मुंबई: महाविकास आघाडी मध्ये खटके उडताना दिसत आहेत.दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वादानंतर काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीत निर्माण झालेली फूट अजूनही चर्चेत असतानाच, आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतही वादाचे ढग गडगडताना दिसत आहेत. मविआतील तीनही पक्षांच्या नेत्यांनी परस्परांवर टीका करत चिखलफेक सुरू केल्याने विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे निर्माण झालेली दरी अधिकच वाढल्याचे चित्र आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अमोल कोल्हे शरद पवार गट यांची टिका : ठाकरे गट झोपलाय, काँग्रेसची पाठ मोडलेली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ठाकरे गट आणि काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली आहे. “ठाकरे गट अजूनही झोपेतून जागे व्हायला तयार नाहीये तर दुसरीकडे काँग्रेसची मोडली पाठ सरळ होताना दिसत नाहीये,” अशा स्तरावर बोचरी टीका शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पक्षाच्या बैठकीत केली. “आमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत, त्यामुळे बचेंगे तो और भी लढेंगे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
काँग्रेस: तुम्ही पक्षाकडे लक्ष द्या
या टीकेला उत्तर देताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, “या सरकारने ईव्हीएमच्या भरवशावर सत्ता मिळवली आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी त्यांच्या पक्षाकडे लक्ष द्यावे आणि आम्हाला सल्ला देऊ नये.” काँग्रेस नेते नितीन राऊत यांनीही प्रतिक्रिया देताना सांगितले, “जागावाटपाच्या तिढ्यामुळे प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आजही ताकद आहे, आणि पक्ष उभा राहण्याची क्षमता आहे.”
उद्धवसेना: दोघांनीच आत्मचिंतन करावे
उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या वादात उडी घेत दोन्ही गटांवर टीका केली आहे. “जागावाटपाच्या चर्चेत वडेट्टीवार होतेच. विदर्भातील काही जागा राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला सोडल्या असत्या, तर परिणाम वेगळा झाला असता. कोल्हेंना ठाकरे गटावर टीका करण्याचा अधिकार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. उद्धवसेनेचे नेते विनायक राऊत म्हणाले, “तुम्ही स्वतः आत्मचिंतन करा.”
शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येण्याची शक्यता?
शरद पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
सत्तेची ऊब मिळावी अशी इच्छा यावेळी समोर आली.
सत्तेच्या उबेत सामील होण्याच्या मागणीमुळे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘एकीचे बळ’ दिसेल का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
महाविकास आघाडीचे भवितव्य धोक्यात
महाविकास आघाडी मध्ये खटके उडत असल्याचे चित्र स्पष्ट झाल्याने,तीनही पक्षांमधील वाद आणि परस्परांवरील आरोप-प्रत्यारोपांमुळे महाविकास आघाडीच्या एकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विधानसभेतील पराभवाचा धक्का सावरत असतानाच पक्षांमधील या अंतर्गत वादामुळे आघाडीचे राजकीय भवितव्य अधिकच धूसर होत आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 11,2024 | 14:58 PM
WebTitle – Factions in Mahavikas Aghadi