मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी प्रवेशपत्रांबाबत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. यावर्षीच्या हॉल तिकिटांवर विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे,यामुळे खळबळ उडाली असून अनेक शिक्षण तज्ज्ञ आणि शिक्षकांकडून या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख करून सरकार विद्यार्थ्यांच्या मनात भेदभाव निर्माण करत असल्याचे काही लोकांनी म्हटले आहे.
हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख का? मंडळाचे अजब स्पष्टीकरण
मंडळाने स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांच्या जातीची नोंद पालक आणि विद्यार्थ्यांना कळावी, तसेच त्यात चूक झाल्यास योग्य दुरुस्ती करता यावी, यासाठी हा निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय विभागाकडून विद्यार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जात-आधारित आकडेवारी सादर करणे गरजेचे असते. त्यामुळे हॉल तिकिटावर जात प्रवर्गाचा उल्लेख उपयुक्त ठरू शकतो, असे मंडळाचे म्हणणे आहे.
नवीन बदलांची ओळख
यावर्षीच्या दहावी-बारावीच्या हॉल तिकिटांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यात विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख सकरण्यात आला असून, बारावीच्या हॉल तिकिटांचे वितरण सुरू झाले आहे. दहावीच्या हॉल तिकिटांचे वितरण सोमवारपासून सुरू होणार आहे.
तसेच, शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत की, विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये जातीसंदर्भात काही त्रुटी असल्यास त्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन दुरुस्त करता येतील. विद्यार्थ्यांची नोंद व्यवस्थित असल्याची खात्री करण्यासाठी हॉल तिकिटावर जात प्रवर्गाचा उल्लेख केल्याचे मंडळाने सांगितले आहे.
शिक्षण तज्ज्ञांचा विरोध
या निर्णयावर शिक्षण तज्ज्ञ आणि शिक्षकांकडून टीका होत आहे. शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी बोर्डाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. “परीक्षेत विद्यार्थ्यांची ओळख लपवण्याचा प्रयत्न असतो. ओळख गुप्त ठेवण्यासाठी रोलनंबरवरही स्टिकर लावला जातो. अशा परिस्थितीत हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख करणे चुकीचे आहे. निकाल पत्रावर जात छापणे समजू शकतो, पण हॉल तिकिटावर जात लिहिणे अनावश्यक आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
दहावीच्या हॉल तिकिटांचे वितरण
फेब्रुवारी-मार्च 2025 च्या दहावीच्या परीक्षा प्रवेशपत्रांची ऑनलाईन पद्धतीने वितरण प्रक्रिया 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
शाळांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्रे डाउनलोड करता येतील.
शाळांनी विद्यार्थ्यांना वेळेत प्रवेशपत्रे वाटप करावी, अशी सूचनाही देण्यात आली आहे.
शिक्षण क्षेत्रातील चर्चा
बोर्डाच्या या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. शिक्षणाशी संबंधित विविध संघटना आणि तज्ज्ञ मंडळी या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी करत आहेत.सोशल मिडियावर लोक संताप व्यक्त करायला लागले आहेत.हा निर्णय विद्यार्थ्यांच्या ओळखीशी संबंधित संवेदनशील विषय असल्यामुळे भविष्यात त्याचे काय परिणाम होऊ शकतात, यावर देखील चर्चा सुरू आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 18,2024 | 13:11 PM
WebTitle – maharashtra-ssc-hall-ticket-2025-caste-mention
Maharashtra SSC Hall Ticket 2025: Caste Mention Sparks Controversy Among Educators