Gyanvapi Masjid Case: वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद प्रकरणात गुरुवारी नवा ट्विस्ट समोर आला. सुप्रीम कोर्टात बौद्ध धम्मीय भिक्खू यांनी एक याचिका दाखल करून ज्ञानवापी ला ना मशीद ना मंदिर,ते एक बौद्ध विहार/मठ असल्याचा दावा केला आहे.ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणानंतर बौद्ध विहार चे अवशेष सापडतील, असा दावा अखिल भारतीय बौद्ध संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भंते सुमित रतन यांनी केला.
याचिकेत म्हटले आहे की, देशातील बौद्ध विहार पाडून मंदिरे बांधण्यात आली आहेत. ज्ञानवापीमध्ये आढळणारी त्रिशूल आणि स्वस्तिक ही चिन्हे बौद्ध धर्मातील आहेत. बौद्ध विहार त्यांच्या मूळ स्वरूपात परत आणण्याची मागणी त्यांनी केली. बद्रीनाथ, केदारनाथ आणि मथुरा या मंदिरांवर बौद्ध मठ असल्याचा दावा करण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करण्याबाबत सुतोवाच केले आहे.
सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल
भन्ते सुमित रत्न पुढे म्हणाले की, बौद्ध धर्म हा सर्वात प्राचीन धर्म आहे. इस्लाम 1500 वर्षांपूर्वी आला आणि हिंदू धर्म 1200 वर्षे जुना आहे. देशात सुरू झालेली परस्पर विभागणीची परंपरा योग्य नाही. बौद्ध विहारांचेही सर्वेक्षण करून ते बौद्ध समाजाला परत करावेत.
टाइम्स ऑफ इंडिया शी बोलताना भंते म्हणाले की , “आम्ही न्यायालयासमोर सादर केले आहे की मंदिर आणि मशीद या जागेवर बांधण्यात आले होते जे एक प्राचीन स्तूप होते. Gyanvapi Mosque is a Buddhist monastery ही बौद्ध स्तूप सुमारे 2,500 वर्षांपूर्वी अस्तित्वात होते आणि ते एक शैक्षणिक केंद्र सुद्धा होते जिथे 1,000 हून अधिक भिक्षू शिक्षण घेत होते.हे बौद्ध अनुयायांचे आहे. असून त्यांना त्याच्या मूळ स्थितीत परत केले पाहिजे,”
सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी सुरुवात करून ज्ञानवापी मुद्द्यावर वक्तव्य करून वादांना जन्म दिला आहे.
मशीद आणि मंदिरापूर्वीच ज्ञानवापी येथे बौद्ध मठ असल्याची चर्चा त्यांनी केली.
सपा नेत्याने पुढे सांगितले की आठव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत बद्रीनाथ हा बौद्ध मठ होता
आणि आदि शंकराचार्यांनी त्याचे बद्रीनाथ धाममध्ये रूपांतर केले.
स्वामी प्रसाद मौर्य यांचे वक्तव्य समोर येताच हिंदुत्ववादी लोकांकडून टीका सुरू झाली.
स्वामी प्रसाद मौर्य यांच्या समर्थनार्थ अखिल भारतीय बौद्ध संघ पुढे आला.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या ३ ऑगस्टच्या आदेशानंतर
५१ सदस्यीय एएसआय टीम ज्ञानवापी मशीद संकुलाचे सर्वेक्षण करत आहे.
न्यायाच्या हितासाठी सर्वेक्षण आवश्यक असल्याचे नमूद करून उच्च न्यायालयाने एएसआयला सर्वेक्षण करण्याची परवानगी दिली होती.
या आदेशाला आव्हान देत मुस्लिम पक्षाने ASI सर्वेक्षण थांबवण्याची मागणी केली आहे.
आज सर्वोच्च न्यायालयात मुस्लिम पक्षाच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
कोण आहेत सुमित रतन भंते?
सुमित रतन भंते Bhante Sumit ratan हे श्रमण संस्कृती रक्षा संघाचे अध्यक्ष आहेत. ते बौद्ध धर्मगुरू आहेत. श्रमण संस्कृती रक्षा संघाबाबत ते सांगतात की ही संघटना देशातील बौद्ध समाज आणि बहुजन समाजाच्या सेवेसाठी काम करते. या वर्गांवरील अत्याचाराचा मुद्दा मांडतो. त्यांच्या संस्थेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर परिषदा आयोजित केल्या जातात. यामध्ये बौद्ध धर्माचे गुण आणि महात्मा बुद्धांचे विचार मांडले जातात. लोकांना एकत्र जोडण्याच्या धोरणावरही ही संस्था काम करते.यांचं कार्यक्षेत्र प्रामुख्याने उत्तरप्रदेश असल्याचे समजते.
ज्ञानवापी मशिद मुद्यावर विरोधी पक्ष गप्प का आहे?
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 05,2023 | 21:21 PM
WebTitle – Gyanvapi Mosque is a Buddhist monastery, plea filed in Supreme Court