31 डिसेंबर 2024 ,उत्तर प्रदेश | ‘मोलभाव नको… सांगितलेली रक्कम द्या’, लाचखोरीच्या व्हिडिओनंतर महिला ड्रग इंस्पेक्टर निधी पांडे निलंबित : खरंतर सरकारी नोकरी मिळणं हे अनेकांचं स्वप्नं असतं,आयुष्याचं ध्येय असतं.सरकारी नोकरी मिळवण्यासाठी लोकांना खूप मेहनत करावी लागते. मात्र, काही लोक नोकरी मिळाल्यानंतर मेहनतीला विसरून चुकीचे मार्ग स्वीकारतात. कोणी कामात अनियमितता करतो, कोणी बेकायदेशीर वसुली तर कोणी लाच घेतो.झटपट श्रीमंत होण्यासाठी लोकांच्या असहायतेचा फायदा उपटला जातो.मात्र असे करताना पकडले गेले, तर सामाजिक अपमानासोबत विभागीय कारवाईचाही सामना करावा लागतो.
ड्रग इंस्पेक्टर निधी पांडे चा व्हिडिओ व्हायरल झाल्याने कारवाई
उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातून असाच प्रकार समोर आला आहे. येथे ड्रग इंस्पेक्टर निधी पांडे हिला लाच मागतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निलंबित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी तिने एका मेडिकल स्टोअरवर छापा टाकला होता. यावेळी रिपोर्ट ‘ओके’ करण्याच्या नावाखाली लाच मागितल्याचे सांगितले जात आहे. हा प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विभागाने कारवाई करत त्यांना निलंबित केले आहे.
माहितीप्रमाणे, ड्रग इंस्पेक्टर निधी पांडे यांची ही पहिलीच पोस्टिंग होती.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ड्रग इंस्पेक्टर निधी पांडे बोलताना ऐकू येते, “मोलभाव नको, दुकान चालवायचं आहे का नाही? जर चालवायचं असेल तर सांगितलेला पैसा द्या. नाहीतर तुझ्या दुकानात एवढ्या त्रुटी आहेत की थेट एफआयआर होईल. आता तूच बघ.” जागल्या भारत.कॉम या व्हिडिओची पुष्टी करत नाही, पण यामुळे लगेच कारवाई झाली. निधी पांडे यांना तातडीने निलंबित करण्यात आले असून आदेश प्रमुख सचिव पी. गुरुप्रसाद यांनी जारी केले आहेत.
ये निधि पांडे हैं। शामली, उत्तर प्रदेश में ड्रग इंस्पेक्टर। इन्होंने एक मेडिकल स्टोर पर छापा मारा। OK रिपोर्ट लगाने के नाम पर रिश्वत मांगी। इसकी Video बन गई। अब मैडम जी सस्पेंड हो गई हैं। मैडम जी की ये पहली पोस्टिंग थी। pic.twitter.com/otjRH0O7St
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) December 31, 2024
प्रशासनाने केली कारवाई
आदेशांमध्ये म्हटले आहे की लाच मागणे, व्यापाऱ्याला धमकावणे आणि बेकायदेशीर औषध व्यापार चालविण्यास मदत करणे हा गंभीर आहे. हे सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधी शून्य सहिष्णुता धोरणाचे उल्लंघन आहे.
पांडे यांना उत्तर प्रदेश सरकारी सेवक नियमावली 1999 च्या नियम-4 अंतर्गत निलंबित करण्यात आले आहे. तसेच, नियम-7 अंतर्गत विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. मुरादाबाद मंडळाचे सहायक आयुक्त (औषध) यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
औषध विक्रेत्यांनी ढोल ताशे वाजवत साजरा केला आनंद
ड्रग इंस्पेक्टर निधी पांडे हिच्या निलंबनाची बातमी मिळताच शामलीतील औषध विक्रेत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली.
त्यांनी ढोल वाजवून ही बातमी शहरभर पसरवली.
देवराज मलिक नावाच्या औषध विक्रेत्याने याआधीही त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. नुकत्याच एका मेडिकल स्टोअरवरील छाप्यात त्यांनी रिपोर्ट ओके करण्याच्या नावाखाली लाच मागितल्याचा आरोप आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
त्यांच्याविरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी होत्या, मात्र कारवाई केली जात नव्हती. शेवटी व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाल्यामुळे
औषध विक्रेत्यांनी आनंद साजरा केला आणि ढोल-ताशांचा कार्यक्रमही आयोजित केला.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 31,2024 | 18:16 PM
WebTitle – female-drug-inspector-nidhi pandey suspended-bribery-video-shamli