मणिपूर मधील परिस्थिती बिघडली अमित शाह यांनी महाराष्ट्रातील सर्व सभा रद्द केल्या : मणिपूर मध्ये परिस्थिती आणखी बिघडल्याने केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आली आहे. वाढत्या हिंसाचारामुळे सीआरपीएफचे महासंचालक अनीश दयाल मणिपूरला रवाना झाले असून तेथील कायदा आणि सुव्यवस्थेची पाहणी करतील. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील आपले सर्व कार्यक्रम सभा रॅली रद्द केले आहेत. नागपूरमधून ते तातडीने दिल्लीला परतले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी सुरक्षा दलं आणि स्थानिक पोलीस नव्या रणनीतीवर काम करत आहेत. कर्फ्यूत शिथिलता दिलेल्या काही भागांमध्ये पुन्हा कर्फ्यू लावण्यात आला आहे, तर इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे. बिष्णूपूर, इंफाळ, आणि जिरीबाम या भागांमध्ये तणाव वाढल्याची वारंवार बातमी येत आहे, त्यामुळे या भागांमध्येही पुन्हा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
हिंसाचार का उफाळला?
गेल्या मंगळवारी जिरीबाममध्ये एका कुटुंबातील तीन महिलांचे आणि तीन लहान मुलांचा अपहरण झाल्यानंतर त्यांचे मृतदेह शनिवारी आसाम-मणिपूर सीमेवर सापडले. या निर्दयी हत्येमुळे संतप्त मेतेई समाज रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन करत आहे. शनिवारी (16 नोव्हेंबर 2024) मेतेई समाजाच्या जमावाने तीन मंत्री आणि सहा आमदारांच्या घरांची तोडफोड केली. त्यानंतर संतप्त जमावाने मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या घरावर धडक मारण्याचा प्रयत्न केला.
मेतेई समाजाने दिले अल्टीमेटम
मणिपूरमधील नागरी संस्थांनी सरकारला 24 तासांत निर्णायक कारवाई करण्याचे अल्टीमेटम दिले आहे. मेतेई नागरी हक्क गट, मणिपूर इंटिग्रिटी कोऑर्डिनेशन कमिटी (COCOMI) चे प्रवक्ते खुरैजम अथौबा म्हणाले, “राज्याचे प्रतिनिधी आणि सर्व आमदारांनी एकत्र येऊन हा संघर्ष लवकरात लवकर सोडवण्यासाठी निर्णायक पाऊल उचलावे.” त्यांनी पुढे म्हटले, “जर त्यांनी मणिपूरच्या जनतेच्या समाधानानुसार निर्णय घेतला नाही, तर त्याचा परिणाम भोगावा लागेल. आम्ही भारत सरकार आणि मणिपूर सरकारला सर्व सशस्त्र गटांविरोधात निर्णायक कारवाई करण्यासाठी 24 तासांचा अल्टीमेटम दिला आहे.”
मणिपूरमधील परिस्थिती गंभीर आहे. सरकार आणि सुरक्षा दलांनी कठोर निर्णय घेतल्याशिवाय हा संघर्ष शांत होण्याची चिन्हं नाहीत.
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 17,2024 | 18:56 PM
WebTitle – Manipur-violence- amit-shah-rallies-cancelled