मुंबईतल्या किंबहुना भारतातल्या सगळ्या मध्यमवर्गीय आणि त्यावरील वर्गाला लोकांना हर्षद मेहता हे नाव माहित आहे.पण त्याचा खरा इतिहास कोणालाच माहित नाही..फक्त त्याने share market मध्ये घोटाळा केला एवढंच माहित आहे लोकांना.
मुळात finance हे कंटाळवाणं क्षेत्र आहे
share market आणि finance sector मध्ये काम करणाऱ्या लोकांना सुद्धा याबाबतचा बराच इतिहास माहित असेल कि नाही याबद्दल शंकाच आहे.हि series म्हणजे खरच एक मास्टरपीस आहे..ज्यांना finance ह्या विषयात रुची आहे किंवा जे finance ह्या क्षेत्रात आहेत त्यांनी ही series जरूर पहावी पण Finance sector बद्दल जास्त माहिती नसणाऱ्या लोकांनी तर नक्कीच पाहावी..त्यांना ह्या सिरीसमध्ये दाखवलेल्या गोष्टींचा आणि terminologies चा अभ्यास केला तर त्याचा त्यांना फायदाच होईल.
मुळात finance हे कंटाळवाणं क्षेत्र आहे..पण हे असं क्षेत्र आहे जे एखाद्या व्यक्तीचा,संस्थेचा आरसा किंवा ओळख असतं.ह्या क्षेत्रात सोंग चालत नाहीत.बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल असं एकमेव क्षेत्र म्हणजे finance..
मला बऱ्याचदा वाटत लोकांनी कोणत्याही राजकारण्याला फक्त आणि फक्त त्याच्या आर्थिक कामगिरीवर judge करावं त्यामुळे जगातले खूप सारे so called ‘लोकप्रिय’ नेते नागडे पडतील.आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ‘सुशिक्षित’ आणि ‘दूरदर्शी’ नेतृत्व देशाला आणि जगाला मिळू शकेल.
१९९२ ला भारतातला सर्वात मोठा individual advance tax भरणारा माणूस
Finance सारख्या कंटाळवाण्या वाटणाऱ्या विषयावर १० भागांची मालिका बनवणं
हे खरतर अवघड काम आहे पण हि series कुठेही रेंगाळत नाही.
आपल्याला फक्त घोटाळा केला हे माहित आहे पण त्यातील नक्की खाचखळगे काय होते
नक्की त्याने कश्याप्रकारे ह्या गोष्टी केल्या हे पाहताना खरच थक्क व्हायला होतं.
मुळात हर्षद मेहता हा काही reputed business community मधला माणूस नव्हता.
बऱ्याच लोकांना तो गुजराती होता म्हणून धंदा काही त्याला नवीन नव्हता वगैरे कारण देता येतील
(विशेषतः मराठीमाणूस) पण reputed business community हि एक वेगळी terminology आहे
ज्यात तो कुठेही बस नव्हता infact त्याचे असलेले सगळे मोठे clients हे गुजराती नव्हतेच.
१९९२ ला भारतातला सर्वात मोठा individual advance tax भरणारा माणूस होता.
ह्यावरून कल्पना करता येईल कि तो किती मोठा झाला होता ते सुद्धा hardly ५ वर्षात!!!
एवढ्या उंचीवर पोहचून सर्वात जास्त केसेस अंगावर झालेला
आणि पुन्हा जमिनीवर आलेला सुद्धा तो पहिलाच माणूस.
एवढा सगळा मसाला असताना ह्यावर एवढ्या उशिरा कलाकृती येण हे खरतर आश्चर्यजनक आहे.
पण देर आए दुरुस्त आए असं म्हणूया आपण.आणि नशीब हि series चोप्रा,जोहर
किंवा भट्ट कॅम्पने नाही आणली नाहीतर माती करून टाकली असती.
एवढ्या भारी विषयाची.हंसल मेहता सारख्या उत्कृष्ट डायरेक्टरने ह्या विषयात हात घातला हे खरं तर आपलं नशीब म्हणायला हवं.
शक्तिस्थळ
Detailing हा ह्या series चा USP आहे.Research वर घेतलेली मेहनत दिसून येते.पटकथा बऱ्यापैकी वेगवान आहे.
