अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या हत्या प्रकरणात न्यायालयाने माजी पोलीस अधिकारी डेरेक शॉविन यांना 22 वर्ष 6 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
गेल्या वर्षी (2020) मे महिन्यात जॉर्ज फ्लॉईड हत्या प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी डेरेक शॉविन यांनी फ्लॉईड यांच्या मानगुटीवर गुडघा दाबून त्यांची हत्या केली असा आरोप होता.
यामध्ये न्यायालयाने शॉविन यांच्यावरील दोष सिद्ध झाला. न्यायालयाकडून त्यांना तब्बल साडेबावीस वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
माजी पोलीस अधिकारी डेरेक शॉविन यांनी आपल्या पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर केला. तसंच जॉर्ज फ्लॉईड यांच्यासोबत त्यांनी केलेल्या क्रूर कृत्यामुळे त्यांना ही शिक्षा करण्यात आली, असं न्यायाधीशांनी आदेशात म्हटलं आहे.
अमेरिकेतील मिनियापोलीस शहर परिसरात गेल्या वर्षी मे महिन्यात हे प्रकरण समोर आलं होतं.
45 वर्षीय डेरेक शॉविन यांनी निःशस्त्र फ्लॉईड यांच्या मानेवर गुडघा दाबून ठेवला. त्यामुळे श्वास कोंडून त्यांचा मृत्यू झाला होता.
नंतर या घटनेचा व्हीडिओ संपूर्ण जगभरात व्हायरल झाला. त्यानंतर अमेरिकेसह जगात इतर ठिकाणीही या घटनेचा निषेध नोंदवत मोठ्या प्रमाणात आंदोलनही झालं होतं.
अमेरिकेतील न्यायालयाने यावर्षी एप्रिल महिन्यातच शॉविन यांना सेकंड डिग्री मर्डर आणि इतर अनेक गुन्ह्यांमध्ये दोषी मानलं.
यावेळी शॉविन यांचा कोणताही वाईट हेतू नव्हता, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता. कोणत्याही वाईट हेतूविना झालेली ती फक्त एक चूक होती, असं त्यांचं म्हणणं होतं.
मात्र त्यांचा दावा फेटाळून लावण्यात आला आहे.
डेरेक शॉविन यांच्या शस्त्र बाळगण्यावरही आजीवन बंदी घालण्यात आली आहे.
त्यासोबतच इतर तीन माजी पोलीस अधिकाऱ्यांनाही जॉर्ज फ्लॉईड यांच्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाबाबत विविध प्रकारचे आरोप लावण्यात आले आहेत.
फ्लॉईड यांच्या कुटुंबाने तसंच त्यांच्या समर्थकांनी शॉविन यांना ठोठावण्यात आलेल्या शिक्षेचं स्वागत केलं आहे.
वकील बेन क्रंप यांनी ट्वीट करून म्हटलं, “हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. फ्लॉईडचे कुटुंबीय आणि या देशाच्या जखमा भरण्यासाठी याची मदत होईल.”
22.5 YEARS! This historic sentence brings the Floyd family and our nation one step closer to healing by delivering closure and accountability.
— Ben Crump (@AttorneyCrump) June 25, 2021
जॉर्ज फ्लॉईड यांची बहीम ब्रिंजेट फ्लॉईड म्हणाल्या,
“पोलिसांच्या क्रौर्याचं प्रकरण आता गांभीर्याने घेतलं जात आहे,हे या निर्णयातून दिसून येतं.
मात्र,आपल्याला या मार्गावर अजून खूपच लांबचा प्रवास करायचा आहे.”
George Floyd's sister says Chauvin sentence shows police brutality is 'finally being taken seriously'https://t.co/4SSxTvt6Qs
— Jon Cooper (@joncoopertweets) June 26, 2021
हा निर्णय उचित वाटत आहे, पण याविषयी आपल्याला जास्त माहिती नसल्याची प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दिली आहे.
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान फ्लॉईड यांच्या मुलीचा एक व्हीडिओसुद्धा दाखवण्यात आला. यामध्ये सात वर्षांची जियाना आपल्या वडिलांची आठवण काढताना दिसते.
Gianna Floyd, 7, said in a video that she missed her father and wished she could play with him again. Derek Chauvin was sentenced on Friday to 22 and a half years in prison for George Floyd’s murder.https://t.co/0hpfXoWHP9 pic.twitter.com/K5CVI5h6fn
— The New York Times (@nytimes) June 26, 2021
अमेरिकेत George Floyd जॉर्ज फ्लॉयड यांच्या स्मृतीप्रित्यार्थ पुतळ्याचे अनावरण त्यांच्या भावाच्या हस्ते करण्यात आले होते,या पुतळ्याची गुरवारी सकाळी श्वेत माथेफिरू कट्टरपंथिय राष्ट्रवादी गुंडांकडून विटंबना करण्यात आली.
A statue of George Floyd that was unveiled in New York on Juneteenth by Floyd's brother was vandalized early Thursday morning and police are investigating the incident as a hate crime, a law enforcement official told CNN. https://t.co/9bTSjiYKdx
— CNN (@CNN) June 26, 2021
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUN 26 , 2021 10: 15 AM
WebTitle – George Floyd: Policeman sentenced to so many years in prison for strangulation 2021-06-26