मुंबई, 27 मे: राज्यातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा (Coronavirus second wave) संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) ब्रेक द चेन (Break The Chain) अंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध लागू राहणार की नाही याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम राज्यात दिसून आला आणि वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लागला तसेच रिकव्हरी रेटही वाढू लागला.
जवळपास दोन महिन्यांपासून लागू असलेल्या या लॉकडाऊननंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्येत मोठी घसरण झाली आहे. लॉकडाऊन वाढवण्यात येणार आहे तसेच काही निर्बंध शिथिल करण्याच्या संदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.
सरसकट लॉकडाउन उठवण्याबाबत निर्णय झाला नसल्याची माहिती
आज कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
सरसकट लॉकडाउन उठवण्याबाबत निर्णय झाला नसल्याची माहितीही त्यांनी दिली.
सध्या आहे त्या निर्बंधांमध्ये काही ठिकाणी शिथीलता ( Break The Chain ) आणण्याचा विचार झाला असल्याचं टोपे यांनी सांगितलं.
या संदर्भातली नियमावली येत्या दोन दिवसात जाहीर होणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. कोरोना विषाणूमध्ये होणारे जनुकीय बदल आणि उत्परिवर्तनामुळे संभावित तिसरी लाट आल्यास त्यामध्ये लहान मुलांना कोरोना संसर्गाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यापासून लहान मुलांचा बचाव आणि आवश्यक उपचार पद्धती विकसित करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. रविवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील बालरोग तज्ज्ञांशी संवाद साधून संभाव्य तिसरी लाट आल्यास लहान मुलांच्या उपचाराबाबत चर्चाही केली केली होती.
कोरोना संसर्गाच्या लहान मुलांमध्ये होणाऱ्या प्रादुर्भावापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धतीबाबत
मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांच्या विशेष कार्यदल (टास्क फोर्स) डॉ. सुहास प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला आहे.
यामध्ये 13 तज्ज्ञ सदस्य असून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक त्याचे सदस्य सचिव आहेत.
मराठा आरक्षणविरोधात नागपूर कनेक्शन ; भाजपा व संघ
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचक हो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)
First Published on MAY 27, 2021 18: 18 PM
WebTitle – Maharashtra Lockdown continue with some relaxation 2021-05-27