जगातल्या सर्वात शक्तिशाली राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बाईडेन आपल्या गुडघ्यावर वाकून क्षमा याचना करताहेत, आणि समोर जी मुलगी आहे ती जॉर्ज फ्लोयड (George floyd) यांची,असा मजकूर असलेला खालील फोटो सध्या सोशल मिडियात प्रचंड वायरल होत आहे.
आमच्या टीमने या फोटो मागचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला,तेव्हा आम्हाला जी माहिती समजली ती अशी.
हा फोटो फेक नाही.हा फोटो स्वत: ज्यो बाईडेन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरुन पोस्ट केला आहे. त्यामुळे फोटो खरा आहे.
या लिंकवर तुम्ही तो फोटो पाहू शकता. इथे क्लिक करा. परंतु जे सांगितले जात आहे ते अर्धसत्य आहे.
ज्यो बाईडेन ज्या मुलीसमोर गुडघ्यावर बसून क्षमा याचना करत आहेत,असा दावा केला जातोय ती मुलगी नसून मुलगा आहे.
याशिवाय तो मुलगा आणि जॉर्ज फ्लॉयड यांचा काही संबंध नाही.
जॉर्ज फ्लॉयड यांचा खून पोलिसांच्या अमानुष अत्याचारांमुळे झाला होता,त्यांच्या मानेवर गुडघा दाबून त्यांचा श्वास रोखण्यात आला होता,यात जॉर्ज फ्लॉयड गतप्राण झाले. त्यानंतर अमेरिकेत मोठ्याप्रमाणावर रंगभेद विरोधी आंदोलन तीव्रतेने झाले.यात गोऱ्या रंग असणाऱ्या माणसांनी आपली सामाजिक जबाबदारी समजत मोठ्याप्रमाणावर सहभाग घेतला होता.
लोकांनी जॉर्ज फ्लॉयड यांचा खून करणाऱ्या पोलिसांची चौकी पेटवून दिली होती. अमेरिकेतील चाळीस पेक्षा जास्त राज्यात दोन महीने असंतोष धुमसत होता. लोकांचे रौद्र रूप पाहून तत्कालीन डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने पोलिसांवर कारवाई केली.
मात्र,फोटो मधील मुलगा आणि जॉर्ज फ्लॉयड यांचा काही संबंध नसून मुलाचे नाव डॉन लिटिल (Don Little) असं असून तो थ्री थर्टिन ( Three Thirteen , Detroit Michigan ) नावाने कपड्याचे दुकान असणाऱ्या मालकाचा मुलगा आहे.
सदर फोटो हा सप्टेंबर महिन्यातील असून,ज्यो बायडेन यांनी निवडणूक प्रचारासाठी केलेल्या कॅम्पेनचा एक भाग आहे.
असे असले तरी त्यावेळी ज्यो बायडेन यांनी काढलेले उद्गार सुद्धा महत्वाचे आहेत. ज्यो बायडेन म्हणतात, “मी या संघर्षात का आहे याची आठवण आमची ही मुलं करून देतात.आम्हाला अशी अर्थव्यवस्था तयार करण्याची आवश्यकता आहे जी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना उचित संधी प्राप्त करून देईल.आपल्याला वंश विद्वेष वादाचे (भारतीयांच्या दृष्टीने जातीयवादाचे) समूळ उच्चाटन करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून ते आतापेक्षा जास्त एका सुधृढ न्यायी देशात वाढतील. आम्हाला हवामान बदलाशी देखिल लढा द्यावा लागेल,जेणेकरून त्यांना प्रगतीसाठी एक चांगले जग मिळू शकेल,मी आमच्या मुलांच्या उत्तम भविष्यावर विश्वास ठेवतो आणि त्यासाठी मी शेवटपर्यंत लढत राहीन.”
दावा –
जगातल्या सर्वात शक्तिशाली राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बाईडेन आपल्या गुडघ्यावर वाकून जॉर्ज फ्लोयड यांच्या मुलीसमोर क्षमा याचना करताहेत,
सत्य –
फोटो मधिल दावा असत्य आहे.
VERIFICATION AND METHODOLOGY
आम्ही गुगलवर reverse-image search करून याचा शोध घेतला असता यातील सत्य समजून आले.
आमच्या वाचकांना योग्य माहिती देणे आणि त्यांना ती मिळणे हा त्यांचा अधिकार आणि आमचं कर्तव्य आहे!
हेही वाचा.. George Floyd:गुडघ्याखाली दाबून हत्या करणाऱ्या पोलिसाला अखेर शिक्षा
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 30, 2020 15: 07 PM
WebTitle – fact-check-false-us-presidential-candidate-joe-biden-did-not-kneel-before-george-floyd-daughter
Comments 1