प्रिय वाचक मित्रहो,
जागल्या भारत हे चळवळीला वाहिलेलं माध्यम आहे.
गेली पाच वर्षे म्हणजे 2015 पासून आपण जागल्याच्यासोबत खंबीरपणे उभे राहिला आहात.
प्रत्यक्ष ग्राऊंडवर उतरून याविरुद्ध निषेध नोंदवत आंदोलन करणारा हाच एकमेव जागल्या भारत आहे.
आपण वाचक हेच आमचं अस्तित्व आणि ताकद आहे.फक्त सोशल मिडियातील व्हर्च्युअल म्हणजे आभासी जग नाही तर प्रत्यक्ष ग्राऊंडवर सुद्धा जागल्या वाचकांच्या सोबतीने.जनसामान्यांच्या सोबतीने संघर्ष करत आला आहे.दिल्लीतील जंतरमंतर येथे संविधानाची प्रतीकृती जाळण्याचा देशद्रोही प्रकार घडवून आणला गेला तेव्हा महाराष्ट्रातून सर्वप्रथम आवाज उठवणारा आणि प्रत्यक्ष ग्राऊंडवर उतरून याविरुद्ध निषेध नोंदवत आंदोलन करणारा हाच एकमेव जागल्या आहे.
या पाच वर्षात आपण समाजातील सर्व जातीय सर्व धर्मीय लोकांच्या आयुष्यातील मूलभूत प्रश्नांना आपल्या ताकदीने वाचा फोडण्याचे काम केले आहे.करत आहोत.आणि पुढेही करत राहूच.आम्ही Fearless आहोत.आम्ही BOLD आहोत.
आवाज नसलेल्या गरीब दु:खी कष्टी नाडलेल्या भरडलेल्या वंचित लोकांसाठी
सामान्य नागरिक,डॉक्टर,पोलिस, विद्यार्थी,विद्यापीठातील शिक्षक,सफाई कामगार,शेतकरी,मुस्लिम,दलित,आदिवासी,मराठा आरक्षण,मध्यमवर्ग,समाजातील असा कोणताही एक वर्ग सुटलेला नाही की ज्याच्यासाठी जागल्याने आवाज बुलंद केला आहे.आपण सर्वांसाठी संघर्ष केला आहे.आणि यापुढेही करतच राहू.या वैशिष्ट्यामुळेच जागल्या आज सर्वात जास्त वाचलं जाणारं,लाईक आणि शेअर केलं जाणारं माध्यम बनलं आहे.
ज्यावेळी प्रमुख मेनस्ट्रीम प्रसारमाध्यमांनी बोलणे बंद केले आहे.लोकांचे प्रश्न हाताळणे बंद केले.त्यावेळी लोकांच्या प्रश्नावर जागल्याने वाचा फोडायला सुरुवात केली आहे.आणि म्हणून आम्ही आमचा फोकस फक्त सामान्य नागरिक हाच ठेवला आहे.होय,आम्ही यात बायस्ड आहोत असा आरोप कुणीही करावा त्याचं आम्ही स्वागत करतो आणि हा आरोपही आम्ही आनंदाने अभिमानाने मान्य करतो कारण आमची निर्मितीच या आवाज नसलेल्या गरीब दु:खी कष्टी नाडलेल्या भरडलेल्या वंचित लोकांसाठी झाली आहे.
आणि म्हणूनच कितीही फायद्याचे असले. रिच मिळवून देणारे असले तरीही पेजथ्री धोरण आम्ही आमच्या धोरणातून वगळले आहे.चटपटीत उथळ भडक बटबटित बातम्या आणि लेख छायाचित्रे यांना आम्ही नकार देतो.ते सगळं करायला मोठमोठे मिडिया हाऊस आहेत.बलाढ्य इलेक्ट्रॉनिक्स न्यूज चॅनेल्स आहेत.आणि ते इमानईतबारे त्यांना दिलेलं काम करत आहेत.मग त्यात आपली भर कशाला? आम्ही समाजातील गरीबवंचित आणि सामान्य मध्यमवर्गाच्या प्रश्नावर गंभीर आहोत.अन या सगळ्यांचे प्रामाणिकपणे तटस्थपणे डॉक्युमेंटेशन करणे ही आमची जबाबदारी आहे.
यापुढे आपण जागल्या भारत www.jaaglyabharat.com या नावाने वावरणार आहोत.
तर सन्माननीय वाचकहो,आपण यापूर्वी jaaglyabharat.com जागल्या या नावाने वावरत होतो.जागल्या हीच आपली सोशल मिडियातील ओळख आहे.तुम्ही आम्ही समाजातील जागले आहोत.परंतु,एक मुद्दा असा की आपण संविधानवादी असल्याने काही कायदेशीरबाबींची पूर्तता आपणही करणे गरजेचे ठरते.
