नवी दिल्ली,दि.22 : ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या (मगरीचे अश्रू किंवा मगर मच्छ के आंसू अशी अनुक्रमे मराठी हिंदीत एक म्हण आहे.या म्हणीचा अर्थ असा की क्रूर खुनशी रक्तपिपासू हिंस्त्र मगर अश्रू ढाळून आपल्यासमोर दु:खी असल्याचे नाटक करते.मात्र संधी मिळताच हीच मगर आपला अक्राळ विक्राळ जबडा खोलून त्यात गरीब असहाय भक्ष्य गट्टम करते.एखाद्या व्यक्ती किंवा घटनेबद्दल मनात कोणत्याही प्रकारची आपुलकी किंवा प्रेम नसताना डोळ्यात जाणीव पूर्वक आणलेल्या अश्रूंना मगरीचे अश्रू म्हणतात.) न्यूयॉर्क टाइम्स ने मोदींच्या जागी मगरीचा फोटो छापला? पहिल्या पानावर रडणाऱ्या मगरीची प्रतिमा असलेल्या मथळ्यासह’ इंडियाचे प्रधानमंत्री रडले ‘असा एक फोटो अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी शेअर केला.असून तो प्रचंड वायरल होत आहे.
https://twitter.com/ImranGhaziIND/status/1395983396971585538
https://twitter.com/Avinash93Raj/status/1395952699741376515
ट्विटरप्रमाणे फेसबुकवरही अनेकांनी वरील फोटो शेअर करत भारतासाठी हे आंतराष्ट्रीय स्तरावर पेच निर्माण करणारी गोष्ट असल्याचे म्हटले.
कॉँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनीही ही वायरल फोटो पोस्ट ट्विटरवर शेअर केली होती,मात्र नंतर त्यांनी ती डिलिट केली.
दावा –
द न्यूयॉर्क टाइम्स ने भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या जागी मगरीचे अश्रू दाखवणारा व्यंगात्मक फोटो छापला
सत्य –
द न्यूयॉर्क टाइम्स ने भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या जागी मगरीचे अश्रू दाखवणारा व्यंगात्मक फोटो छापला हा दावा चुकीचा असत्य आहे.
VERIFICATION AND METHODOLOGY
आमच्या टीमने याबाबत शोध घेतला असता पडताळणीमध्ये असे समोर आले की सदर फोटो हा द न्यूयॉर्क टाइम्स ने छापला नसून “द डेली न्यूयॉर्क टाइम्स” या दुसऱ्याच नाम सार्धम्य असणाऱ्या वेबसाइटने प्रकाशित केला आहे.
द डेली न्यूयॉर्क टाइम्स ही सटायर पध्दतीने बातम्या/लेख प्रकाशित करणारी वेबसाइट आहे.
आपल्याला माहीत असावं की द डेली न्यूयॉर्क टाइम्स ही सटायर पध्दतीने बातम्या/लेख प्रकाशित करणारी वेबसाइट आहे.
परंतू तिचा आणि न्यूयॉर्क येथील मिडिया हाऊस द न्यूयॉर्क टाइम्स चा काही संबंध नाही.
आपल्याला आणखी एक मजेशीर सत्य जाणून घेतले पाहिजे की सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्ही लोक अशाप्रकारे नामसार्धम्य असणाऱ्या वेबसाइटवरून भारतीय लोकाना मूर्ख बनवत असतात.हे प्रोपौगंडा दोन्ही बाजूने जोरात सुरू असतात.
उदाहरणार्थ – द गार्डीयन नावाचे ऑस्ट्रेलियातील एक आंतरराष्ट्रीय मिडिया हाऊस आहे.भारतात त्याच्याशी नाम सार्धम्य राखत द डेली गार्डीयन नावाने एक वेबसाइट सुरू करण्यात आले. त्यावरून भाजप आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इमेज बिल्डिंग केली जाते.
या वेबसाईटवरील बातम्या भाजपप्रणीत केंद्र सरकारमधील केंद्रीय मंत्री सुद्धा आणि भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख शेअर करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात.लोकांना मात्र वाटतं की आंतरराष्ट्रीय मिडियाने नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे.मात्र जेव्हा खोलात जाऊन शोध घेतला असता असं समजतं की ऑस्ट्रेलियातील द गार्डीयन आणि द डेली गार्डीयन या दोन वेगवेगळ्या वेबसाइट असून ही भारतात 2000 साली सुरू केलेली वेबसाइट आहे. https://en.wikipedia.org/wiki/The_Daily_Guardian
प्रोपौगंडा
द डेली गार्डीयन मध्ये नरेंद्र मोदींची स्तुती करणारा लेख लिहिणारे सुदेश वर्मा हे Narendra Modi the Gamechanger या पुस्तकाचे लेखक आहेत.आणखी विशेष बाब म्हणजे त्यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरील माहिती मध्ये भाजप राष्ट्रीय मिडिया टीम चे सदस्य असा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यामुळे द डेली गार्डीयन मध्ये त्यांनी मोदींची स्तुती करणारा लेख लिहिणे आणि तो भाजप नेत्यांनी वायरल करणे यात काहीच विशेष बाब वाटत नाही. विशेष तेव्हा ठरते जेव्हा लोकांना असा भ्रम होतो की हा लेख मोदींची स्तुती करण्यासाठी ऑस्ट्रेलियन द गार्डीयन ने प्रकाशित केला आहे.परंतु हे सत्य नसते.प्रोपौगंडा असा चालवला जातो.
तर देशात हा असा एकूण प्रकार असू आहे.त्यामुळे भारतीय नागरिकांनी मग ते समर्थक असो की विरोधक आपल्या समोर येणारी माहिती/बातमी/लेख त्याची सत्यता किती आहे? कशी आहे? ती खात्रीपूर्वक आहे का? अशा प्रश्नांची उत्तरे अगोदर शोधली पाहिजेत आणि नंतरच अशा बातम्या/लेख सोशल मिडियात इतरांना फोरवर्ड केल्या पाहिजेत.अन्यथा आपणही एका अप्रिय प्रोपौगंडाचा भाग बनून जाऊ.
- टीम जागल्या भारत
फॅक्टचेक: धोनी बौद्ध भिक्खू बनला? कारण जाणून घ्या.
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचक हो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)
First Published on MAY 22, 2021 20 : 15 PM
WebTitle – Factcheck – Did the New York Times print a photo of a cried crocodile instead of Modi? Truth behind viral photos 2021-05-22