नवी दिल्ली : मेडिकल जर्नल दि लँसेट मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या संपादकिय लेखातून भारताचे पंतप्रधान असणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्यावर जळजळीत टीका करत गंभीर ताशेरे ओढत मोदींच्या वागणूकीचा संबंध हुकूमशाहीशी जोडण्यात आला आहे.
मोदी सरकारकडून कोरोना हटवण्यास नव्हे,तर ट्विटरवर त्यांच्याविरोधात आलेल्या टीका आणि आक्षेपार्ह कमेंट्स हटवण्याला प्रधान्य असल्याचं म्हणत ताशेरे ओढण्यात आले आहेत.रुग्णालये रुग्णानी भरून गेली आहेत आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची दमछाक झाली आहे.शिवाय सेवा देतानाच ते संक्रमित होत आहेत. ऑक्सिजन, इस्पितळातील बेड्स आणि इतर आवश्यक वस्तू शोधणार्या चिंताग्रस्त निराश लोकांचे (डॉक्टर आणि नागरिक) मेसेजेस सोशल मीडियामध्ये दुथडी भरून वाहात आहेत.मात्र अशा लोकांचे ट्विट डिलिट करण्याचे हुकुमशाही धोरण राबवून दमन करत कोरोनावर नियंत्रण मिळवल्याचे दाखवले जात आहे.
संकटाच्याकाळात प्रधानमंत्रीकडून टीकेला आणि खुल्याचर्चेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न
संकटाच्याकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे टीकेला आणि खुल्या चर्चेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असून ही अक्षम्य बाब असल्याचा गंभीर मुद्दा या लेखातून मांडण्यात आला आहे. इंस्टीट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इवॅल्यूएशनकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजाचा उल्लेखही या संपादकिय लेखात केला आहे. जिथं स्पष्ट सांगण्यात आलं होतं, की 1 ऑगस्टपर्यंत भारतात10 लाखांहून अधिक मृत्यू होतील.
दि लँसेट ने म्हटले आहे की भारताने आता द्विदलीय रणनीती अवलंबली पाहिजे.
खराब लिसिकरण मोहिमेस सर्व पातळीवर गती देवून ती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे आवश्यक आहे.लस पुरवठा वाढवला पाहिजे.दुसरे परदेशातून लसी मागवून त्यांचे वितरण अभियान सुरू करणे जे केवळ शहरीच नाही तर ग्रामीण आणि गरीब नागरिकांनाही कव्हर करू शकेल अशा पद्धतीन राबवले गेले पाहिजे.
दुसरे म्हणजे, लस चालू असतानाच भारताने SARS-CoV-2 कोविड चे प्रसारण शक्य तितके कमी करणे आवश्यक आहे.
जसजसे रुग्ण संख्या वाढत चालली आहेत तसतसे सरकारने रुग्ण संख्येची अचूक आकडेवारी डेटा वेळेवर प्रकाशित करणे आवश्यक आहे
आणि नवीन राज्यातील लॉकडाउनच्या संभाव्यतेसह,काय घडत आहे
आणि साथीचा चढता आलेख कमी करण्यासाठी काय आवश्यक आहे हे स्पष्टपणे जनतेला स्पष्ट केले पाहिजे.
दि लँसेट सारख्या मेडिकल जर्नल मधून ओढल्या गेलेल्या या गंभीर ताशेऱ्यांमुळे
आणि नोंदविलेल्या निरीक्षणातून भाजपचे केंद्र सरकार आणि त्यांचे नेतृत्व करणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
यांची अकार्यक्षमता जगासमोर आणली गेली आहे.भारतासाठी हे खेदजनक आहे.
आणीबाणी वर बोलण्याचा भाजपला अधिकार नाही
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचक हो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)
First Published on MAY 09, 2021 15: 05 PM
WebTitle – In times of crisis, Modi is suppressing people’s criticism and voices – The Lancet’s critical remarks 2021-05-09