मित्रांनो,2023 हे वर्ष आता अर्ध संपत आलंय अन 87 हजारांहून अधिक भारतीय नागरिकांनी भारतीय नागरिकत्व सोडून इतर देशांमध्ये स्थायिक होणं पसंत केलंय. गेल्या पाच वर्षांची आकडेवारी अत्यंत चिंतेची बाब आहे, या दरम्यान 8 लाखांहून अधिक लोकांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला. हे लोक ‘वैयक्तिक कारणांमुळे’ देशाचे नागरिकत्व सोडत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. भारतीय नागरिक एवढ्या मोठ्या संख्येने भारत का सोडत आहेत आणि नविन कोणता देश निवडत आहेत हे काही प्रश्न यानिमित्ताने समोर आलेत.
सरकारनेच दिलीय आकडेवारी
राज्यसभेत खासदार संदीपकुमार पाठक यांच्या वतीने चार प्रश्न विचारण्यात आले.
प्रथम, गेल्या पाच वर्षांत भारतीय नागरिकत्व सोडून इतर देशांचे नागरिकत्व घेतलेल्या लोकांची संख्या आणि देशांची यादी किती आहे.
दुसरे, यापैकी किती व्यापारी होते. तिसरे म्हणजे, हे लोक देश का सोडत आहेत आणि तसे असल्यास त्याची मुख्य कारणे काय आहेत
याचा सरकारने काही अभ्यास केला आहे का? चौथे, ज्यांनी नागरिकत्व सोडले त्यांच्या व्यवसायांची नोंद.
सरकारच्या वतीने राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी माहिती दिली की, यावर्षी जून 2023 पर्यंत म्हणजेच अवघ्या 6 महिन्यांत
87 हजार 26 लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे. 2018 सालात (1 लाख 34 हजार 561), 2019
सालात (1 लाख 44 हजार 17), 2020 या वर्षी (85 हजार 256), 2021 या सालात (1 लाख 63 हजार 370),
तर 2022 सालात (2 लाख 25 हजार 620) अशी आकडेवारी त्यांनी जाहीर केली.) लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे.
यासोबतच त्यांनी सांगितले की 2011 मध्ये (1 लाख 22 हजार 819), 2012 मध्ये (1 लाख 20 हजार 923), 2013 मध्ये (1 लाख 31 हजार 405), 2014 मध्ये (1 लाख 29 हजार 328), 2015 मध्ये (1 लाख 29 हजार 328). 1 लाख 31 हजार 489, 2016 मध्ये (1 लाख 41 हजार 603) आणि 2017 मध्ये (1 लाख 33 हजार 49) अशा आकडेवारीनुसार भारतीय नागरिकांनी भारताचं नागरिकत्व सोडल्याचं समोर आलंय.
लोक भारताचे नागरिकत्व का सोडत आहेत?
एका मीडिया रिपोर्टनुसार, तज्ञ यासाठी अनेक कारणे सांगतात. करिअर, जीवनाचा दर्जा, शिक्षणाच्या चांगल्या संधी, उत्तम आरोग्यसेवा, स्वच्छ हवा चांगली जीवनशैली अशी अनेक कारणे असू शकतात, असा त्यांचा विश्वास आहे. दुसरं म्हणजे इतर काही देशांच्याप्रमाणे भारतात दुहेरी नागरिकत्व धारण करण्यास परवानगी नाही. अशा परिस्थितीत परदेशी नागरिकत्व घेणाऱ्या भारतीयांना औपचारिकपणे भारताचे नागरिकत्व सोडावे लागेल. तथापि, याशिवाय अनेक कारणे देखील सांगितली जातात.
लोक भारत सोडून कुठे जायला प्राधान्य देत आहेत?
भारत सोडल्यानंतर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) हे लोकांची पहिली पसंती आणि गंतव्यस्थान असल्याचे दिसते.
त्यानंतर या पाच वर्षांत कॅनडा, ऑस्ट्रेलिया, यूके, इटली, न्यूझीलंड, जर्मनी, सिंगापूर, नेदरलँड
आणि स्वीडनमध्ये सर्वाधिक भारतीयांची नोंदणी झाली आहे.यासंबंधीची आकडेवारीही सरकारने राज्यसभेत मांडली आहे.
चीन च नागरिकत्व स्वीकारतायत भारतीय
विशेष म्हणजे भारतातून बाहेर पडल्यानंतर लोक चीनलाही आपले नवीन ठिकाण म्हणून निवडत आहेत. या पाच वर्षांच्या काळात तब्बल 2 हजार 442 लोकांनी चीन चं नागरिकत्व निवडल्याचं समोर आलंय. सध्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर म्हणजेच LAC वर भारत आणि चीनमध्ये तणाव कायम आहे. याशिवाय 2020 पासून भारतातील काही लोक पाकिस्तानकडे वळत असल्याचे आश्चर्यकारक आकडे समोर येतायत. ज्याची चर्चा भारतीय मिडिया करतच नाही.. 2020 मध्ये 7, 2021 मध्ये 41, 2022 मध्ये 13 आणि जून 2023 पर्यंत 8 जणांनी पाकिस्तान चं नागरिकत्व घेतल्याचे समोर आलंय.
श्रीमंतांना देश नसतो का? जाणून घ्या भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची कहाणी
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 14,2023 | 14:10 PM
WebTitle – In 5 years, 8 lakh citizens gave up Indian citizenship, the choice of China-Pakistan too