मुळात हा विषय एका फिल्म मध्ये पुरणार नाही त्यासाठी web series हवी हे डायरेक्टरला कळलं ह्यामध्येच त्याच यश आहे..
इथे चित्रपटासारखी time limit नसल्यामुळे पटकथा आणि characters उत्कृष्ट्यरित्या फुलवले आहेत.
चित्रपटातल्या प्रत्येक पात्राने आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे.
कुठलंही पात्र उगाच घुसडल्यासारखं वाटत नाही आणि उगाच एखाद्या पात्राला जास्त फुटेज दिला आहे असंहि नाही..
एखाद्या मोठ्या अभिनेत्याला न घेण्याचा खरतर series ला फायदाच झाला आहे.
हर्षद मेहताची कथा ४ टप्प्यात घडते.पहिल्या टप्यात तो एका ब्रोकरकडे जॉबला लागतो मार्केट समजून घेतो,ब्रोकर होतो
आणि १९८२ च्या market crash मध्ये डोक्यावर कर्ज करून बसतो आणि trading account
पण surrender करावं लागत त्याला कर्ज न फेडल्यामुळे..
दुसरा टप्पा येतो तो हर्षद मेहता ते share market चा ‘अमिताभ बच्चन’ बनण्यापर्यंतचा टप्पा.
इथे त्याने share market वर पूर्ण जम बसवला आहे.लोक फक्त त्याच्या नावावर share वर पैसे लावत आहेत.
तिसरा टप्पा आहे आणि हर्षद मेहताने money market मध्ये उतरण्याचा टप्पा.
जिथे त्याच vision हे खऱ्या अर्थाने विकसित होत आहे आणि इकडे तो देशातील elite group मध्ये पोहचला आहे
जिकडे जाण हे globalization यायच्या आधी फक्त धीरूभाई अंबानीला जमलं आहे.
बाकी तिथे फक्त आणि फक्त उद्योग घराण्यातील लोकच आहेत..
Finance क्षेत्रात पण ‘थ्रिल’ असू शकतं
आणि चौथा टप्पा आहे हर्षद मेहतांच्या अधःपतनाचा जिकडे अंगावर record breaking cases आहेत.
आणि सगळ्या यंत्रणा ह्या एकाच माणसाच्या मागे आहेत.
इथे पाचवा टप्पा त्याच्या come back चा आहे पण तिकडे त्याने पहिल्या केलेल्या गोष्टींच्या ५% पण थ्रिल नाही.
हे सगळे टप्पे अतिशय रोमहर्षक आहेत.Finance क्षेत्रात पण ‘थ्रिल’ असू शकतं हे ही web series
पाहिल्यानंतर कळत आणि त्याच सर्व श्रेय हे दिग्दर्शकाला,पटकथा लेखकाला आणि पूर्ण टीमला जात..
संवादाच्या बाबतीत मात्र उगाच टाळ्या मिळवणारे संवाद टाकलेत असं वाटलं..
तो मोह टाळायला हवा होता.असं मला वाटलं पण शेवटी प्रेक्षकाला मसालेदार संवाद हे लागतातच.
हर्षद मेहताच्या वेळची राजकीय परिस्थिती,त्यावेळचे share मार्केट आणि money market मधले already असलेली मोठी धेंड,आपल्या banking system मध्ये असलेल्या उणिवा ह्याच detail चित्र आपल्यापुढे उभं राहतं.
आणि मग फक्त हर्षद मेहता हा एकटाच गुन्हेगार रहात नाही तर हि पूर्ण पोखरलेली system गुन्हेगार बनून आपल्यासमोर उभी राहते.. एकाच माणसाने share market आणि money market वर वर्चस्व निर्माण करणं ते हि इतक्या कमी वेळात आणि ते सुद्धा business मधील elite group मधून न येता हे खरच अविश्वसनीय होत..पण त्याने ते ज्या पद्धतीने साध्य केलं त्याच detailing खरच बघण्यासारखं आहे..
