पुणे,प्रतिनिधी : भाजपचे नेते व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बहुजन महापुरुषांच्या संदर्भात केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तणावग्रस्त बनले होते,तर पुण्यात त्याचे तीव्र पडसाद उमटत अपमानजनक वक्तव्याच्या निषेधार्थ चंद्रकांत दादा पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर मनोज गरबडे (Manoj Garbade) या समता सैनिक दलाच्या सैनिकाकडून “शाई फेक” करण्यात आली होती.यानंतर काही तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर सत्तेचा गैरवापर करत अतिशय गंभीर कलमे लावण्यात आली होती,यामुळे समाजात आणखी संतापाची लाट उसळली,यावेळी विविध राजकीय पक्ष अन नेते या विषयावर एकत्र आले त्यांचे एकमत झाले आणि अशा प्रकारे कारवाई उचित नसल्याचे अनेकांनी म्हटलं.या घटनेत कायदेशीर बाबी हाताळण्यासाठी आंबेडकरी समाजातून अनेक निष्णात वकिल पुढे आले.या सर्व प्रकरणाचा आढावा ॲड.राज जाधव यांनी जागल्याभारत कडे पाठवला आहे,तो आम्ही वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत.
दि.१०/१२/२०२२ रोजी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा श्री.मोरया गोसावी समाधी मंदिर, चिंचवड पुणे येथे नियोजित दौरा असताना श्री.मोरेश्वर शेडगे यांच्या निवासस्थानातून बाहेर पडत असताना मनोज भास्कर गरबडे, धनंजय इजगज व विजय ओव्हाळ या तरुणांनी त्यांचे चेहऱ्यावर शाई फेक केल्याचा आरोप ठेऊन त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
बातमी सर्वत्र पसरल्यानंतर पोलीस स्टेशन परिसरात गर्दी होऊ लागली, सदर प्रकरण हाताळण्यासाठी कार्यकर्त्यांचे वकिलांना फोन येऊ लागले, परिणामी तसेच ॲड.राज जाधव, ॲड.प्रवीण जगताप, ॲड.स्नेहा कांबळे, ॲड.वंदना गायकवाड, ॲड.तायडे, ॲड.कडू हे चिंचवड पोलीस स्टेशन येथे गेल्यानंतर दिसून आले की, शाईफेकीच्या प्रकरणात एफआयआर मध्ये ३०७ सारखे गैरलागू कलम देखील दाखल केलेले आहे, त्यासोबतच भा.द.वी. कलम ३५३, ३५५, २९४, ५००, ५०१, १२० ब व ३४ दाखल केलेले आहे. सबब याचे गांभीर्य ओळखून वकिलांनी एक टीम बनवली ज्यामुळे पुढची वाटचाल सोईस्कर होईल.
दि.११/१२/२०२२ रोजी रविवार असल्याकारणाने आरोपींना स्पेशल कोर्टात रिमांड साठी हजार केले,
तत्पूर्वी वकिलांनी मीटिंग घेऊन यात कोणाचा काय रोल असेल हे निश्चित केले,
त्यानुसार ॲड.अतुल सोनावणे,ॲड.उमेश गवळी, ॲड.सचिन भोसले व ॲड.अतुल कांबळे यांना युक्तिवाद करावयाचा
व इतर टीम मेंबर्सनी त्यांना मदत करतील अशी भूमिका पूर्ण टीम द्वारे ठरवण्यात आली होती.
पोलिसांनी रिमांड रिपोर्ट मध्ये आरोपींची सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली,
सरकारी वकिलांनी त्यांच्या युक्तिवादात सांगितले की,
पिडीत व्यक्तीवर जे काळे द्रव्य टाकण्यात आले त्याचे नमुने तपासणी करिता पाठवायचे आहेत,
तसेच आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का ? आरोपी कोणत्या राजकीय पक्षात आहेत का ?