त्यामुळे नोंदणी करताना आमच्या असे निदर्शनास आले की जागल्या या नावाने वसई-मुंबई येथील स्थानिक वृत्तपत्र नोंदणीकृत आहे.त्यामुळे हे ब्रॅंड नेम वापरताना कायदेशीर अडचणी येवू नयेत. म्हणून आपण jaaglyabharat जागल्या भारत या नव्या नावाने नोंदणी केलेली आहे.म्हणूनच आम्ही मध्ये नाव बदलायचे का असा प्रश्न तुम्हाला विचारला होता.त्यावेळी तुम्ही सर्वांनी हेच नाव कायम ठेवावं असं सुचवलं,त्यानंतर आम्ही मूळ मालकांशी संपर्क केला त्यावेळी त्यांनी सुद्धा सहकार्य करत आम्हाला मुभा दिली.आणि आपण जागल्याभारत झालो.खरतर अशा गोष्टी वाचकांना,लोकाना,सांगायच्या नसतात तसं करण्याचं काही कारण नाही. परंतु टीम जागल्याभारत वाचकांना एक परिवार मानते.त्यामुळे आपलं सगळं पारदर्शक असणे हे आमचे धोरण आहे.
आणि म्हणून यापुढे आपण जागल्याभारत www.jaaglyabharat.com या नावाने वावरणार आहोत. आपणही याची नोंद ठेवावी आणि खासकरून टाईप करताना स्पेलिंगवर लक्ष द्यावं,(डबल AA) गुगल सर्च करताना jaaglyabharat (jaaglyabharat) (जागल्याभारत) पोस्ट टाईप करावे. शेअर करताना संदर्भ देताना टॅग/ हॅशटॅग देताना jaaglya असं डबल A एड करून लिहा.
जागल्याभारत चे सदस्य बना.या चळवळीचा भाग बना.
आपलं Jaaglyabharat जागल्याभारत नाव जेवढ्या वेळा तुम्ही गुगल मध्ये सर्च कराल,गुगल आपली साईट तेवढ्या वेळेस रॅंक करत जाईल आणि आपली साईट वर राहील. ती सतत सर्वोच्च ठेवणे हे सर्वस्वी तुम्हा वाचकांच्या हातात आहे. आणि आपण ते करालच याची आम्हास खात्री आहे.
वाचाल तर वाचाल असे म्हणले जाते त्याचप्रमाणे आज जर तुम्ही लिहिलं नाहीत तर येणाऱ्या पिढ्यांना तुमचे आजचे वर्तमान हा त्यांच्यासाठीचा इतिहास समजणार कसा? वाचण्यासाठी अगोदर लिहिलं गेलं पाहिजे.
हजारो वर्षापूर्वी लिपीचा शोध लागलेला नव्हता तेव्हा चिन्हे वापरली जात होती.गुहेतील चीत्रशिल्पे त्यानंतर लेण्यांमधिल कोरीव काम शिलालेख इत्यादी इतिहास घडवला/निर्माण केला जाऊ लागला.हे जाणीवपूर्वक घडवलं गेलं जतन केलं गेलं म्हणून आपल्याला त्याकाळातील संदर्भ लागले.समजून घेता आले.जर समजा ते घडवले गेले नसते तर?
इतिहास समजणे अवघड होऊन बसलं असतं.
आजच्या स्पर्धात्मक धकाधकीच्या जीवनात आपलं आयुष्यही अतिशय वेगवान झालेलं आहे.
अन अलीकडे एक गोष्ट तुम्हीही विचार करून पहा छ्पाईच्या म्हणजे प्रिंटच्या अर्थात पुस्तकांच्या क्षेत्रात काय स्थिती आहे? आज किती पुस्तके छापली अन वाचली जातायत? आपण आवर्जून पुस्तके विकत घेतो का?
बरं घेतली तर वाचतो का? अन आपण स्वत: लिहितो का? या सर्वांची उत्तरे अर्थातच नकारात्मकच येतील.
कारण या आधुनिक युगात इंटरनेटच्या क्रांतीमुळे विविध प्रकारचे सोशल मिडिया आपल्या बोटाच्या क्लिकवर उपलब्ध झालेले आहेत.माहितीचा खजिना उघडा झालेला आहे.सोशल मीडियात सेकंदाला आदळणारी माहिती भरमसाठ वाचली जाते.परंतु या माहितीचा स्रोत आणि विश्वासार्हता हा एक कळीचा मुद्दा बनलेला आहे.
यासाठी आपण स्वत: पुढाकार घेऊन काही गोष्टी जाणीवपूर्वक करणे आवश्यक आहे.
