गुवाहाटी : Marriage News : सामाजिक सलोख्याला चालना देण्यासाठी आसाम सरकारने एक स्तुत्य निर्णय घेतला आहे.आंतरजातीय विवाह योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेअंतर्गत (Inter caste Marriage Plan) व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे . ( Assam government will give 5 lakh rupees financial assistance under an inter-caste marriage scheme.)आंतरजातीय लग्न केले तर ,अशा जोडप्यांना आसाम राज्य 5 लाख रुपये आर्थिक मदत देणार आहे.
अशी करणार सरकार आर्थिक मदत
अनुसूचित जाती कल्याण विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की,
नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या आंतरजातीय विवाह योजनेंतर्गत (Inter Caste Marriage Plan)
कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करण्यासाठी किंवा कोणताही उत्पन्न देणारा प्रकल्प सुरू करण्यासाठी 10,000 ते 5 लाख रुपये दिले जातील.
योजनेच्या अटी
या योजनेअंतर्गत ज्याना आर्थिक मदत मिळवायची आहे अशा लाभार्थीचे लग्न एप्रिल 2019 ते मार्च 2021 दरम्यान झालेले असावे तसेच जोडप्याचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.सदर जोडप्यापैकी म्हणजे पती किंवा पत्नीपैकी एक व्यक्ती ही अनुसूचित जातीची आणि दुसरी व्यक्ती तथाकथित उच्चजातीय (General category) असावी .
योजनेचे मुळ उद्देश असा आहे
अनेक घटनांमधून असे दिसून आले आहे की काही कुटुंबे आंतरजातीय विवाह करण्यास उत्सुक नसतात, त्यामागे सामाजिक भय हा एक मुद्दा असतो.ज्यामुळे आत्महत्येसह अनेक समस्या उद्भवतात.समाज कल्याण अधिकाऱ्याने सांगितले की, या योजनेमुळे राज्यात सुसंवाद, सकारात्मक मानसिकता आणि एकमेकांच्यातील सामाजिक अंतर कमी होण्याची भावना वाढीस लागेल.त्यामुळे सरकार आंतरजातीय लग्न करण्यास प्रोत्साहन देत असून 5 लाख पर्यंत आर्थिक मदत करणार आहे.
धर्म बदलला तरी जात बदलत नाही; मद्रास हायकोर्टाचा निकाल
Jai bhim film Review – इरुलर जमातीचे भेदक चित्रण करणारा सिनेमा ‘ जयभीम ‘
सिनेमा: ‘जयभीम’, ‘जयंती’, सोशल मिडिया आणि समीक्षक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 27, 2021 23:18 PM
WebTitle – Good News: 5 lakh financial assistance will be given if inter-caste marriage is done