खालच्या लेवलवरून आलेली माणस आवडत नाहीत
वेगवेगळ्या यंत्रणा कश्या काम करतात त्याची पण माहिती आपल्याला ह्या series मध्ये मिळू शकते..कुठल्याही क्षेत्रात भराभर वाढणारी व्यक्ती किंवा संस्थाही कोसळायला पण जास्त वेळ लागत नाही हे ही series पाहिल्यावर कळतं.
सिरीसमध्ये कुठेही त्याला खलनायक दाखवण्यात आलेलं नाही किंवा त्याची वाहवा केली गेलेली नाही.घडलेले प्रसंग आपल्यासमोर मांडण्यात आलेले आहेत आणि त्याला हिरो समजायचं आहे कि व्हिलन हे आपल्यावर सोपवण्यात आलेलं आहे. भारतात बनलेली ही बहुधा पहिली अशी biography असावी त्यामुळे त्याच कौतुक मला जास्त आहे.
गुजराती माणसांच्या रक्तात धंदा असतो असं म्हटल जात पण business मध्ये पण वर्ग आहेत.आणि त्यामध्ये एकदम वरच्या वर्गात त्याकाळात फक्त टाटा,बिर्ला,किर्लोस्कर,पालनजी,वाडिया,बजाज अशी लिमिटेड नाव होती (त्यात अंबानी हे नाव नंतर join झालं आणि अंबानी नावाचा तिरस्कार अजूनही आपण भारतीय करतो).ह्या लोकांना आपल्या level ला त्यांच्या खालच्या लेवलवरून आलेली माणस आवडत नाहीत मुळात ह्यांनी आपल्या बरोबरीने येऊच नये असं ह्या लोकांना वाटत.
ज्यांना आपल्या देशात जातीयवाद नाही असं वाटतं त्यांनी top business group मधला हा जातीयवाद जरूर पहावा.
हर्षद मेहतांच्या स्पर्धकांकडून त्याला मिळालेली हीन वागणूक हा ह्या जातीयतेचाच परिपाक आहे. त्याने ह्या लोकांबरोबर जमवून घेतलं असत तर कदाचीत अजूनही तो मार्केटमध्ये असता.ज्यांना आपल्या देशात जातीयवाद नाही असं वाटतं त्यांनी top business group मधला हा जातीयवाद जरूर पहावा.उणिवा,राजकीय connections हे ह्या series मध्ये ज्या पद्धतीने दाखवले गेले आहेत ते खूपच बालिश level चे आहेत.
इथे भ्रम निर्माण केला गेला आहे की मेहताने PM नरसिंह राव ह्यांना पैसे दिलेलेच होते पण त्याला ते prove नाही करता आले.मुळात त्याचा उत्कर्षाचा काळ होता त्यावेळेस काँग्रेसचं सरकारच नव्हतं त्याने पार्टी फंड दिला असणार तो सगळेच businessmen देतात त्यात काहीच नवीन नाही पण इथे उगाचच संशयाची सुई नरसिंह राव ह्यांच्यावर फिरवण्यात आली आहे.
जर त्याचा PM पर्यंत हात होता तर मग त्याच्या मागे एवढ्या चौकश्या लागण्याचं काहीच कारण नव्हतं आणि त्याने केलेल्या सगळ्या घडामोडी ह्या स्वतः केलेल्या दाखवल्या आहेत त्यामध्ये बाह्य शक्तींचा त्याला लिमिटेड सपोर्ट दाखवला आहे आणि तरीसुद्धा PM ला संशयित दाखवणं ह्यात दिग्दर्शकाला नक्की काय मिळवायचं आहे ते कळत नाही.
End
मुळात हे series बघून आपल्याला finance क्षेत्र कश्या पद्धतीने चालत हे जरी कळलं तरी ते ह्या series च यश आहे..आणि हे घोटाळे परत होणार नाहीत असही नाही कारण मेहता नंतर १० वर्षाच्या आतच केतन पारेख scam झाला आणि योगायोगाने तो हर्षद मेहताच्याच firm मध्ये काम करत होता.political part सोडला तर हि भारतात बनलेली सर्वोत्कृष्ट biographical कलाकृती आहे असं माझं मत आहे.
by – नीतेश महाडीक
स्त्रिया आणि राजकारण : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातील स्थान चिंताजनक
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)