काश्मीर :12-12-2025 : उत्तर काश्मीर मधील बारामूला जिल्ह्यातील झेहनपोरा येथे पुरातत्वविभागाला कुषाणकालातील बौद्ध वसाहतीचे अवशेष सापडले आहेत. तज्ञांनी या शोधाला अत्यंत महत्त्वपूर्ण असे म्हटले आहे.
या ठिकाणाचे दस्तऐवजीकरण जम्मू-कश्मीरमधील विद्यार्थी, काश्मीर विद्यापीठाच्या मध्य आशियाई अध्ययन केंद्रातील टीम (CCAS) आणि जम्मू-कश्मीर सरकारच्या अभिलेखागार, पुरातत्व आणि संग्रहालय विभाग (DAAM) यांच्या संयुक्त प्रयत्नातून केले जात आहे.

काश्मीर झेहनपोरा बौद्ध वसाहत : तांब्याच्या वस्तू आणि मातीची भांडी सापडली
DAAM मधील उत्खनन सहाय्यक जावेद मंटो यांनी सांगितले की, मागील पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या उत्खननात कुषाणकालीन तीन स्तूप, संरचनात्मक भिंती, मातीची भांडी, तांब्याच्या कलाकृती आणि स्तूपांचे अवशेष मिळाले आहेत. त्यांनी सांगितले की, हा उत्खनन प्रकल्प महत्त्वाचा आहे कारण तो आपल्याला 2,000 वर्षे मागील काळ समजून घेण्यास मदत करणार आहे. या प्रकल्पात सहभागी विद्यार्थ्यांना देखील मोठा शैक्षणिक अनुभव मिळत आहे.
जावेद मंटो यांनी सांगितले की, टीमने राजतरंगिणी, ऐतिहासिक प्रवासवर्णने आणि भूमिगत रडार (GPR) यासारख्या साहित्यिक स्रोतांचा वापर करून या ठिकाणाची ओळख पटवली. GPR ने जमिनीखाली प्राचीन संरचनांचे संकेत दिले. कडाक्याच्या थंडीमुळे उत्खनन काही काळासाठी थांबविण्यात आले असून, पुढील पाच ते सहा दिवस उत्खनन चालणार आहे. मे महिन्यात पुन्हा काम सुरू होण्याची अपेक्षा आहे.
कडाक्याच्या थंडीत उत्खनन तात्पुरते थांबवले
31 ऑक्टोबर रोजी CCAS आणि DAAM यांनी जम्मू-कश्मीरमध्ये पुरातत्व संशोधन, दस्तऐवजीकरण आणि वारसा संरक्षण मजबूत करण्यासाठी सामंजस्य करार (MoU) केला. या भागीदारीमध्ये क्षेत्रीय काम, संशोधन, संग्रहालय प्रदर्शनासाठी कलाकृतींचे अध्ययन, 3D डिजिटल दस्तऐवजीकरण आणि साइट म्युझियम तसेच माहिती केंद्रे विकसित करणे यांचा समावेश आहे.

ड्रोन, मॅपिंग आणि प्रत्यक्ष क्षेत्र निरीक्षणाचा वापर करून प्राथमिक सर्वेक्षण झाल्यानंतर ही उत्खनन मोहीम सुरू करण्यात आली.
झेहनपोरा जवळ मोठाले टेकाडे आढळले, ज्यांना दीर्घ काळापासून प्राचीन स्तूपांचे अवशेष मानले जात होते.
उच्च रिझोल्यूशन मॅपिंग, ड्रोनद्वारे दस्तऐवजीकरण आणि डिजिटल संग्रहाद्वारे या ठिकाणाची व्यवस्थित पुनर्प्राप्ती केली जात आहे.
जावेद अहमद मंटू सर्वेक्षक आणि उत्खनन सहाय्यक पुरातत्व विभाग काश्मीर यांनी माहिती देताना म्हटले की,
आम्हाला अनेक साहित्य आणि रचनामध्ये याबद्दल माहिती मिळत होती की इकडे एक बुद्ध कालीन नगर असू शकते.
याचा उल्लेख पुरातन प्रवासी वर्णनात आढळत असून बारा मुला लगतपासून जाणाऱ्या या स्थळाला सिल्क रूट चा भाग मानला जातो
प्रदेशाचा इतिहास समजून घेण्यासाठी मोठी मदत होणार
बारामूला जिल्हाधिकारी मिङ्गा शेरपा यांनी या ठिकाणाला भेट दिली. त्यांनी सांगितले की काश्मीर झेहनपोरा बौद्ध वसाहत : हा शोध प्रदेशाच्या भूतकाळ समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. त्यांनी म्हटले की, या उत्खननामुळे येथे वापरल्या जाणाऱ्या बांधकाम साहित्याचा, मातीच्या भांड्यांचा आणि प्राचीन वसाहतींच्या स्वरूपाचा अभ्यास करणे सोपे होईल. हा शोध बारामूला च्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडणारा आहे.
शेरपा यांनी प्रदेशाच्या प्राचीन व्यापारमार्ग म्हणून असलेल्या ऐतिहासिक महत्त्वावर प्रकाश टाकला.
त्यांनी सांगितले की, कुषाणकालातील ही शोधमोहीम खोऱ्यात (व्हॅलीमध्ये) अशा प्रमाणात प्रथमच होत आहे.
हा प्रकल्प दोन ते तीन वर्षे चालण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी पुन्हा सांगितले की, हा उत्खनन बारामूला जिल्ह्याच्या इतिहासात नवीन अध्याय लिहिणार आहे.
हा प्रदेश प्राचीन काळापासून व्यापार मार्ग म्हणून ओळखला जातो आणि कुषाणकालीन अवशेषांचे हे उत्खनन अत्यंत महत्त्वाचे आहे.
काश्मीर खोऱ्यात या प्रमाणावर अशी उत्खनन मोहीम यापूर्वी झालेली नव्हती.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 12,2025 | 15:00 PM
WebTitle – Kushan-era Buddhist Settlement Unearthed in Zehanpora Baramulla























































