साहित्यिक आणि प्रख्यात जेष्ठ गझलकार इलाही जमादार यांचे वृद्धपकाळाने निधन
नुकतंच रुग्णालयात भरती करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तोल जाऊन पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता.शिवाय वाढत्या वयोमानानुसार त्यांना स्मृतिभ्रंशाचा आजारही जडला आहे.मागील काही वर्षात त्यांनी तब्बल 13 हजार दोहे लिहले होते. त्या दोह्यांचे पुस्तक ‘दोहे इलाहीचे’ या द्विखंडांचे मंगेशकर रुग्णालयाच्या सभागृहातच प्रकाशन करण्यात आले होते.
जेष्ठ गझलकार इलाही जमादार यांचे महाराष्ट्रतील अनेक शहरांत आणि व महाराष्ट्राबाहरील इंदूरमध्ये स्वतंत्र काव्यवाचनाचे व मराठी ग़झलांच्या संदर्भातील प्रश्नोत्तरांचे जाहीर कार्यक्रम तसेच अनेक कविसंमेलने व मुशायरे यात भाग घेतला.इलाही यांनी ’जखमा अशा सुगंधी’ व ’महफिल-ए-इलाही’ या नावांचेे मराठी, उर्दू काव्यवाचनाचे जाहीर कार्यक्रम केले.ते विशेष लोकप्रिय ठरले.
अंदाज आरशाचा, वाटे, खरा असावा
बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा
जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा
नाही अखेर कळले, नौका कशी बुडाली
भयभीत काठ सांगे, तो भोवरा असावा
का आळ खंजिरावर, घेता तुम्ही खुनाचा?
की वाटले तुम्हाला, तो सोयरा असावा!
काठावरी उतरली, स्वप्ने तहानलेली
डोळ्यात वेदनेचा, माझ्या, झरा असावा
भेटून वादळाला, इतुके विचार आता
शाबूत एवढाही, का, कोपरा असावा
दारात ती उभी अन्, नयनी अबोल अश्रू
लाचार ती असावी, तो, उंबरा असावा
माथ्यावरी नभाचे, ओझे सदा “अलाही’
दाही दिशा कशाच्या, हा, पिंजरा असावा
– इलाही जमादार
महाराष्ट्र व कामगार दिनाचा इतिहास
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो.. @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)