गुजरात : हिंदू सेनेने बसवलेल्या नथुराम गोडसे च्या पुतळ्याची जामनगर काँग्रेस चे अध्यक्ष दिगुभा जडेजा आणि त्यांच्या साथीदारांनी मंगळवारी तोडफोड करून पुतळा हटवला.हिंदू सेनेने ऑगस्टमध्ये जामनगरमध्ये नथुराम गोडसेचा पुतळा बसवण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, स्थानिक अधिकाऱ्यांनी जागा देण्यास नकार दिल्यानंतर संस्थेने ‘नथुराम गोडसे अमर रहे’ चा नारा देत हनुमान आश्रमात पुतळा उभारला होता.
मंगळवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुतळ्याची तोडफोड केली
जामनगर काँग्रेस चे अध्यक्ष दिगुभा जडेजा यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्यासोबत या पुतळ्याची तोडफोड केली.कॉँग्रेसची विचारधारा ही गांधीजींच्या विचारांची विचार धारा असे यावेळी दिगुभा जडेजा यांनी म्हटलं आहे.”गेल्या दोन महिन्यांपासून हिंदू सेनेचे हे मूठभर लोक महात्मा गांधींचा मारेकरी गोडसेचा प्रचार करणारे बॅनर आणि पोस्टर्स लावत आहेत.सोमवारी त्यांनी थेट पुतळाच बसवला.गांधीनी देशासाठी बलिदान दिले.मात्र काही देशद्रोही त्यांच्या मारेकऱ्यांचा पुतळा बसवतात आणि अशावेळी कायदा सुद्धा कमी पडतो म्हणून आम्हाला अशाप्रकारे कायदा हातात घ्यावा लागत आहे असे असं म्हणत काँग्रेस नेते दिगुभा जडेजा यांनी नथुराम गोडसे चा हा पुतळा फोडून टाकला आहे.
15 नोव्हेंबर ला नथुरामला फाशी देण्यात आली
“महासभेच्या कार्यकर्त्यांनी गेल्या आठवड्यात अंबाला जेलमधून माती आणली, जिथे 15 नोव्हेंबर रोजी नथुराम गोडसे ला फाशी दिली गेली.त्या ठिकाणच्या मातीचा वापर गोडसेचा पुतळा बनवण्यासाठी केला जाईल आणि तो ग्वाल्हेर येथील हिंदू महासभेच्या कार्यालयात बसवला जाइल,” हिंदू महासभा राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ जयवीर भारद्वाज यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला अशी माहिती दिली आहे.
आपल्या या निर्णयाचा बचाव करताना हिंदू सेनेचे गुजरात अध्यक्ष प्रतीक भट्ट म्हणाले की, “आजच्या तरुणांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत करण्यासाठी” गोडसेचा पुतळा सार्वजनिक ठिकाणी ठेवण्यासाठी ते “सेमिनार” आणि सभा घेत आहेत. पण, ते म्हणाले, “काँग्रेस नेत्यांनी पुतळा फोडला. आम्ही त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार आहोत.”
सुर्याने जयभीम ची मुळ प्रेरणा पार्वती अम्मल यांना 10 लाख रुपये
“जय भीम” फिल्म पाहिल्यानंतर अभिनेत्याने “पार्वती” साठी घर देण्याचे ठरवले
हे वाचा जय भीम चित्रपटातील ती केस कायद्याच्यादृष्टीने का महत्वाची जाणून घ्या
जय भीम चित्रपट:पोलिसांनी बॅग भरून लाच देण्याचा प्रयत्न केला न्या.चंद्रू
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 16, 2021 21:00 PM
WebTitle – Surya donated Rs 10 lakh to Parvati Ammal, the original inspiration of Jayabhim