अत्यंत बहूअपेक्षित ” मामनान ” Maamannan trailer चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, ज्यात तगडी स्टार कास्ट उधयनिधी स्टॅलिन, फहाद फासिल, Vadivelu वाडिवेलु आणि कीर्ती सुरेश यांच्या मुख्य भूमिकेसह “परियेरम पेरुमल” आणि “कर्नन” या ब्लॉकबस्टरसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक Mari Selvaraj मारी सेल्वराज यांच्या या आगामी चित्रपटाने पुन्हा एकदा जोरदार एंट्री केलीय,यासोबतच सिनेमाचे आणखी एक दमदार वैशिष्ट्य म्हणजे ऑस्करपुरस्कार प्राप्त संगीतकार ए आर रहमान यांचं संगीत या चित्रपटाला लाभलं आहे,एवढच नाहीतर यातील एक गाणे अन खास एंट्री सुद्धा रहमान यांनी केलीय.सिनेमाच्या ट्रेलरचं प्रेक्षकांनी जोरदार स्वागत केलंय.ज्यात फहाद फासिल, वाडिवेलु यांच्या अदाकारीने प्रेक्षकांची उत्कंठा ताणली गेलीय, त्यामुळे रिलीजच्या आसपासच्या उत्साहात भर घातली आहे. प्रख्यात उत्पादन आणि वितरण कंपनी रेड जायंट निर्मित,मामनान Maamannan ट्रेलर रिलीज झाला असून मारी सेल्वराज सोबत ए आर रहमान ची सिनेविश्वात जोरदार चर्चा सुरू आहे.
मामनान Maamannan राजकीय थ्रिलर चित्रपट
मामनन (transl. Emperor) हा आगामी भारतीय तमिळ-भाषेतील राजकीय थ्रिलर चित्रपट आहे जो मारी सेल्वराज लिखित आणि दिग्दर्शित आहे आणि उदयनिधी स्टॅलिन निर्मित आहे. या चित्रपटात वादिवेलु, फहाद फासिल, कीर्ती सुरेश आणि स्टॅलिन यांचा समावेश असलेल्या कलाकारांचा समावेश आहे.सिनेमा च्या छायाचित्रणाची सुरुवात 2022 मार्चमध्ये सुरू झाली. मात्र चित्रपटाच्या शुटिंगचे पहिले शेड्यूल चित्रपटाची घोषणा होताच त्याच महिन्यात गुंडाळले गेले होते,पुन्हा शूटिंग सुरू झाल्यानंतर वाडिवेलू ची एंट्री झाली. वाडिवेलु वर 5 वर्षे बॅन होता,त्यामुळे तो कोणत्याही चित्रपटात काम करू शकत नव्हता. “मामनान” चित्रपटाच्या निमित्ताने वाडिवेलु पुन्हा प्रेक्षकांना दिसणार आहे, यावेळी वाडिवेलुचं भव्य स्वागत करून शूटिंगला सुरुवात झाली होती,
विनोदी कलाकार म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वादिवेलूचे पात्र विशेष प्रभावशाली
दिग्दर्शक मारी सेल्वाराज यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की या चित्रपटातील विनोदी कलाकार म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वादिवेलूचे पात्र विशेष प्रभावशाली असेल, जे दर्शकांना आश्चर्यचकित करणार आहे. याआधी रिलीज झालेल्या “मामनन” च्या लिरिकल व्हिडिओंना प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे, ज्यामुळे चित्रपटाच्या रिलीजची अपेक्षा निर्माण झाली आहे. सोनी म्युझिकने या चित्रपटाचे संगीत हक्क मिळवले आहेत. सिनेमॅटोग्राफी त्यांच्या अपवादात्मक कामासाठी ओळखल्या जाणार्या थेनी इसवार यांनी हाताळली आहे.
उल्लेखनीय म्हणजे, तामिळनाडूचे युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री म्हणून राजकारणात उतरलेल्या उदयनिधी स्टॅलिन यांनी घोषणा केली की “मामनन” या त्यांच्या अंतिम चित्रपटात दिसणार आहेत. उदयनिधी स्टॅलिन हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे पुत्र आहेत.आणि मंत्रिमंडळात मंत्री देखील आहेत.
ट्रेलरमध्ये Vadivelu वादिवेलू एका संगीतकाराच्या भूमिकेत दिसतात,जो संगीतकार आपली कला लहान मुलांपर्यंत पोहोचवतो. Udhayanidhi Stalin उदयनिधी स्टॅलिन त्यांच्या मुलाच्या भूमिकेत दिसत आहेत.
हा चित्रपट एचआर पिक्चर्सद्वारे केरळमध्ये वितरित केला जाणार आहे.
प्रेक्षक 29 जूनपासून थिएटरमध्ये “मामनन” अनुभवण्यासाठी उत्सुक आहेत.
चित्रपटाचे पीआर प्रथमेश शेखर यांनी व्यवस्थापित केले आहे.
हातात डुक्कर घेऊन असलेला हिरो मेनस्ट्रीम चित्रपटात कधीही पाहण्यात आला नाही
फँड्री fandry मध्ये डुक्कर पकडणाऱ्या कुटुंबाची गोष्ट असली तरी तो भाग संवेदनशील म्हणून असहायपणे आलेला दिसतो,
हिरॉईजम च्या प्रकारात हिरो घोड्यावर असतो,फारतर चांगल्या ब्रिड चा कुत्रा बाळगून असलेला दिसेल,
हिरो डुकराचं पिल्लू घेऊन बसलेला अन त्यावर करुणेने हात फिरवत असलेला सापडणे अशक्य आहे.
परंतु तमिळ चित्रपट अन त्यातही मारी सेल्वराज यांचा मामनान Maamannan सिनेमा ही अशक्य गोष्ट शक्य करताना दिसतो आहे.
shajan__kiruba या युजरने हा फोटो शेअर करत अत्यंत बोलकी प्रतिक्रिया दिली आहे.
“आता कला सौंदर्य बदलत आहे! काळ आणि दृश्ये बदलत आहेत. यावेळी कृष्णवर्णीय कवी लँगस्टन ह्युजेस यांची एक कविता ध्यानात येते. आम्ही कृष्णवर्णीय कलाकारांची नवीन पिढी आहोत.कोणतीही भीती किंवा लाज न बाळगता आम्ही आमचे अद्वितीय गडद त्वचेचे वैशिष्ट्य व्यक्त करतो.”
जात चोरी : उपसंचालक डॉ जसवंत दहिया ला अटक
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा..
First Published by Team Jaaglya Bharat on 17, JUN 2023, 16:10 PM
WebTitle – Maamannan trailer latest update