याचाच एक भाग म्हणजे आपण लिहिते झालं पाहिजे.अन ती संधी आम्ही तुम्हाला देतो आहोत.
जागल्याभारत चे सदस्य बना.या चळवळीचा भाग बना.
आम्ही चळवळीचे डॉक्युमेंटेशन करत आहोत.यात तुमचेही योगदान अपेक्षित आहे.
जागल्या हे चळवळीसाठीचे एक माध्यम आहे.जागल्याच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम आम्ही सुरु केलेला आहे.
समाजातील लेखकांना लिहिण्याची संधी.दरवेळेस तुम्हाला काहीतरी वेगळं आउटऑफ द बॉक्स देण्याचा आमचा प्रयत्न असतो.आता तुमची वेळ आहे.
www.jaaglyabharat.com या संकेत स्थळावर आपण नोंदणी करून आपल्याला उपलब्ध झालेल्या संधीचे सोने कराल याची आम्हाला खात्री आहे.जागल्याभारत.कॉमच्या माध्यमातून आम्ही चळवळीचे डॉक्युमेंटेशन करत आहोत.यात तुमचेही योगदान अपेक्षित आहे. तुम्ही तुमचं साहित्य आम्हाला jaaglyaweb@gmail.com या ईमेल एड्रेसवर पाठवा. म्हणजे आपण ते साईटवर प्रकाशित करू.
सोशल मिडियाच्या क्रांतीने चळवळीला एक नवा आयाम प्राप्त होत आहे.चळवळीचे केंद्रीकरण होण्यास मदत होत आहे.
देश आणि विदेशातील व्यक्ती संघटना एकमेकांशी संपर्क साधत आहेत.माहितीची देवाण-घेवाण करत आहेत.
मात्र यास विधायक स्वरूप येताना दिसत नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.
सोशल मिडीयाचा उपयोग चळवळीसाठी अत्यंत जबाबदारीने अन परिणामकारकरित्या केला गेला पाहिजे.
इजिप्त मध्ये सोशल मीडियामुळे क्रांती झाली.अरब स्प्रिंगमध्ये फळ विक्रेत्याला पोलीस छळत होते,
त्याने पेटवून घेतले.क्रांती झाली.दोन्हीकडे सरकारे उलथली.२१ व्या शतकात जगाच्या तुलनेत आपण कुठे आहोत?
येणाऱ्या पिढीसाठी साहित्य निर्मिती करून ठेवत आहोत
आपण तिसऱ्या जगात राहतोय.हे आपण स्विकारले पाहिजे.अन या सर्वात महत्वाची गोष्ट आहे या सर्वांचे कुठेतरी डॉक्युमेंटेशन होणे गरजेचे आहे.हाच मुद्दा लक्षात घेऊन आम्ही जागल्या भारत या सोशल फोरमची निर्मिती केली आहे.आपण आपल्या बुद्धीची चुणूक दाखवून आपल्या विद्वत्तापूर्ण मांडणीची मोहोर उठवून यात कृतीशील योगदान द्याल.याची आम्हाला खात्री आहे.यागोष्टी आपण येणाऱ्या पिढीसाठी जतन करून ठेवत आहोत त्यामुळे या गोष्टी आपण पुरेसे गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
समाजाला भान यावे आणि त्यांचे मुलभूत प्रश्न काय आहेत.
त्यांना भेडसावणारे मुद्दे काय आहेत यावर वैचारिक घुसळण होणे आवश्यक आहे.
शिवाय समाजाची वैचारिक भूक देखिल भागवायची आहे.हे ध्यानात घेऊन आम्ही इथे विविध साहित्य प्रकार निर्माण केले आहेत.
या विषयातील अभ्यासक तज्ज्ञ त्या त्या विषयावर भाष्य करतील.
जे तुमच्या ज्ञानात नक्कीच भर घालतील शिवाय यातून तरुणांना एक दिशा मिळेल.अशी आम्ही आशा बाळगतो.
एकूणच हे विचारांचे आदानप्रदान करणारे माध्यम
पुन्हा नव्याने नव्या रूपात तुमच्याकडे सुपूर्द करताना आम्हाला अतिशय आनंद होत असून
आपण यावर चिंतन मनन करून आपले तनमनधनाने सक्रिय योगदान द्यावे अशी आम्ही आपणांस विनंती करतो.
याप्रवासात अर्थातच तुमचं पाठबळ असणं गरजेचं आहे.आपण ते द्यालच याची आम्हांस खात्री आहे.आभार ! धन्यवाद !
– संपादक आणि टीम जागल्याभारत
आम्ही भारताचे लोक ; भारतीय राज्यघटनेची सुरुवात
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)