उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेशातील (Kushinagar International Airport) कुशीनगर इंटरनॅशनल एअरपोर्ट चे उद्घाटन करण्यात आले आहे. कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे राज्यातील तिसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.कुशीनगर येथून पहिले उड्डाण 26 नोव्हेंबर 2021 रोजी उड्डाण करेल. स्पाइसजेट कुशीनगर विमानतळाला उड्डाण गंतव्यस्थान म्हणून जोडत आहे. कंपनी उड्डाणांद्वारे कुशीनगरला दिल्ली, मुंबई आणि कोलकाताशी जोडेल. दिल्लीसाठी पहिले उड्डाण 26 नोव्हेंबर रोजी चालणार आहे, तर मुंबई आणि कोलकातासाठी उड्डाणे 18 डिसेंबर 2021 पासून सुरू होतील.
सुमारे 260 कोटी रुपये खर्च करून बांधलेले नवीन टर्मिनल 3600 चौरस मीटरमध्ये पसरलेले आहे.
या कुशीनगर इंटरनॅशनल एअरपोर्ट वर एकाच वेळी 300 प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे.
स्पाईसजेट एअरलाइनने जारी केलेल्या निवेदनानुसार, दिल्ली-कुशीनगर-दिल्ली सेक्टरचे विमान भाडे 3662 रुपयांपासून सुरू होईल. या मार्गावरील स्पाईसजेटची उड्डाणे सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारी आठवड्यातील 4 दिवस चालतील. कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, फ्लाइट बुकिंग सुरू झाले आहे.
प्रवासी www.spicejet.com, स्पाइसजेटचे मोबाइल अॅप, ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल्स आणि ट्रॅव्हल एजंट्स वापरून तिकिटे बुक करू शकतात. स्पाइसजेटने दिल्ली-कुशीनगर-दिल्ली मार्गावर Boeing 737 आणि Q400 ही विमाने तैनात करण्यात आल्याचे सांगितले आहे.
ऐतिहासिक महत्व – भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण कुशीनारा – (कुशीनगर)
तथागत भगवान बुद्ध यांचे कुशीनगर (कुशीनारा) येथे शाल वृक्षांच्या उपवनात रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी महापरिनिर्वाण झाले.
त्यामुळे कुशीनगर बौद्ध स्थळाला जागतिक महत्व आहे.जगभरातील बौद्ध धम्मीय नागरिक येथे मोठ्याप्रमाणावर भेट देत असतात.
ब्रिटिशांच्या राजवटीतच धावपट्टीचे काम ,मात्र आता पूर्णत्वास
या विमानतळाचे काम ब्रिटिश राजवटीतच सुरू झाले होते.1946 मध्ये येथे हवाई पट्टी विकसित केली गेली होती.
मात्र यानंतर अनेक सरकारे आली आणि गेली पण कोणीही हे काम पूर्णत्वास नेऊ शकले नाही.
कुशीनगर लुम्बिनी, गया, सारनाथ आणि कुशीनगरच्या बौद्ध सर्किटमध्ये केंद्र बिंदूवर आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्मितीमुळे, संपूर्ण बुद्धिस्ट सर्किटच्या यात्रेला आता कमी वेळ लागेल.
बौद्ध सर्किटमध्ये लुंबिनी, बोधगया, सारनाथ, कुशीनगर, श्रावस्ती, राजगीर, संकिशा आणि वैशाली यांचा समावेश आहे.श्रीलंका, जपान, तैवान, दक्षिण कोरिया, चीन, थायलंड, व्हिएतनाम आणि सिंगापूर येथून बुद्धिस्टसर्किटला भेट देण्यासाठी यात्रेकरू मोठ्या संख्येने येतात. कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे आता या क्षेत्रातील हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री उद्योगाला बळ मिळेल.
काही देशातील महत्वाच्या पदांवरील व्यक्तींच्या प्रतिक्रिया
भगवान बुद्धांचा मृत्यू कोणता पदार्थ सेवन केल्याने झाला? जाणून घ्या..
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 20, 2021 16 :42 PM
WebTitle – Inauguration of Buddha Bhoomi Kushinagar International Airport