Hrithik Roshan On Dhurandhar Movie: बॉक्स ऑफिसवर सध्या धुरंधर हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर कमाई करत आहे. भारतापासून पाकिस्तानपर्यंत हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारही या चित्रपटाबद्दल आपले रिव्ह्यू देत आहेत. अभिनेता ऋतिक रोशन यांनीही इंस्टाग्रामवर धुरंधर चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी चित्रपटाचे कौतुक केले असले, तरी त्यात राजकीय प्रचार असल्याचेही सुचवले आहे. यामुळे काही लोकांनी त्यांचे कौतुक केले तर काहींनी त्यांना ट्रोल केले. पाहूया काय आहे संपूर्ण प्रकरण.
अभिनेता ऋतिक रोशन यांनी धुरंधर चित्रपटातील कथा, अभिनय आणि प्रस्तुतीची प्रशंसा केली.
या चित्रपटात रणवीर सिंहने हमजा हे पात्र साकारले आहे.
तो एक भारतीय गुप्तहेर असून रहमान डकैतच्या गटात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो.
कथा गुप्तहेरी, गुन्हेगारी आणि गुप्त शोधमोहिमांवर आधारित आहे.
ऋतिक रोशन यांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले,
“मला सिनेमा आवडतो. मला असे लोक आवडतात जे कथेमध्ये पूर्णपणे बुडून जातात आणि कथा त्यांना जिथे घेऊन जाते तिथे प्रवास करतात.
त्यांच्या भावना जसाच्या तशा पडद्यावर उतरतात. धुरंधर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. मला या चित्रपटाची कथा सांगण्याची शैली फार आवडली.
हेच खरे सिनेमा.””मी या चित्रपटाच्या राजकारणाशी असहमत असू शकतो,
आणि एक नागरिक म्हणून फिल्ममेकर्सनी कोणत्या जबाबदाऱ्या घ्यायला हव्यात यावर चर्चा करू शकतो.
पण सिनेमा शिकणारा म्हणून मला ही फिल्म किती आवडली आणि मी त्यातून किती शिकलो, हे नाकारता येणार नाही. अप्रतिम!”
ऋतिकच्या या पोस्टनंतर काही नेटिझन्सनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. एका यूजरने लिहिले,
“ऋतिक रोशनने धुरंधरमधील प्रोपगंडा पॉलिटिक्सवर थेट प्रश्न उपस्थित केला. कथा सांगण्याची पद्धत त्यांना आवडली,
पण राजकीय बाजूस ते सहमत नाहीत. हा खरा धाडसी कलाकार.”
Hrithik Roshan directly called out the politics in propaganda film Dhurandhar.
— Mohit Chauhan (@mohitlaws) December 10, 2025
He said, “I love the storytelling, but I disagree with the politics involved in #Dhurandhar.
We filmmakers should bear more responsibility as citizens of the world.
An actor with a spine🔥 pic.twitter.com/ifFizppMJT
दुसऱ्या यूजरने लिहिले,
“ऋतिक रोशन नेहमी योग्य गोष्टींच्या बाजूने उभा राहतो. जरी भ्याडपणा सर्वसाधारण गोष्ट असली, तरी तो नेहमी हिम्मत दाखवतो.”
Hrithik Roshan.
— Priyanka Sharma (@iPriyanka_S) December 10, 2025
Always on the right side of things. Always trying to carry courage, even when cowardice is the norm. 👏🏻 pic.twitter.com/XALRLTtZAw
तर काहींनी त्यांना ट्रोलही केले. एका यूजरने कठोर प्रतिक्रिया देत लिहिले,
“एक चुकीची स्त्री तुमची प्रतिमा, विचारसरणी, विचार करण्याची क्षमता आणि थोडक्यात संपूर्ण आयुष्य बिघडवू शकते.
ऋतिक रोशन हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत.”
one wrong woman can destroy your image, your ideology, your thinking power in short your whole life
— Hail Hydra (@Lordofbattles8) December 10, 2025
Hrithik Roshan is the best example of it pic.twitter.com/l7EiQpCZdG
हे ही वाचा.. जय भीम चित्रपट:पोलिसांनी बॅग भरून लाच देण्याचा प्रयत्न केला न्या.चंद्रू
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 11,2025 | 13:10 PM
WebTitle – Hrithik Roshan On Dhurandhar Movie























































