सोशल मीडियावर सतत काही ना काही गोष्टींवर चर्चा चालू असते. सध्या अंजीर मांसाहारी फळ आहे का शाकाहारी याबाबत वाद सुरू आहे. काही लोकांचा दावा आहे की हे फळ शाकाहारी लोकांसाठी योग्य नाही, कारण त्याची वाढ एका कीटकाद्वारे होते, जो नंतर त्याच फळात मरतो.
अंजीर हा पश्चिम आशिया आणि भारतात लोकप्रिय आहे, आणि तो एक सुकामेवा म्हणून खाल्ला जातो. सामान्यतः याला फळ मानले जाते, पण प्रत्यक्षात ते उलटे फूल असते, ज्यात पाकळ्या आतमध्ये दडलेल्या असतात. सध्या चालू असलेल्या या चर्चेचे मुख्य कारण गांधील माशी प्रमाणे एक कीटक आहे. हा कीटक अंजीर फळाच्या आत प्रवेश करतो आणि एक एंझाइम तयार करतो. यामुळे काही लोकांनी याला मांसाहारी फळ म्हणून लेबल दिले आहे.
चर्चा कशी सुरू झाली?
अंजीर मांसाहारी आहे की शाकाहारी, या चर्चेची सुरुवात भारतीय अभिनेत्री शेनाज ट्रेजरीवालाच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमुळे झाली. तिने अंजीरला मांसाहारी म्हणत, यामागील कारण स्पष्ट केले की अंजीराचे परागण होत असताना त्यात नर अन मादी कीटक प्रवेश करते. या प्रक्रियेत नर कीटकाचे पंख गळून पडतात आणि तो फळातच अडकतो. त्यातच अंडी घालतो आणि मरतो. त्यानंतर त्यात जन्मलेल्या नवीन नर आणि मादी संभोग करतात, त्यात नर मरण पावतो आणि मादी बाहेर पडते.
शेनाज म्हणाली की, जर तुम्ही एक अंजीर खाता, तर असे समजा की त्याच्या निर्मितीत एका कीटकाचा मृत्यू झाला आहे. हे एक असे तथ्य आहे ज्यामुळे शाकाहारी किंवा व्हेगन लोकांना त्रास होऊ शकतो.
फळाचे एंजाइम कीटकाला पोषक तत्वांमध्ये बदलतात
या मुद्द्यावर काही लोकांचे मत असे आहे की कीटक अंजीरात परजीवी म्हणून राहत नाही. त्याऐवजी फळाचे एंजाइम त्याच्या शरीराला पोषक तत्वांमध्ये रूपांतरित करतात.
कीटकांशिवायही अंजीर उगवतो
याव्यतिरिक्त, सर्व अंजीर नैसर्गिक परागण प्रक्रियेवर अवलंबून नसतात. अनेक शेतकऱ्यांनी अंजीराच्या झाडांना थेट हार्मोन लावून अंजीराचे परागण घडवून आणले आहे.
हा दृष्टिकोन अधिक शाकाहारी-अनुकूल मानला जातो. तथापि, जैन आणि ब्राह्मण समुदायातील अनेक लोक अजूनही अंजीर टाळतात,
कारण सर्व अंजीर कीटकांमुळे परागित होत नाहीत हे समजावणे त्यांच्यासाठी कठीण असते.
हे फक्त कीटक परागणात गुंतलेले असने हा केवळ वनस्पतीच्या जीवनचक्राचा एक भाग आहे, ज्यामुळे ते पुनरुत्पादन आणि भरभराटीस सक्षम होते.
ही प्रक्रिया समजल्यानंतर अंजीर शाकाहारी की मांसाहारी हा तुमचा निर्णय आहे.
मात्र ही समस्या बाजूला ठेवली तर अंजीर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 11,2024 | 10:30 PM
WebTitle – Is Anjeer (Dry Fig) a Non-Veg Fruit?
#Anjeer #FigFruit #VegetarianDebate #NonVegFruit #AnjeerPollination #ViralDebate #Vegetarian #Vegan #FoodFacts #HealthyEating #FoodControversy