मुंबई : औरंगाबाद शहराचं नामांतर करून संभाजी नगर करणं हा शिवसेनेचा जुना मुद्दा राहिला आहे.अलीकडच्या काळात महाराष्ट्रात विचित्र पद्धतीने सत्तांतर होऊन शिवसेनेचे आमदार फुटले.आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे गट अस्तित्वात आला,या गटाने भाजपसोबत युती करत महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं.यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी बाहेर फेकली गेली अन शिवसेना जी या आघाडीचा घटकपक्ष होती तीही बाहेर फेकली गेली,त्यानंतर पुन्हा सत्तानाट्य अन कुरघोडीचे राजकारण सुरू झाले,अन सत्ता स्थापन करताच मंत्रिमंडळ विस्तार,खातेवाटप न होता सर्वात पहिला निर्णय घेत औरंगाबाद चं नामांतर संभाजी नगर असं करण्यात आलं,हा आक्षेप घेत औरंगाबाद शहरातील सुजाण नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली. वास्तविक,औरंगाबाद शहराचं नामांतर संभाजीनगर असं करण्याचा निर्णय या अगोदर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात २९ जून २०२२ रोजी घाईने घेण्यात आला होता.
नामांतराचा निर्णय हा कायद्यातील कोणत्या तरतुदींच्या आधारे घेण्यात आला?
‘औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर अन उस्मानाबाद शहराचं नाव बदलून धाराशिव असं करण्याचा निर्णय
आताच्या भाजप शिंदे गट सरकारने घेण्यापूर्वी नामांतराच्या मुद्यावर नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागविल्या होत्या का?
नामांतराचा निर्णय हा कायद्यातील कोणत्या तरतुदींच्या आधारे घेण्यात आला,’ अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं
मंगळवारी राज्य सरकारला केली आहे.तसेच ‘राज्य सरकारचे याबाबतचे प्रस्ताव मिळाले का आणि यासंदर्भात सद्यस्थिती काय आहे,
अशी विचारणा प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठानं राज्य
आणि केंद्र सरकारला करून दोन्ही सरकारांकडून १५ फेब्रुवारीला उत्तर मागितलं आहे.
मुस्लिम समुदायाला लक्ष्य करणे, या हेतूनेच औरंगाबाद शहराचे नामांतर
‘हिंदुत्वाचा अजेंडा चालवत मुस्लिम समुदायाला लक्ष्य करणे, या हेतूनेच औरंगाबाद शहराचे नामांतर करून संभाजीनगर नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने १६ जुलै रोजी घेतला,’ असा आरोप करून औरंगाबादचे रहिवासी महंमद मुश्ताक अहमद, अण्णासाहेब खंदारे व राजेश मोरे यांनी जनहित याचिकेत केलेला आहे. दुसरीकडे ‘उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय हा निव्वळ राजकीय कुहेतूने, धार्मिक भावनेनं आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून घेतला गेला आहे,’ असं म्हणत उस्मानाबादमधील १७ रहिवाशांनीही जनहित याचिका दाखल केलीय.या दोन्ही याचिकांच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने उत्तर मागितले आहे.
कायदेशीर प्रक्रियाच केली गेली नाही
‘राज्यात एकनाथ शिंदे गट अन भाजप यांची युती असणारं सरकार सत्तेत आल्यानंतर १२ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ नसतानाही केवळ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी शपथविधी होताच या दोन शहरांची नावं बदलण्याचा निर्णय घेतला. शहरांची नावे बदलायची झाल्यास त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आहे आणि केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्वेही आहेत. मात्र, इतका मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्यासंबंधी सूचना-हरकती मागवल्या गेल्या नाहीत,तसेच यासंबंधीची आवश्यक ती कायदेशीर प्रक्रियाच केली गेली नाही.असे असताना, सरकारी विभागांच्या कागदोपत्री व्यवहारांत नव्या नावांचा वापर सुरू करण्यात आला आहे. हे कायद्याचं उघड उल्लंघन आहे,’ असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्यावतीने अॅड. प्रज्ञा तळेकर यांनी न्यायालयासमोर केला. ‘या निर्णयांसाठी विद्यमान सरकारने अवलंबलेली प्रक्रिया ही पूर्णपणे कायद्याचं उल्लंघन करणारी आहे’, असा युक्तिवाद इतर याचिकाकर्त्यांच्यावतीने अॅड. युसूफ मुछाला यांनी केला. दोन्हीकडील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खंडपीठानं राज्य आणि केंद्र सरकारला करून दोन्ही सरकारांकडून १५ फेब्रुवारीला उत्तर मागितलं आहे.
औरंगाबाद चे जुने नाव काय?
अ औरंगाबाद चे जुने नाव खडकी होते.औरंगाबाद शहराला ५२ दरवाजांचं शहर म्हणूनही ओळखले जातं.
आजही जुन्या औरंगाबाद शहरामध्ये अशाप्रकारची अनेक महाद्वारे अर्थात दरवाजे पाहायला मिळतात.
काही इतिहासकार असं मानतात की निजामशहा चा मंत्री मलिक अंबर ने औरंगाबाद शहर वसवले.
तर काहींचे म्हणने असे आहे की मलिक अंबर ने खडकीचे नाव बदलून फतेहपूर असं केलं पुढे ते औरंगाबाद म्हणून रूढ झालं.
औरंगाबाद शहराची लोकसंख्या
अ औरंगाबाद जिल्ह्याची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार एकूण ३७,०१,२८२ अशी असल्याचे कळते.
औरंगाबाद शहरात मुख्यत्वे मराठी, हिंदी, उर्दू अन इंग्रजी भाषा बोलली जाते.
आसाराम बापू ला अखेर शिक्षा ;चायवाला ते बाबा जाणून घ्या संपूर्ण प्रवास
गांधी यांचा खून पाकिस्तानला ५५ कोटी दिले म्हणून झाला होता का?
अमेरिकेतील सिएटल सिटी येथे जातिभेदावर बंदी करणारा कायदा
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 01,2023 10:32 AM
WebTitle – Is it illegal to change the name of Aurangabad to Sambhaji Nagar?