मुंबई, दि. 12 : महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबधीचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला आहे.
सुधारित मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
जागतिक महामारीच्या काळात विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षितता आणि मानसिक स्वास्थ्य यांनाच प्राधान्य देण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. इयत्ता 12 वीच्या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता मूल्यमापनाचे एकसमान सूत्र निश्चित करावे, अशी मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली होती. सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.
सर्व संबंधित घटकांशी केलेल्या चर्चेअंती सध्याचे वातावरण परीक्षेसाठी पोषक नसल्याने
परीक्षा रद्द करून पर्यायी मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषित करावा,असे महाराष्ट्र शासनाने केंद्राला यापूर्वीच सुचवले होते,
असेही प्रा.गायकवाड यांनी सांगितले आहे.
एमपीएससी परीक्षा,तारखांचा गोंधळ; नेमकं काय झालं?
मुंबई – राज्यात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढल्याने एमपीएससीची नियोजित राज्य सेवा आयोग परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे पत्रक राज्यसरकारच्यावतीने लोकसेवा आयोग सह सचिव महाराष्ट्र राज्य यांनी काढले.यामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला.रस्त्यावर उतरले.फक्त पुणेच नाही तर कोल्हापूर,नागपूर,अमरावती,औरंगाबाद शहरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.
हा संताप स्वाभाविक आहे.शासनात अधिकारी होण्याचं स्वप्नं अनेक तरुण तरुणी पहात असतात,त्यासाठी जीवतोड मेहनत घेत असतात.
गेले कित्येक दिवस विद्यार्थी अभ्यास करत आहेत.परीक्षेसाठी तयारी करत आहेत.मात्र परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत.
एमपीएससी परीक्षा,तारखांचा गोंधळ; नेमकं काय झालं?
एमपीएससी परीक्षा,तारखांचा गोंधळ; नेमकं काय झालं?
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो.. @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)