लेबनॉन आणि सिरियातील काही भागांमध्ये मंगळवारी सलग पेजर बॉम्ब स्फोट झाले. सुमारे एका तासाच्या कालावधीत पेजरमध्ये स्फोट होत होते. काहींच्या खिशात पेजर फुटला तर काहींच्या हातातच पेजरमध्ये स्फोट झाला. सगळीकडे गोंधळ आणि आरडाओरड सुरू झाली. लेबनॉनमधील कट्टरपंथी संघटना हिजबुल्लाहने या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरले. आता असा दावा केला जात आहे की इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने पाच महिने आधीच पेजरमध्ये स्फोटक फिट केले होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात तैवानच्या कंपनीच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, इस्रायलने हिजबुल्लाहविरुद्ध मोसादच्या गुप्त ऑपरेशन अंतर्गत या पेजरमध्ये स्फोटक फिट केले होते. हिजबुल्लाहने तैवानच्या गोल्ड अपोलो नावाच्या कंपनीकडून सुमारे 3000 पेजरची ऑर्डर दिली होती. मात्र, हे पेजर लेबनॉनमध्ये पोहोचण्याआधीच त्यांच्यात फेरफार करण्यात आले. या पेजरची तैवानहून लेबनॉनला एप्रिल ते मे दरम्यान शिपमेंट झाली होती. यावरून हे स्पष्ट होते की या हल्ल्याचे कारस्थान काही महिन्यांपूर्वी आखले गेले होते.
अमेरिकी अधिकाऱ्यांच्या मते, हे पेजर तैवानच्या कंपनीच्या AP924 मॉडेलचे होते. तैवानहून लेबनॉनला पाठवलेल्या पेजरच्या खेपेमध्ये प्रत्येक पेजरमध्ये एक ते दोन औंस स्फोटक लावलेले होते. हे स्फोटक पेजरच्या बॅटरीच्या शेजारी लावले होते. अहवालानुसार, लेबनॉनमध्ये दुपारी ३.३० वाजता या पेजरवर एक मेसेज आला. या मेसेजने पेजरमधील स्फोटक सक्रिय केले.
कसा बनला पेजर बॉम्ब ?
दावा केला जात आहे की कसा बनला पेजर बॉम्ब म्हणजे पेजर डिव्हाइसमध्ये स्फोट होण्याआधी काही सेकंदांपर्यंत बीपचा आवाज ऐकू आला. सूत्रांच्या मते, मोसादने प्रत्यक्षात पेजरच्या आत एक छोटा बोर्ड इन्जेक्ट केला होता, ज्यामध्ये स्फोटक होते. हे स्फोटक कोणत्याही डिव्हाइस किंवा स्कॅनरद्वारे शोधणे फारच कठीण होते.
मोसादने पेजरमध्ये बसवले होते PETN स्फोटक
स्काय न्यूज अरबियाच्या अहवालानुसार, इस्रायलच्या गुप्तचर संस्था मोसादने हिजबुल्लाहच्या पेजरमध्ये PETN हे स्फोटक बसवले होते. हे एक प्रकारचे स्फोटक आहे, जे पेजरच्या बॅटरीजवर लावले होते. या पेजरच्या बॅटरीचे तापमान वाढवून स्फोट घडवून आणला गेला. या स्फोटकाचे वजन 20 ग्रॅमपेक्षा कमी होते.
तैवानच्या कंपनीने हात झटकले
या हल्ल्यानंतर तैवानच्या गोल्ड अपोलो पार्टीचे संस्थापक आणि चेअरमन सु चिंग कुआंग यांनी सांगितले की,
आमच्या कंपनीने हे पेजर तयार केलेले नाहीत. हे पेजर युरोपमधील एका कंपनीने तयार केले होते.
या कंपनीला आमच्या ब्रँडचा वापर करण्याचा अधिकार आहे.
मोसादने यापूर्वीही केले होते असे हल्ले
इस्रायलने यापूर्वीही अशा प्रकारचा हल्ला केला होता. अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा गुप्तचर विश्लेषक डेव्हिड केनेडी यांच्या मते,
इस्रायलने 1996 मध्ये हमास नेते याहया अयाश यांच्या हत्येसाठी त्यांच्या फोनमध्ये 15 ग्रॅम RDX स्फोटक बसवले होते.
या डिव्हाइसचा स्फोट तेव्हा झाला, जेव्हा त्यांनी आपल्या वडिलांना फोन केला.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 18,2024 | 14:05 PM
WebTitle – How Did a Pager Turn Into a Bomb? Did Mossad Plant a Chip Bomb? What’s the Taiwanese Company Link? All Questions Answered