कट्टासेरी जोसेफ येसूदास…..k. j. Yesudas
जन्म : १० जानेवारी १९४०
जन्माने केरळीयन दलित ख्रिश्चन…..
अॉगस्टीन व एलिझाबेथ जोसेफ यांचे पोटी जन्म….
मल्याळम शास्त्रीय संगीतातून आरंभ
१९६१ साली अधिकृत गायकीस सुरूवात…
आज ८३ व्या वर्षात पदार्पण….!!!
आजवर विविध भाषेतील तब्बल ऐंशी हजार गाणी त्यांचे नावे आहेत…….!!!!
केरळला God’s own country म्हटले गेलेय तरी तिथली जनता येसूदास यांना God’s own voice मानते. येसूदास यांचा आवाजातील भजन ऐकल्याशिवाय तिथली प्रसन्न पहाट उगवणारच नाही काय अशी लोकांची आत्यंतिक श्रद्धा त्यांचे आवाजावर बसली आहे.
त्यांची मल्याळम गाणी आणि भजन मी कधी ऐकली नाहीत पण आताही कधीतरी उशिरा रात्री येसूदास ऐकल्याशिवाय शांतताच वाटत नाही.
येसूदास तुम्हाला शांत करतात. खूप खूप निवांत…. तुमच्या मस्तकातला ज्वर कमी करतात. मातृसत्तेच्या शमम कल्चरमध्ये जसं आवाजानेच उपचार केले जायचे, Healing the wounds, soothing the hearts…. असंय ते….
येसूदास असा जेंटलमन जादूगर आहे……!!!!
.
त्यांच्या आवाजाच्या या सामर्थ्यशाली वैशिष्ठ्यापर्यंत भले भले सहजही फिरकू शकले नाहीत…….!!!!!
आणि हिंदीतली गाणी ऐकून बघा…….
त्यांनी सिलेक्शन केलेली जंटल गाणी ऐकून पहा…
“तेरी छोटीसी एक भूल ने सारा गुलशन जला दिया….
” गोरी तेरा गांव बडा प्यारा…
” मधुबन खूश्बू देता है, सागर सावन देता है…
” ओ गोरिया तेरे आनेसे सज गयी हमरी नाव…
” माना हो तुम बेहद हसी, ऐसे बुरे हम भी नही…
” चांद जैसे मुखडे पे, बिंदीया सितारा….
” दिल टुकडे, टुकडे करके, मुस्कराके चल दिए…
“जानेमन जानेमन तेरे दो नयन….
“का करू सजनी आए न बालम……
” सुरमई आंखियोमें नन्हा मुन्हा सपना दे जा रे….
“कोई गाता मै, सो जाता….
” धीरे धीरे सुबह हुई…..
” आज से पहले, आज से ज्यादा इतनी खुशी नहीं मिली…..
.
अशी कितीतरी गाणी नुसती ऐकतच पडावं वाटतं.
मागे एकदा श्रेया घोषाल ने येसूदास यांचेबरोबर, ” सुरमई आंखियोमें नन्हा मुन्हा सपना दे जा रे “गायलं तेव्हा तिथले लोक महिला सगळे प्रचंड भावूक झाले होते.
मला वाटतं येसूदास यांच्या गायकीला कोणत्याही बंधात बांधता येणार नाही. ते केवळ, ” जखमा सुगंधी झाल्या कशा काळजाच्या त्या, ज्याने वार केला मोगरा असावा तो “या इलाही जमादार यांच्या गझलेतील मोगरा आहेत…..!!!!!
.
एक अजून दुखरी जखम आहे, तीही या निमित्ताने सांगितलीच पाहिजे तीही आमच्या स्वभावधर्माला धरूनच आहे. येसूदास यांना मंदिरात प्रवेश करून भजन गायला एकदा प्रतिबंध करण्यात आला होता.
याचे कारण पुनश्च जात…..
त्यांचे जन्माने दलित ख्रिश्चन असणे…..!!!
” किती तेजःपुंज मेंदू बरबाद केलेस तु,
या जातीव्यवस्थेखातर……!!!”
असं केरळचाच महाकवी कुमारन आसन यांनी लिहिले आहे, तेच येसूदास यांनाही सहन करावे लागले आहे…..!!!!
पण येसूदास यांचा आवाज शतकानुशतके असाच सोलफुल राहिल असा विश्वास…….!!!
.
के. जे. येसूदासजी यांना वाढदिवसाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा………!!!!!!
गेट आऊट रवी ; राज्यपालांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया
‘द काश्मीर फाइल्स’ ऑस्कर साठी शॉर्टलिस्ट नाही?
काश्मीर फाइल्स : नागराज मंजुळे यांचं स्पष्ट मत
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 11,2023 19:35 PM
WebTitle – k. j. Yesudas – Wikipedia