ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला जयभीम सिनेमा सुपरहिट ठरला,सोशल मिडियात त्याने अनेक दिवस चर्चा घडवून आणली.मात्र आता काही लोकाना त्यामध्ये वेगळे काही सापडायला लागले आहे. अभिनेता सूर्यासह ‘जय भीम’ चित्रपटाचे निर्माते आणि ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राईम व्हिडीओ कंपनीला ५ कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस पाठवण्यात आली.आणि आता सूर्याला धमकी देण्याचे सत्र सुरू झाले आहे.
जय भीम हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुर्याला अनेक धमक्या मिळाल्या आहेत.चेन्नई मधिल टी नगर येथील अभिनेता सुर्याच्या घराला त्याच्या जय भीम चित्रपटा भोवती सुरू असलेल्या वादामुळे सशस्त्र पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.इंटेल रिपोर्टनंतर अभिनेत्याला पोलिस संरक्षण देण्यात आले.
‘वेन्नीयार संगम’ संघटने घेतला आहे आक्षेप
‘वेन्नीयार संगम’ संघटनेचे राज्याध्यक्षांनी जय भीम सिनेमा संबंधित लोकांना ही नोटीस बजावत चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत ती काढून टाकण्याची मागणी केली आहे. तसं न केल्यास ५ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा केलाय. या संघटनेने चित्रपट निर्मात्यांवर त्यांच्या समाजाची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नेमका आक्षेप काय?
‘वेन्नीयार संगम’ संघटनेचे असे म्हणने आहे की
जय भीम चित्रपटात दाखवलेल्या काही दृष्यांमुळे वेन्नीयार समुदायाची बदनामी होत आहे.
समाजाची बदनामी करणारी ही दृष्यं चित्रपटात मुद्दाम टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय.
त्यामुळे वेन्नीयार समाजाच्या संबंधीत सदर दृष्य चित्रपटातून काढून टाकण्यात यावीत,
अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आलीय.
चित्रपटातील एका दृश्यात असणारे ‘अग्नी कुंदम’ हे प्रतिक वेन्नीयार समुहाची ओळख आहे.
त्यामुळे भावना दुखावल्याचा दावा करण्यात आला आहे.
जो अभिनेता सूर्यावर हल्ला करेल त्याला 1 लाख रुपयांचा इनाम
पट्टाली मक्कल कच्ची (पीएमके) मायलादुथुराई जिल्हा सचिव पन्नीरसेल्वम यांनी जयभीम सिनेमचा अभिनेता सूर्याला धमकी दिली आहे.
त्यांनी जाहीर केलय की,जो कोणी जिल्ह्य़ात जाऊन अभिनेत्यावर हल्ला करेल त्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
पन्नीरसेल्वम यांनी याअगोदर पोलिसांकडे सुर्याविरुद्ध कारवाईची मागणी केली होती.
14 नोव्हेंबर रोजी, त्यांच्या नेतृत्वाखालील PMK कार्यकर्त्यांचा एक गट मायिलादुथुराई जिल्ह्यातील थिएटरमध्ये घुसला
आणि व्यवस्थापकाला सुरिया चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यास भाग पाडले.
या गटाचे नेतृत्व सुद्धा पन्नीरसेल्वम यांनीच केल्याचा आरोप आहे.
अभिनेता सूर्याला सोशल मिडियातून लोकांचा वाढता पाठिंबा
सोशल मीडियावर सुरिया आणि जय भीम निर्मात्यांना पाठिंबा मिळत आहे.दिग्दर्शक वेत्रीमारन यांच्यासह दिग्दर्शक भारतीराजा आणि तमिळ फिल्म अॅक्टिव्ह प्रोड्यूसर असोसिएशनसह सध्याचा लोकप्रिय अन आघाडीचा दिग्दर्शक पा रंजीत यांनी ही अभिनेता सूर्याच्या समर्थनात भूमिका घेतली आहे.
अभिनेता सिद्धार्थने ट्विट केले आहे.”आम्ही कमल हसनच्या पाठीशी उभे राहिलो. आम्ही विजयच्या पाठीशी उभे राहिलो. आम्ही सुर्याच्या पाठीशी उभे आहोत. “आम्ही” अशा कोणाचेही प्रतिनिधित्व करतो जो एखाद्या कलाकाराला किंवा वैयक्तिक वैमनस्यातून किंवा कलात्मक निर्मितीच्या प्रदर्शनाला धमकावणे भ्याडपणाचे मानतो.” जय भीम च्या निर्मात्यांच्या पाठीशी मी उभा आहे.”
दरम्यान,साउथ इंडियन फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने मंगळवारी माजी केंद्रीय मंत्री आणि पीएमके नेते अंबुमणी रामदास यांना पत्र लिहून पक्षाला अभिनेता सूर्या यांच्यावर टीका करू नये, असे आवाहन करताना म्हटलं आहे की “अभिनेता सूर्याचा कोणताही राजकीय, जातीय किंवा धार्मिक गोष्टीशी संबंध नाही, तो एक सामाजिक जबाबदार पार पाडत आहे.शिक्षणातील समानतेसाठी झटत आहे.”
तुम्हाला या वादावर काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
“जय भीम” फिल्म पाहिल्यानंतर अभिनेत्याने “पार्वती” साठी घर देण्याचे ठरवले
जय भीम चित्रपट:पोलिसांनी बॅग भरून लाच देण्याचा प्रयत्न केला न्या.चंद्रू
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 17, 2021 22:24 PM
WebTitle – Jai bhim movie controversy Actor Surya threatened to kill Police deployed