त्यांनी हे कृत्य कोणाच्या सांगण्यावरून केले वगैरे…
आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, ३०७ हे कलम इथे लागू होत नाही, पिडीत व्यक्तीच्या चेहऱ्यावर टाकण्यात आलेले द्रव्य हे वॉटर कलर आहेत, जे एखाद्याचा जीव जाईल असेल हानिकारक नाहीत तसेच कोणाच्या चेहऱ्यावर किती ही हानिकारक द्रव टाकले असता त्या व्यक्तीचा जीव जाऊ शकत नाही, त्याच प्रमाणे आरोपींना अटक दुपारी करण्यात आले तसच गुन्हा मध्यरात्री दाखल करण्यात आला त्यामुळे तपासासाठी इतका वेळ पुरेसा आहे, तसेच त्या भागात सीसी टिव्ही असल्यामुळे तुम्ही यात सहभागी कोणी असेल त्याचा त्यांनी तपास स्वतः घ्यावा, त्या करिता आरोपींच्या कोठडीची गरज नाही..
मे.कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन पुढील तपासासाठी ३ दिवसांची पोलीस कोठडीचे आदेश दिले.
सबब दि.१४/१२/२०२२ रोजी आरोपींना नियमित वेळेनुसार मे.कोर्टात हजर न करता संवेदनशील प्रकरण असल्यामुळे सकाळी ११.३० चे सुमारास मे.न्यायलायात हजर केले.
पोलिसांनी आरोपींना हजर करताना रिमांड रिपोर्ट भा.द.वी. कलम ३०७ कमी करूनच रिपोर्ट सादर केला व मे. न्यायालयाला न्यायालयीन कोठडीची मागणी केली, सबब वकिलांनी ठरल्याप्रमाणे जामीनसाठी अर्ज ठेवला, ३०७ कलम कमी केले असले तरी ३५३ व इतर काही कलम अजामीनपात्र होती, सबब सदरील कलम ट्राएबल बाय सेशन होती, परंतु सेशन कोर्टात जामीन अर्ज ठेवण्यास विलंब झाला असता व आरोपींची तुरुंगात रवानगी झाली असती, सबब वकिलांच्या टीम ने ठरल्याप्रमाणे मे. न्यायदंडधिकारी प्रथम वर्ग यांचे समोरच अर्ज दाखल केला व मे.कोर्टाने योग्य बाजू तपासून पाहिली असता आरोपी मनोज गरबडे, धनंजय इजगज व विजय ओव्हाळ यांना सशर्त जामीन मंजूर केला.
जामीनदार मिळवून देण्यासाठी ॲड.भाई विवेक चव्हाण, ॲड.राज जाधव व ॲड.प्रवीण जगताप, ॲड. स्नेहा कांबळे, ॲड.वंदना गायकवाड, ॲड.ओव्हाळ, ॲड.कांबळे, ॲड.शिनगारे तसेच संपर्ण टीम ने सहकार्य केले. तसेच कल्याण मुंबई येथून ॲड.केदार, ॲड.वाघमारे व त्यांचे सोबत वकिलांचे एक पथक देखील आलेले होते.
त्यानंतर मनोज गरबडे, धनंजय इजगज व विजय ओव्हाळ यांनी पिंपरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नागरिकांनी देखील वकिलांच्या संपूर्ण टीमचे पुष्पगुच्छ देवून, पेढे भरवून स्वागत केले.
सदर प्रकरणात वकिलांना सर्व पक्षीय राजकीय नेते मंडळी, सामजिक कार्यकर्ते तसेच भीम सैनिकांनी पाठबळ दिले.
यात प्रामुख्याने सुलोचना शिलवांत, मारुती भापकर, देवेंद्र तायडे, चंद्रकांता सोनकांबळे,सुरेश निकाळजे तसेच अनेक नेतेमंडळी तसेच सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचा समावेश होता.
सबब सादर प्रकरण मा.चंद्रकांत दादा पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्त्यव्याचा निषेध म्हणून केल्याचे बोलले जात आहे.
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फासणारे मनोज गरबडे आहेत तरी कोण?
शाई फेक अन मारहाण नेत्यांना कधी कधी झाली ? जाणून घ्या.
Video:न्यायमूर्ती जितेंद्र मिश्रा यांच्या व्हायरल व्हिडिओ मागील एक खुलासा
man of hole आणखी एक आदिवासी समाज जगातून पूर्णपणे मिटवला गेला
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 15,2022, 10:10 AM
WebTitle – Manoj Garbade gets bail, Ink throw case, what happened in the court?