मुंबई – वंचित बाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकसत्ता वृत्तपत्राने पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी! असा इशारा वंचितकडून देशातील काही विरोधी पक्ष एकत्र येत त्यांनी INDIA आघाडी स्थापन केली आहे. त्याची पुढील बैठीक महाराष्ट्रात होणार आहे.सर्व विरोधी पक्ष एकत्र आले असले तरी यात आंबेडकरी विचारांच्या पक्षांना मात्र जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आल्याचे चित्रं आहे.याबाबत जागल्याभारत ने सुद्धा प्रश्न उपस्थित करत जाब विचारला होता,मात्र आता विरोधी पक्षाकडून वंचित बहुजन आघाडीला कोंडीत पकडण्याचे व बदनाम करण्याचे उद्योग सुरू झाल्याचे दिसून येत आहे.याच पार्श्वभूमीवर कॉँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सहभागी होण्याचे निमंत्रण दिल्याची चुकीची माहिती दिली होती,त्यावर वंचित बहुजन आघाडीने तत्परतेने खुलासा करत त्याची हवा काढून घेतली होती,मात्र आता प्रसार माध्यमांकडूनही खोट्या बातम्या पेरण्याचे काम सुरू झाले आहे.
वंचित बहुजन आघाडीला INDIA अलायन्सच्या बैठकीचं निमंत्रण नाही
प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून लोकसत्ताच्या खोट्या बातमीची हवा काढत त्यांना धारेवर धरले आहे.ते पत्रकात म्हणाले “वंचित बहुजन आघाडीला INDIA अलायन्सच्या बैठकीचं निमंत्रण आलेलं नाही. निमंत्रण नसल्यामुळे आम्ही बैठकीत सहभागी होऊ शकत नाही, हे पक्षाच्यावतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे. मात्र तरीसुद्धा काही माध्यमे सतत संभ्रम निर्माण करणाऱ्या खोट्या बातम्या पसरवत आहेत. दैनिक लोकसत्ता आवृत्तीमध्ये वंचित बहुजन आघाडीने इंडिया अलायन्सच्या बैठकीकडे पाठ फिरवली अशी बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र त्या बातमीत इंडिया अलायन्सच्यावतीने वंचित बहुजन आघाडीला बैठकीचं निमंत्रणच देण्यात आलेलं नाही, याचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही.
त्यामुळे आम्ही सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात खोट्या बातम्या देणं तात्काळ बंद करा.
लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याऐवजी जी वस्तुस्थिती आहे त्या संदर्भात बातम्या द्याव्यात. आता जनता शहाणी झाली आहे,
तुमच्या फेक बातम्यांना बळी पडणार नाहीये. राजकीय पक्षांची किंवा राजकीय नेत्यांची दलाली करणे बंद करावे.
वंचित बहुजन आघाडीला बैठकीचे निमंत्रण दिले असल्याच्या खोट्या बातम्या पेरणाऱ्यांना आम्ही आवाहन करतो की,
जर असे निमंत्रण पाठवले असेल, तर इंडिया अलायन्सच्या नेत्यांच्या अधिकृत स्वाक्षरीने निघालेले पत्र जनतेसमोर जाहीर करावे.
अन्यथा लोकसत्ता माध्यमाने खोट्या बातम्या छापल्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी.
आंबेडकरी दलित वर्गातील एकही चेहरा (पक्ष) नसलेली विरोधकांची आघाडी लोक स्वीकारतील?
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 30,2023 | 11:48 AM
WebTitle – loksatta newspaper spreading fake news about Vanchit bahujan aghadi should give proof or apologize