लाडकी बहीण योजना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. 15 ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अनेक महिलांना याचा लाभ घेता आला नाही, तर काहींचे अर्ज बाद झाले आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीत काही ठिकाणी गोंधळ झाल्याचे दिसून येत आहे.
तरुणाच्या खात्यात पैसे
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला नारी शक्ती अॅपद्वारे अर्ज भरत आहेत. तसेच, अंगणवाडी सेविकांकडूनदेखील अर्ज भरून घेतले जात आहेत. ज्यांचे अर्ज स्वीकारले जात आहेत, त्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा होत आहेत. परंतु, कोणताही अर्ज न करता एका तरुणाच्या बॅंक खात्यात पैसे जमा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, पण योजनेचा लाभ एका भावाला मिळाल्याचे यवतमाळ येथे उघड झाले आहे. यवतमाळच्या आर्णी येथील जाफर गफ्फार शेख या तरुणाच्या खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना उपक्रमाचे पैसे जमा झाले आहेत.
चौकशीची मागणी
विशेष म्हणजे, जाफर शेख यांनी लाडकी बहीण योजनेसाठी कोणताही अर्ज केलेला नव्हता, तरीही त्यांच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यात या योजनेचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत. आता या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जाफर यांनी केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर असताना, एका चॅनेलने लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठा AI सर्वे केला आहे. पहिली मराठी AI अँकर झीनिया हिने या सर्वेचा आढावा घेतला आहे. हा सर्वे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आला आहे, ज्यात डेटा संकलन आणि प्रक्रिया या तंत्राचा वापर झाला आहे. या सर्वेक्षणात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आढावा घेतला असून ती योजना गेम चेंजर ठरेल का, असा अंदाज घेण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकांच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. परंतु, विरोधकांनी या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, त्यामुळे लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चॅनेलने घेतलेल्या सर्वेक्षणात 55% लोकांना वाटते की लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल, तर 30% लोकांना वाटते की ती गेम चेंजर ठरणार नाही. तसेच, 15% लोकांनी यावर आपलं मतप्रदर्शन केलं नाही.
लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल का? विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेचा कौल
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काय आहे?
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करत
राज्यातील महिलांना एक छोटासा आर्थिक आधार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला होता.
त्यानंतर 28 जून रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेची अधिकृत घोषणा करण्यात आली.
या योजनेद्वारे महिलांना दर महिन्याला 1500 रुपये अर्थसहाय्य राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे.
21 ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच अविवाहित महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेचा पहिला हप्ता म्हणून बुधवारी 35 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.
आता 1.25 कोटी महिलांच्या खात्यात महिन्याअखेर पैसे जमा होण्याची शक्यता आहे.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 17,2024 | 09:38 AM
WebTitle – ladki bahin yojana money in brother’s bank account