राज्याचे प्रतिनिधित्व करत आहेत,
त्यांनी खंडपीठाला सांगितले की सुनावणीच्या शेवटच्या तारखेला काही निरीक्षणे चुकीच्या मार्गाने घेतली गेली.
यासाठी न्यायमूर्ती दवे यांनी भगवत गीतेचा उल्लेख करत म्हटलं की न्यायाधीशांनी “स्थितप्रज्ञ” असावं
“मी फक्त असे म्हणू शकतो की न्यायाधीशांनी “स्थितप्रज्ञ” असावं, ज्याची व्याख्या भगवत गीताच्या दुसर्या अध्यायात केली गेली आहे. याचा अर्थ असा की टीका असो की स्तुती एखाद्याने त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. म्हणूनच, माझा ठाम विश्वास आहे की न्यायाधीशांनी “स्थितप्रज्ञ” असले पाहिजेत, ” असं मत न्यायाधीश दवे यांनी व्यक्त केलं.
सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी बचावपक्षाच्या वकिलांकडून पीडित आणि आरोपी यांच्यात तडजोड करणे शक्य आहे का
यावर अॅडव्होकेट सिकंदर सईद यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
“मी यापूर्वी प्रयत्न केला पण त्याच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.या कोर्टाचा अधिकारी म्हणून मी असे म्हणू शकतो की यामुळे तीन जीव वाचतील (गर्भाचा जीव, पीडित अन आरोपी),” वकिलांनी स्पष्ट केले.
खंडपीठास पुढे माहिती देण्यात आली की आरोपीला सध्या मोर्बी जिल्ह्यातील तुरूंगात ठेवण्यात आले आहे.
यावर, खंडपीठाने प्रतिसाद दिला,
“मी त्याला कॉल करून विचारू. मी त्याच्याकडून खात्री करून घेतो, (जर तडजोड होण्याची शक्यता असेल तर). आतापर्यंत मी फक्त संभाव्यतेचा विचार करीत आहे. माझ्या मनात काय चालले आहे ते मी सांगत नाही पण अनेक सरकारी योजना आहेत. त्याला येऊ द्या, आपण त्याच्याशी बोलू. “
न्यायाधीशांनी वकिल सिकंदर सईद यांना सुनावणीच्या पुढील तारखेला आपला क्लायंट (आरोपी) आणि पीडित पक्षकार
यांना देखील कोर्टात आणण्याचा सल्ला दिला.त्यानुसार खंडपीठाने शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सुनावणी तहकूब केली आहे.
मनुस्मृती वाचा, वयाच्या 17 व्या वर्षी मुली मुलांना जन्म द्यायच्या, कोर्टाच्या वक्तव्याने खळबळ
सरस्वती वैद्य;खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले
पत्नीचे तुकडे करून पाण्याच्या टाकीत लपवले
Nikki Yadav Murder :निक्की यादव चा खून,फ्रीजमध्ये मृतदेह;संपूर्ण प्रकरण
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा..
First Published by Team Jaaglya Bharat on 16, JUN 2023, 17:33 PM
WebTitle – Manusmriti mentioned in court; Judge says “I ignore criticism”